[अंतरराष्ट्रीय]
१- इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये स्फोट; 5 मृत्यू, 39 जखमी
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हल्ला झालाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किमान 6 ठिकाणी स्फोट झालेत. यातला एक स्फोट संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाजवळ झाल्याचं समजतंय. आतापर्यंत तीन पोलिसांसह किमान सहा जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. रॉयटर्सच्या एका फोटोग्राफरन दिलेल्या माहितीनुसार स्टारबक्स या कॅफेमध्ये स्फोट झालाय. तसंच एका गच्चीवर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केल्याचंही या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. गेल्या काही आठवड्यांपासून अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा इंडोनेशियाला मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी अनेक भागात शोधमोहीमही राबवली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियात सिडनीमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे तिथलं जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊस रिकामं करण्यात आलंय.
२- इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या चौघांना सिरीयामध्ये अटक
इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या चार भारतीय युवकांना सिरीयामध्ये अटक करण्यात आली असून, सिरीयातील दामास्कस शहरातून या युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारताच्या तीन दिवसाच्या दौ-यावर आलेले सिरीयाचे उपपंतप्रधान वालिद अल मुआलेम यांनी ही माहिती दिली. भारतीय तपास यंत्रणांकडे या युवकांबद्दलची माहिती मागितली आहे. त्यांना कधी अटक केली ते मुलालेम यांनी सांगितले नाही. या युवकांनी जॉर्डनमार्गे सिरीयामध्ये प्रवेश केला होता. या युवकांची नावे, ते कुठल्या राज्यातील आहेत तसेच त्यांना कधी अटक केली याबद्दल मुआलेम यांनी कोणीतीही माहिती दिली नाही. भारतीय युवकांनी इसिसच्या प्रभावाखाली येऊ नये यासाठी भारतीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या तीन युवकांना भारतीय तपास यंत्रणांनी विमानतळावरुन अटक केली होती.
३- उत्तर जापानला भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रत ६.७ रिश्टर स्केल.
४- अमेरिकेतील रोड अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- मंत्रालयात किती मंत्री येतात हे मुख्यमंत्र्यांनी पहावं, मंत्रालयात बायोमॅट्रिक्स सुरू करावं - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
६- सकाळच्या सत्रात रुपया २६ पैशांनी घसरला असून १ डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६७.११ रुपये झाली आहे. रूपयाती ही दोन वर्षातील सर्वात मोठी घसरण
७- दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
८- लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब यांचं निधन
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. 1971 च्या ऐतिहासिक युद्धामध्ये बांगलादेशच्या ढाकामध्ये घुसलेल्या 81 हजार पाकिस्तानी सैनिकांना शरण येण्यास जेकब यांनी भाग पाडलं होतं. ज्यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला होता. 1923 साली बंगाल प्रांतामध्ये जन्मलेले जेकब हे 1971 च्या युद्धामध्ये भारताच्या ईस्टर्न कमांडचे मेजर जनरल होते. वयाच्या 19 व्या वर्षी लष्करात दाखल झालेल्या जेकब यांची कारकीर्द अत्यंत प्रभावशाली होती. 1978 साली लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जेकब यांनी गोवा आणि पंजाब या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं.
९- मकरसंक्रांत आणि अर्ध कुंभमेळयासाठी हरिव्दारमध्ये भाविकांची मोठी गर्दी, भाविकांनी केले पहिले स्नान.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- मुंबई-नाशिक बुलेट ट्रेन, मुख्यमंत्र्यांचा केंद्राकडे प्रस्ताव
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गानंतर आता नाशिकही बुलेट ट्रेनच्या नकाशावर येण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने मुंबई नाशिक मार्गासाठी बुलेट ट्रेन म्हणजेच हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात या मार्गाला तत्वतः मान्यता मिळावी अशी मागणी या पत्रात केली आहे. अर्थसहाय्य मिळावं यासाठी जपानच्या जायका कंपनीकडे प्रयत्न केले जाणार आहेत. याआधीच मुंबई- अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गाला तत्वतः मान्यता मिळाली आहे. या मार्गाचा आराखडा करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-नाशिक हा सुमारे 180 किमीचा बुलेट ट्रेन मार्ग बांधतांना सह्याद्री डोंगररांगेला भेदण्याचं मोठे आव्हान असणार आहे.
११- मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी
मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मालाडच्या बंजारीपाडा येथील एका घरात काही लोक नरबळी देण्यासाठी चक्क खड्डा खोदून तयार होते. खड्ड्याजवळ एका पिशवीत जे सामान सापडलय त्यावरुन येथे काही अघोरी कृत्य होणार होतं, हे स्पष्ट होत आहे. या घरातील हालचालींमुळे शेजारच्या लोकांना शंका आली. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि हा सर्वप्रकार उघड झाला. यात एका मौलवीसह ४ जण सहभागी असल्याचं समजतंय. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाहून एका आरोपीला ताब्यात घेतलय. मात्र त्याच्या मुलानं इथं सोनं सापडणार होतं आणि त्यासाठी हा खड्डा खणण्यात आला होता असं सांगितलय. पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून यात सहभागी असलेल्या इतरांचाही शोध घेण्याच काम पोलीस करतायत.
१२- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारला अपघात, वाहतूक विस्कळीत
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देवळे पुलाजवळ झायलो कार झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. तसेच या अपघातामुळं एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती समजते आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिका बंद करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. देवळे पुलाजवळ एका ट्रकला अपघात झाला होता. त्याच अपघातग्रस्त ट्रकला झायलो कार जाऊन ठोकली. त्यामध्ये चौघे जखमी झाले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला केला असून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
१३- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २२ वर्षे पूर्ण
महाराष्ट्राच्या विधीमंडळाने नामांतराचा ठराव १९७८ मध्ये एकमताने मंजूर केला. परंतु, या नामांतराला प्रखर विरोध झाला आणि आंबेडकरवादी जनतेला तब्बल १६ वर्षे संघर्ष करावा लागला. अखेर १४ जानेवारी १९९४मध्ये आंदोलक व विरोधकांमध्ये समन्वय झाला आणि विद्यापीठाचे नाव केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर न ठेवता पुढे मराठवाडा जोडायचे ठरले. या नामांतराला आज २२ वर्षे पूर्ण झाली. जवळपास दोन वर्षे या आंदोलनाला हिंसेचा सामना करावा लागला. दलितांच्या घरांची जाळपोळ झाली, हजारो विस्थापित झाले, काहींना तर प्राण गमवावे लागले. मराठवाड्यातल्या जवळपास १२०० गावांना झळ पोचली होती. मात्र अखेर, ज्या महापुरुषाने देशातल्या शोषितांसाठी लढा दिला, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची ध्वजा खांद्यावर मिरवली त्या उच्चविद्याविभुषित बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आज विद्यापीठाला मिळाले.
१४- चोरीच्या संशयावरुन पुण्यात अल्पवयीन मुलाला जाळलं
अल्पवयीन मुलाला चोर समजून जमावाने आधी त्याला बेदम मारहाण केली नंतर त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कसबा पेठ परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित अल्पवयीन मुलगा कसबा पेठ परिसरात उभ्या असलेल्या गाडयांच्या कडेला उभा राहून लघवी करत होता. त्यावेळी काही जणांनी त्याला पाहिले. हा मुलगा गाडयांचा बॅटरी चोर असावा असा स्थानिकांना संशय आला. त्यांनी या मुलाला हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही जणांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले त्याला पेटवून दिले. यामध्ये हा मुलगा ६५ टक्के भाजला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.
१५- जळगाव: भुसावळमधील गोळीबारप्रकरणी धुळ्यातील चार पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- कल्याण; लखपती भिकाऱ्याच्या झोपडीला आग, तीन पोती पैसे जळालेत
येथे एका लखपती भिकार्याच्या झोपडीला आग लागली. या आगीत तीन पोत्यात भरुन ठेवलेले पैसे जळून खाक झालेत. मोहने येथे भिकार्याच्या झोपडीला आग लागली. त्याच्याकडे तीन पोती नोटा होत्या. भिकार्याकडे इतका पैसा आला कुठून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. तीन पोत्यात किमान १० लाख रुपयांची रक्कम असावी अशी शंका आहे. मोहने परिसरातील लहूजी नगर झोपडपट्टीत मोहम्मद रहेमान आणि त्याची पत्नी फातिमा हे वृद्ध जोडपे राहते. हे दांपत्य परिसरात भीक मागून उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी रात्री वीज गेल्यामुळे त्यांनी झोपडीत पणती पेटवली होती. रात्री पणती पेटती ठेवून ते झोपी गेले. रात्री उशिरा ही पणती कलंडून झोपडीने पेट घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचे लक्षात येताच मोहम्मद आणि फातिमा आरडाओरड करत घराबाहेर पळाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. दरम्यान, तुमच्याकडे किती पैसे होते, असे विचारले असता रेल्वे, बस स्थानक परिसरात आम्ही भीक मागतो. मिळालेले पैसे पोत्यात भरून ठेवतो. भीक मागूनच खातो मग पैसे कशाला लागतात, असा सवाल त्यांनीच उपस्थित केला.
१७- दृष्टीहीनांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात अजिंक्य
ब्लाईंड वेलफेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरातने सहाव्यांदा विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात गुजरातने आंध्र प्रदेशवर 51 धावांनी मात केली. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सामने मुंबईच्या इस्लाम जिमखान्यावर खेळवण्यात आले होते. मग बुधवारी विल्सन ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात आणि आंध्र प्रदेश यांच्यातली लढाई रंगली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत आठ बाद 187 धावा केल्या. गुजरातने मग आंध्र प्रदेशला आठ बाद 136 धावांवर रोखलं आणि 51 धावांनी विजय साजरा केला. या विजतेपदाबरोबरच गुजरातनं 25 हजार रुपयांचं रोख पारितोषिकही मिळवलं. गुजरातचाच गणेश मुणकर आणि महाराष्ट्राचा अनिश बेग हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
१८- सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माढा तालुक्यातील शेटफळ कुर्डूवाडी रस्त्यावर वाळूमाफियांनी तुकाराम मुंढे यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाहन चालकावर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून तुकाराम मुंढे थोडक्यात बचावले. तर पोलिसांनी पाठलाग करुन दोन ट्रक पकडले आहेत. तुकाराम मुंढे आज सकाळी माढा इथे बैठकीसाठी निघाले असताना त्यांना वाळू घेऊन जाणारे दोन ट्रक दिसले. ते ट्रक अडवण्यासाठी थांबले असताना, यातील एका चालकाने त्यांच्या अंगावर ट्रक घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध असलेल्या मुंढेंनी हा डाव उधळून लावला. सोबत असलेल्या पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतलं. हे वाळूचे ट्रक पंढरपूर येथून चोरटी वाळू भरुन परंडाकडे निघाले होते. सोलापूरमधील वाळू माफियांचं काळं साम्राज्य मुळापासून उखडून टाकण्यात यशस्वी झालेले आणि वाळू माफियांचे कर्दनकाळ अशी तुकाराम मुंढेंची ओळख आहे.
१९- बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिस मुख्यालयाबाहेर विरोध प्रदर्शन
२०- मध्यप्रदेशातील भौरी येथे एका कारखान्याला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- सचिनच्या आयुष्यावर चित्रपट, तेंडुलकर स्वतःच्याच भूमिकेत
अवघ्या जगभरातील क्रिकेट रसिकांचं दैवत, विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सचिनच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार असून विशेष म्हणजे खुद्द मास्टर ब्लास्टर तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. मुंबईतील 200 नॉट आऊट या प्रॉडक्शन कंपनीने सचिनचा चरित्रपट आणण्याची तयारी सुरु केल्याचं वृत्त आहे. जेम्स अर्सकिन यांच्या खांद्यावर दिग्दर्शनाची धुरा देण्यात येणार आहे. चित्रपटाचं नाव मात्र अद्याप ठरलेलं नाही. वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपकडून प्रॉडक्शन कंपनीने हक्क विकत घेतले आहेत. निवृत्तीनंतर सचिनने ‘प्लेयिंग इट माय वे’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. यात त्याने आपल्या ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यापाठोपाठ खुद्द सचिनवरील चरित्रपटामुळे नवा ट्रेण्ड येण्याची शक्यता आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- खरीपाच्या नुकसानपोटी १७६ कोटींचा निधी प्राप्त; राज्य सरकारकडून मदत
२३- पाणीटंचाईची तीवृत्ता जानेवारीतच वाढली; टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना
२४- किनवट; गौण खनिजांची रॉयल्टी न भारता व नुतनीकरण न करता चालविण्यात येणाऱ्या चार गिट्टी क्रेशरला सील
२५- शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य करावे - खतगावकर
२६- भटक्यांनो संविधान स्वीकारा- संजय बालाघाटे; माळेगावात जातपंचायती मोडण्याचा भटक्यांचा निर्धार
२७- दीड हजार सहकारी संस्था बंद; पाचशे रुपयापेक्षा कमी भाग-भांडवल असणाऱ्या सहकारी संस्थांना दणका
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेत तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात...कारण धनुष्याचा बन लांब जाण्यासाठी आधी मागे खेचाव लागतो
[सुरेश मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
उमेश यादव, इतिक सेठ, मनीष गुप्ता, जोत्सना उबाळे, अंशुल कांबळे, सोमनाथ बोधने, शंकर सूर्यवंशी, प्रथ्वीराज तावूर, राकेश जामालू झगडे, शैलेश गायकवाड, संजय राऊत, राजपाल जाधव, धीरज सोमाणी
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment