सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
पाकिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सहा दहशतवादी ठार
भारतीय सुरक्षा यंत्रणेला फक्त सहा मुजाहिदीनींवर नियंत्रण मिळवता आले नाही - पठाणकोट हल्ल्यावरून 'जैश ए मोहम्मद' दहशतवादी संघटनेने भारताची उडवली खिल्ली.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्री मुफ्ती सईद यांच्या निधनानंतर निर्णय.
भाजपाचं सरकार जातीय अजेंडा राबवत असल्याचा तसेच सत्तेच केंद्रीकरण करत आहे - मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी
दक्षिण भारतातल्या राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी भाजपाने प्राण्यांच्या झुंजींसारख्या रानटी प्रथांना परवानगी दिली आहे. - काँग्रेस नेते जयराम गणेश
नेताजी सुभाष चंद्र खरोखर विमान अपघातात सापडले - ब्रिटिश वेबसाईटचा दावा
हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विमान अपघातानंतरचे शब्द होते असा दावा एका www.bosefiles.info या ब्रिटिश वेबसाईटने केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारे प्रत्यक्षदर्शींचे जबाब एका ब्रिटिश वेबसाईटने खुले केले आहेत. www.bosefiles.info असं या साईटचं नाव असून जी माहिती दिलीय प्रत्यक्षदर्शी तसेच ब्रिटिश गुप्तचरखात्याच्या अहवालावर आधारीत असल्याचंही म्हटलंय. नेताजी १८ ऑगस्ट १९४८ या दिवशी विमानअपघातात तैवान येथे मृत्युमूखी पडल्याचं सांगण्यात येत होतं. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी या जापनीज बाँबर विमानाला व्हिएतनाम येथल्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर ३० ते ४० मीटर अंतरावर उडाल्यावर लगेचच स्फोट होत आग लागली. धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर हे विमान कोसळलं. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्याने त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असं नमूद करण्यात आलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
जलयुक्त शिवारसाठी दिलेले 32 चेक बाऊन्स
जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले चेक ही निव्वळ चमकोगिरी होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 32 चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील अनेक चेकवर भाजप नेत्यांची नावं आहेत. दरम्यान, हे चेक बाऊन्स होत असतील तर त्यांच्यावर कलम 138 नुसार कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीनं 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेला गालबोट
नागपूर : गतवेळचा ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरीनं माती विभागाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विजयने या विभागाच्या उपांत्यपूर्व लढतीत विलास डोईफोडेला अस्मान दाखवलं. मात्र प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळं गालबोट लागलं. महेश मोहोळ आणि राहुल खाणेकर या पुण्याच्या मुळशी तालुक्यातील दोन मल्लांमधल्या सामन्यानंतर आखाड्याबाहेर गोंधळ माजला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातून पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या महेश मोहोळनं उपांत्य फेरी गाठली आहे. महेशनं उपांत्यपूर्व फेरीत मुळशीच्याच राहुल खाणेकरवर मात केली. मुळशी तालुक्यातल्या या दोन पैलवानांची लढत पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी दुपारीच पुण्याहून विमानानं नागपूर गाठलं. दोन तगड्या पैलवानांमधल्या द्वंद्वात अखेर महेशनं पाच गुणांनी विजय साजरा केला.
रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस व तिच्या पतीचे अपहरण.
मॅनहोलच्या तुटक्या झाकणामुळे पाय मोडला, नोकरी गमावली, BMC ला दीड कोटीची नोटीस
रस्त्यावरच्या तुटलेल्या मॅनहोलमध्ये पाय गेल्याने एक माणूस जखमी झाला आणि परिणामी त्याला नव्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. या माणसानं मुंबई महापालिकेला नुकसानभरपाईपोटी दीड कोटी रुपयांची नोटीस बजावली असल्याची बातमी मुंबई मिररने दिली आहे. विजय हिंगोरानी, बिझिनेस स्ट्रॅटेजिस्ट आहेत आणि बेंगळूरमधल्या एका नोकरीसाठी त्यांना ऑफर आली होती. २९ नोव्हेंबर रोजी ते वांद्र्याच्या कार्टर रोड येथील मॅनहोलमध्ये झाकण तुटलेलं असल्यामुळे पडले. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दोन महिन्यांच्या या काळात त्यांना नव्याने मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. त्यामुळे हिंगोरानी यांनी मुंबई महापालिकेला शारिरीक इजेपोटी आणि उत्पन्नाचे साधन गमावल्यापोटी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे.
दादरमध्ये छबिलदास शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार
दादरमधील छबिलदास शाळेतील एका विद्यार्थिनीवर कॅंटिन कर्मचा-यांने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या शाऴेत काल संध्याकाळच्या दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील मुले आणि त्यांच्यासोबत आलेले पालक घरी निघाले. मात्र पाचवीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थिनी दिसेनाशी झाली. त्यानंतर तिचा शिक्षकांनी आणि पालकांनी शोध घेतल्यानंतर ती शाळेच्या बाथरुमजवळ रडताना सापडली. यावेळी तिने आपल्यावर ओढवलेला प्रसंग पालकांना सांगितला.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
बीडमध्ये धारदार शस्त्राने महिलेचं नाक कापलं
धारदार शस्त्राने महिलेचं चक्क नाक कापल्याची घटना परळी तालुक्याच्या धर्मापुरी परिसरात घडली आहे. लक्ष्मी आत्माराम कांदे असं या महिलेचं नाव आहे. या घटनेत 30 वर्षीय लक्ष्मी कांदे गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरु आहे. दरम्यान, महिलेचं नाक कोणी आणि का कापलं हे स्पष्ट झालेलं नाही. तसंच या प्रकरणी अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही. मात्र हल्लेखोर महिलेच्या ओळखीचाच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सेल्फीच्या नादात बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात दोघे बुडाले, मुलीचा मृत्यू
मुंबईच्या बॅण्डस्टॅण्डवर सेल्फी काढण्याच्या नादानं एका मुलाचा आणि एका मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. बॅण्डस्टॅण्डच्या किनाऱ्यावर सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तरन्नुम, कस्तुरी, नाझिया या तीन मैत्रिणी समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढत होत्या, त्यावेळी तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवण्य़ासाठी गेलेल्या रमेश नावाच्या तरूणानं प्राणांची बाजी लावत कस्तुरी आणि नाझियाला वाचवलं. दोघींना वाचविणाऱ्या रमेशला मात्र, तरन्नुमला वाचवण्यात यश आलं नाही. तरन्नुमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर रमेशही पाण्यात बुडाला. तरन्नुमचा मृतदेह सापडला आहे. तर रमेशच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
वर्धा : पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून हत्या केल्याप्रकरणी पित्याला अटक
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहताना पठाणकोटमधल्या नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढला
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे ट्रकची पोलिसांच्या मोटारसायकलला धडक बसून १ जण ठार तर १ जखमी.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्याविरोधात अडीज कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
No comments:
Post a Comment