नमस्कार लाईव्ह २९-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पाश्चिमात्य देशांना हादरवणाऱ्या ‘झिका’ला रोखण्यासाठी भारत सज्ज
२- फेसबुकचे शेअर्स १३ टक्क्यांनी वधारल्याने सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती ६ अब्ज डॉलरने वाढली
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- अक्षयचा 'एअरलिफ्ट' चांगला पण पूर्णत: सत्य नाही : परराष्ट्र मंत्रालय
४- भारताने कांगारुंना लोळवलं, टी ट्वेण्टी मालिका जिंकली
५- भारतीय महिलांचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर 10 विकेट्सने मात
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- वसईजवळ आकाशात संशयास्पद पॅराशूट, एटीसीकडून चौकशी सुरु
७- मुख्यमंत्री येतात, घोषणा करुन निघून जातात, राणेंचं टीकास्त्र
८- काँग्रेसची मुस्कटदाबी करण्याचे भाजपचे कारस्थान - अशोक चव्हाण
९- ओदीशा; बालासोर येथे एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण
१०- मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून दत्ता पडसळगीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
११- केरळ सोलर घोटाळा : मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या अटकेला उच्च न्यायालयाची २ महिन्यांची स्थगिती
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- कोल्हापूरच्या पोरीचा ऑस्ट्रेलियात डंका, अनुजा पाटील टीम इंडियाचा कणा
१३- मुंबई मेट्रोची दरवाढ 11 फेब्रुवारीपर्यंत टळली
१४- सिंधुदुर्गात माकड तापामुळे एक जण दगावला
१५- मुखेड; मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी चामलवाड तर कार्यअध्यक्षपदी गुमडे यांची निवड
१६- मुक्रमाबाद; मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी चामलवाड तर कार्यअध्यक्षपदी गुमडे यांची निवड
१७- मुखेड; मोहनावती महिला मंचा कडुन "मुखेड लेडी आयकाँन " स्पर्धेचे आयोजन
१८- ठाणे - मासिक पाळीच्या त्रासामुळं अंबरनाथमधील तरुणीची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- विष्णूरुपातल्या धोनीला सर्वोच्च नायालयाचा दिलासा
२०- एक देश, एक दिवस अन् तीन-तीन विजय
२१- सानिया- मार्टिनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://files.appsgeyser.com/Namaskar%20Live.apk?dl=true
===============================
भारताने कांगारुंना लोळवलं, टी ट्वेण्टी मालिका जिंकली
मेलबर्न : भारताच्या महिला संघाने टी ट्वेण्टी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर, धोनी ब्रिगेडनेही कांगारुंना त्यांच्याच मातीत लोळवलं आहे.
टीम इंडियाने मेलबर्नमध्येही तिरंगा फडकवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी ट्वेण्टी मालिका 2-0 अशी खिशात टाकली आहे. दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला.
टीम इंडियाने मेलबर्नमध्येही तिरंगा फडकवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी ट्वेण्टी मालिका 2-0 अशी खिशात टाकली आहे. दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला.
या विजयासह भारताने वन डे मालिकेतील पराभवाचे उट्टे काढले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियासमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. कांगारुंना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 157 धावाच करत आल्या.
भारताकडून नवख्या बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येक दोन तर अश्विन, पांड्या आणि युवराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. युवराजने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या 1 धावेवर माघारी धाडलं.
============================================================
वसईजवळ आकाशात संशयास्पद पॅराशूट, एटीसीकडून चौकशी सुरु
मुंबई : एअर इंडियाच्या विमानातल्या कॉकपिट क्रू मेंबर्सनी आज वसईहून 6 हजार फूट उंचीवर 4 संशियत पॅराशूट बघितल्याची तक्रार एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला केली. पिवळ्या, लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचे पॅराशूट बघितल्याचं कॉकपिट क्रू मेंबरनं म्हटलं आहे.
एअर बस क्रमांक 319 हे विमान मुंबईहून चेन्नईला निघालं असताना सकाळी साडे नऊच्या सुमारास चार पॅराशूट दिसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई आणि मुंबईलगतच्या आकाशात संशयास्पद पॅराशूट दिसण्याची जानेवारी महिन्यातली ही तिसरी घटना आहे. या आधी पवन हंस हेलिकॉप्टरच्या पायलटनं पॅराशूट बघितल्याची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत एअर इंडियाच्या प्रवाशांनीही पॅराशूट बघितल्याची तक्रार केली होती.
दरमन्यान, वसईच्या आकाशात पॅराशूट दिसल्याच्या तक्रारीनंतर पोलिस आणि एटीसीने या तपास सुरु केला आहे.
अक्षयचा 'एअरलिफ्ट' चांगला पण पूर्णत: सत्य नाही : परराष्ट्र मंत्रालय
नवी दिल्ली : अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ला चाहत्यांनी लिफ्ट केलं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगला गल्लाही जमवला आहे. पण राजनीतीज्ञ आणि काही अधिकारी ‘एअरलिफ्ट’वर खुश नाहीत. ‘एअरलिफ्ट’ सिनेमा म्हणून चांगला आहे पण तथ्याच्या बाबतीत अपूर्ण आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. ”एअरलिफ्ट” चित्रपटात अक्षय हा रणजित कटियाल या कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीय व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे. इराक-कुवेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमधल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या रणजित कटियालची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सिनेरसिकांनी हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला आहे.
==================================================
एक देश, एक दिवस अन् तीन-तीन विजय
मेलबर्न: ऑस्ट्रेलियात खेळाच्या मैदानावर आज भारतानं निर्विवादपणे वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत भारतनं चक्क तीन-तीन विजयाला गवसणी घातली आहे.
आजच्या दिवसात भारतीय खेळाडूंनी तीन मोठे विजय मिळवले. पहिल्यांदा भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाला टी-20 सामन्यात 10 विकेटनं मात दिली. तर दुसरीकडं सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांनी ऑस्ट्रेलिया ओपनच्या मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. तर भारताचा आजच्याच दिवसातील तिसरा विजय टीम इंडियानं मिळवला. धोनीच्या शिलेदारांनी ऑस्ट्रेलियाला 27 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
==================================================
पाश्चिमात्य देशांना हादरवणाऱ्या ‘झिका’ला रोखण्यासाठी भारत सज्ज
नवी दिल्ली : झिका या तापाने सध्या पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिकेपाठोपाठ आता हा ताप उत्तर अमेरिकेतही पोहोचला आहे. डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण पाश्चिमात्य जगत चिंता व्यक्त केली जात आहे. या तापाचा भारतात शिरकाव होऊ नये, यासाठी भारत सरकारने झिका विषाणूंच्या नियंत्रणासाठी एका विशेष गटाची स्थापना केली आहे.
झिका विषाणूंचा उत्तर अमेरिकेत शिरकाव
आधी ब्राझिलपुरतं मर्यादित असणाऱ्या झिका विषाणूंनी आता उत्तर अमेरिकेत शिरकाव केला आहे. त्यामुळे सुमारे 40 लाख अमेरिकन नागरिकांना झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूची गंभीर दखल घेत हाय अलर्ट जारी केला आहे.
भारत ‘झिका’चा मुकाबला करण्यासाठी सज्ज
आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी झिका विषाणूंबाबत सरकार गंभीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, या विषाणूंना भारतात शिराकव करु न देण्यासाठी विशेष गटाची स्थापना केल्याचीही जे. पी. नड्डा यांनी माहिती दिली.
==================================================
मुख्यमंत्री येतात, घोषणा करुन निघून जातात, राणेंचं टीकास्त्र
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
“फडणवीस सरकारमध्ये विकास पूर्णत: ठप्प झाला आहे. सरकारनं याची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री येतात आणि घोषणा करुन निघून जातात. मात्र विकास कामासाठी पैसे येत नाही” अशी टीका राणेंनी केल.तसंच जैतापूरच्या जमिनी हस्तांतरण करताना जो दर दिला तोच दर कोकणात महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
महामार्गाच्या चौपरीकरणासाठी पोलीस घरात घुसून जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असतील, तर कोकणात तसं होऊ देणार नाही असा इशाराही राणेंनी दिला.
राणेंनी एकीकडे राज्य सरकारवर टीका केली. मात्र दुसरीकडे गडकरी शब्द पाळतात म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
==================================================
कोल्हापूरच्या पोरीचा ऑस्ट्रेलियात डंका, अनुजा पाटील टीम इंडियाचा कणा !
मेलबर्न : भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेण्टी मालिकेत एकहाती विजय मिळवला. तीन सामन्यांची मालिका मिताली राजच्या टीम इंडियाने 2-0 अशी खिशात टाकली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघाचा तब्बल 10 विकेट राखून विजय मिळवला.
या मालिकेत एका मराठमोळ्या मुलीने भारदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात भारताने अशक्यप्राय विजय मिळवला. विजयी चौकार ठोकून टीम इंडियाला पहिला विजय मिळवून देणारी मराठमोळी फलंदाज भारतीय संघाचा कणा बनली आहे. ती आहे कोल्हापूरची अनुजा पाटील.
कोल्हापूरच्या अनुजाचा विजयी चौकार
अडलेडच्या मैदानात पहिल्या टी ट्वेण्टीत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन महिलांचं अशक्यप्राय 141 धावांचं लक्ष्य मिताली राजच्या भारतीय संघाने पाच विकेट राखून सहज पार केलं.
या सामन्यात कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने धडाकेबाज कामगिरी केली. आधी गोलंदाजीत अनुजाने 3 षटकांत टिच्चून गोलंदाजी केली. यामध्ये तीने 16 धावा देत एक विकेट घेतली.
मुंबई मेट्रोची दरवाढ 11 फेब्रुवारीपर्यंत टळली
मुंबई : मुंबई मेट्रोची भाववाढ आता 11 फेब्रुवारीपर्यंत टळली आहे. कारण हायकोर्टाने तूर्तास भाववाढ करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे सध्यातरी मुंबईकरांना भाववाढीला सामोरं जावं लागणार नाही.
आजच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने एमएमआरडीए आणि रिलान्सला चांगलंच झापलं.
सुप्रीम कोर्टाने 27 जानेवारीच्या सुनावणीत ज्या निर्देशांमध्ये तांत्रिक चुका आहेत, त्या सुधारण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
रिलायन्सने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने आज म्हणजे 29 जानेवारीला याप्रकरणाचे निर्णय देण्याचा आदेश दिला होता. मात्र आजची तारीख ही हायकोर्टानेच डिसेंबरमध्ये दिली होती. शिवाय दोन्ही पक्षकारांनी सुप्रीम कोर्टासमोर याबाबतची माहिती दिली नव्हती. जर दोन्ही पक्ष राजी असतील तर मुंबई हायकोर्ट आजच आपला निर्णय देऊ शकतं, असं कोर्ट म्हणालं.
मात्र याबाबात असहमती दर्शवत दोन्ही पक्षकारांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन तांत्रिक चुका सुधारण्याची हमी दिली.
==================================================
भारतीय महिलांचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर 10 विकेट्सने मात
मेलबर्न : मिताली राजच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत 2 – 0 अशी धूळ चारून मालिकेवर कब्जा केला आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघाचा तब्बल 10 विकेट राखून विजय मिळवला.
पावसामुळे व्यत्यय आणलेल्या या सामन्यात, डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर 10 षटकात 66 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान भारताच्या सलामीच्या जोडीने अवघ्या 9.1 षटकांतच पूर्ण केलं. कर्णधार मिताली राजने 32 चेंडूत 37 तर स्मृती मंधनाने 24 चेंडूत 22 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने 18 षटकांत 8 बाद 125 धावा केल्या होत्या.
भारताकडून झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन, तर पूनम यादव आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यापूर्वी पहिला टी ट्वेण्टी सामना भारताने 5 विकेट्स राखून जिंकला होता. आता तिसरा टी ट्वेण्टी सामना 31 जानेवारीला सिडनीत खेळवण्यात येईल.
सानिया- मार्टिनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली
सिडनी: भारताच्या सानिया मिर्झानं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिरंगा फडकावला आहे. सानियानं स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचं विजेतेपद मिळवलं.
सानिया आणि मार्टिना या अव्वल मानांकित जोडीनं अँड्रिया लावाकोव्हा आणि ल्युसी रॅडेका या चेक प्रजासत्ताकच्या जोडीवर 7-6, 6-3 अशी मात केली.
महिला दुहेरीत ‘सानटिना’चा हा सलग 36वा विजय ठरला. या विजयासह सानिया आणि मार्टिनानं सलग तिसरं ग्रँड स्लॅम जेतेपदही आपल्या नावे केलं आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनमध्येही ही जोडी अजिंक्य ठरली होती.
सिंधुदुर्गात माकड तापामुळे एक जण दगावला
सिंधुदुर्ग – 29 जानेवारी : राज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आढळून आलेल्या माकडतापा(क्यासनूर फॉरेस्ट डीसीज)च्या रुग्णांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेलीय. या तापामुळे एकाचा मृत्यू झालाय.
सिंधुदुर्गातल्या केर गावात लागण झालेल्या या तापाच्या रुग्णांपैकी 18 रुग्णांचे रक्तनमुने माकडतापाच्या आजाराचे आढळले आहेत. एक जण या तापाने दगावला असून सध्या या गावात आरोग्य विभागाची दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. 4 जानेवारीपासून या गावात तापाचे रुग्ण आढळत असून हा ताप विषाणूजन्य असल्यामुळे कोणतीही लस सध्या तरी या आजारावर उपलबध नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतंय.
प्राथमिक लक्षणे
- अचानक थंडी , ताप आणि तीव्र डोकेदुखी
- अचानक थंडी , ताप आणि तीव्र डोकेदुखी
काय आहे माकड ताप ?
- भारतात सर्वप्रथम 1957 साली कर्नाटकच्या क्यासनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला
- कर्नाटकच्या पाच जिल्ह्यात 400 ते 500 जणांना या तापाने ग्रासलं होतं.
- बाधीत किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेल्या गोचीड माणसाला चावल्यास हा आजार पसरतो
- 2012 मध्ये कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात या तापाचे 292 रुग्ण आढळले
- गेल्यावर्षी गोव्यातल्या वाळपई तालुक्यातल्या चार जणांचा यामुळे मृत्यू
- या आजारात मृत्यूचं प्रमाण पाच टक्के
- महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात हा आजार आढळून आलाय
- तामिळनाडू आणि केरळमधल्या काही भागातही या आजाराचे रुग्ण आढळले
- भारतात सर्वप्रथम 1957 साली कर्नाटकच्या क्यासनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला
- कर्नाटकच्या पाच जिल्ह्यात 400 ते 500 जणांना या तापाने ग्रासलं होतं.
- बाधीत किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेल्या गोचीड माणसाला चावल्यास हा आजार पसरतो
- 2012 मध्ये कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात या तापाचे 292 रुग्ण आढळले
- गेल्यावर्षी गोव्यातल्या वाळपई तालुक्यातल्या चार जणांचा यामुळे मृत्यू
- या आजारात मृत्यूचं प्रमाण पाच टक्के
- महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात हा आजार आढळून आलाय
- तामिळनाडू आणि केरळमधल्या काही भागातही या आजाराचे रुग्ण आढळले
==================================================
काँग्रेसची मुस्कटदाबी करण्याचे भाजपचे कारस्थान - अशोक चव्हाण
सरकारची लोकविरोधी धोरणे काँग्रेस पक्षाने चव्हाट्यावर आणल्यामुळे भाजपने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. अशी टीका काँग्रेस खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सीबीआयसारख्या तपास यंत्रणांवर दबाव आणून बिनबुडाच्या आरोपांखाली काँग्रेस नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या प्रकाराला काँग्रेस भीक घालणार नाही. काँग्रेस यापुढेही अधिक आक्रमकपणे शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत राहिल असेही ते म्हणाले. विरोधी पक्षातील नेत्यांवर बिनबुडाच्या आरोपांखाली कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे हे सरकार भाजप नेत्यांच्या गैरव्यवहाराबद्दल मात्र चकार शब्द काढत नाही.
आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणामध्ये माझे नाव आरोपपत्रातून वगळण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. याबाबत सीबीआय व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे नोटीससुद्धा दिलेली आहे. तरीही केवळ राजकीय आकसापोटी कायदेशीर पैलुंचा विचार न करता भाजप सरकारने सीबीआयवर दबाव आणून राज्यपालांना माझ्याविरूद्ध खटला चालविण्याची परवानगी मागण्यास भाग पाडले असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.
भाजप नेत्यांवरील आरोपांची साधी चौकशीही केली जात नाही. डाळ भाववाढ प्रकरण, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे शोषण करण्याचा प्रकार, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे विविध आरोप, खोटी शैक्षणिक प्रमाणपत्रे अशा विविध प्रकरणांमध्ये सरकारने आपल्या नेत्यांना विनाचौकशी क्लीन चीट दिली आहे. यातून भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते असे म्हणाले
==================================================
विष्णूरुपातल्या धोनीला सर्वोच्च नायालयाचा दिलासा
एका मासिकाच्या मुखपृष्ठावर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांच्या भावना दुखावल्यामुळे त्याच्या विरुद्ध आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्हा येथील एका स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे धोनीला दिलासा मिळाला आहे.
२०१३ मधील संबंधित छायाचित्रात धोनीच्या हातात खाण्याच्या विविध वस्तू आहेत. यामध्ये बुटाचा समावेश होता. छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी तक्रार दाखल केली होती. स्थानिक विश्व हिंदू परिषदचे श्याम सुंदर यांनी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, भगवान विष्णूच्या रूपातील माझे छायाचित्र काढले नव्हते. तसेच त्या छायाचित्रासाठी मासिकाकडून कोणतेही पैसे घेतले नव्हते, असे धोनीने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये धोनीविरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते.
========================================
मुक्रमाबाद; मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी चामलवाड तर कार्यअध्यक्षपदी गुमडे यांची निवड
मुक्रमाबाद .रज्जाक कुरेशी
येथील मराठी पञकार संघाची आज रविवार दी.24 रोजी जेष्ठ पञकार अरुण खळुरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे वार्षिक बैठक घेण्यात आली या बैठकीत मराठी पञकार संघाची नुतण कार्यकारणी सर्वानुमते घोषीत करण्यात आली .
या वार्षिक कार्यकारणी बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी गंगाधर चामलवाड यांची फेरनिवड करण्यात आली.तर कार्यअध्यक्ष म्हणून दादाराव गुमडे, उपाध्यक्ष संजय दमकोंडवार, सचिव भाऊसाहेब बनबरे, यांची नव्यानं निवड करण्यात आली.तर कार्यकारणी सदस्य म्हणून ..संतोष हेसे, विनोद आपटे, शिवाजी वाडीकर, नंदकुमार खंकरे, मझर पठाण, लक्ष्मण कोळेकर, रज्जाक कुरेशी ,काशीनाथ पांचाळ, यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुञसंचलन भाऊसाहेब बनबरे यांनी केले तर आभार अशोक लोणीकर यांनी केले .
================================================
मोहनावती महिला मंचा कडुन "मुखेड लेडी आयकाँन " स्पर्धेचे आयोजन
मुखेड :- रियाज शेख
मुखेड येथील मोहनावती महिला मंच या महिला संस्थेकडुन हळदी-कुंकु आयोजनासह शहरातील महिलांच्या कलागुण व कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी ' मुखेड लेडी आयकाँन ' ही महिलांसाठी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. अशी माहीती मंचाच्या अध्यक्षा डाँ.दिपाली रँपनवाड व सचिव पुष्पा बियाणी यांनी दिली आहे.
अनेक वर्षापासुन मुखेड परिसरात मोहनावती महिला मंचाने अनेक समाज उपयोगी उपक्रम, कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शासकिय रुग्णालयात 'आईचा घास', मातृ सन्मान, गौरव सावित्रीच्या लेकीचा, आम्ही नवदुर्गा आदींसह अनेक विशेष उपक्रमांचे आयोजन झाले आहे. यावर्षी हळदी कुंकवाच्या आयोजनासह मुखेड शहरातील महिलांच्या अंगभूत असलेल्या कलागुणांसह कार्यकौशल्य, सामाजिक जाण आणि बुध्दी चातुर्य यास वाव मिळविण्यासाठी शनिवार दि. 6 फेब्रुवारी 2016 रोजी आर्यवैश्य मंगल कार्यालयात दिवसभर " मुखेड लेडी आयकाँन " अर्थात परिपूर्ण व सक्षम महिला स्पर्धा आयोजीत केली आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस काढुन आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
यास्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदऊन आपले कौशल्य दाखवण्याचे आवाहन मोहनावती महिला मंचाच्या डाँ.दिपाली श्रावण रँपनवाड, माला दिलीप पुंडे, पुष्पा जगदीश बियाणी, संगीता नंदकुमार मडगुलवार, सविता देबडवार, कविता हनमंत आगलावे, आशा सत्यवान गरुडकर आदींनी केले आहे.
==============================================
मुखेड; माहिती अधिकार तपास समितीच्या मुखेड ता.अध्यक्षपदी विजय बनसोडे तर शहराध्यक्ष पदी
शेख आयुब
मुखेड :- रियाज शेख
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विजय बनसोडे यांची माहीती अधिकार तपास समितीच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर शहराध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते शेख आयुब हासनसाब यांची निवड करण्यात आली.
माहीती अधिकार तपास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डि.पी.अनंतवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर यांनी भ्रष्टाचाराविरुध्द व अन्यायाविरुध्द जनसामान्य जनतेला आपला न्याय मिळवुन देण्यासाठी विजय बनसोडे व शेख आयुब यांची निवड केली आहे. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष अमृत नरंगलकर, जिल्हा संघटक कल्याण पाटील दरेगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या निवडीबद्दल अनेक स्तरावरुन त्यांचे अभिनंदन व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहे.
=================================================
मोहनावती महिला मंचा कडुन "मुखेड लेडी आयकाँन " स्पर्धेचे आयोजन
मुखेड :- रियाज शेख
मुखेड येथील मोहनावती महिला मंच या महिला संस्थेकडुन हळदी-कुंकु आयोजनासह शहरातील महिलांच्या कलागुण व कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी ' मुखेड लेडी आयकाँन ' ही महिलांसाठी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. अशी माहीती मंचाच्या अध्यक्षा डाँ.दिपाली रँपनवाड व सचिव पुष्पा बियाणी यांनी दिली आहे.
अनेक वर्षापासुन मुखेड परिसरात मोहनावती महिला मंचाने अनेक समाज उपयोगी उपक्रम, कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शासकिय रुग्णालयात 'आईचा घास', मातृ सन्मान, गौरव सावित्रीच्या लेकीचा, आम्ही नवदुर्गा आदींसह अनेक विशेष उपक्रमांचे आयोजन झाले आहे. यावर्षी हळदी कुंकवाच्या आयोजनासह मुखेड शहरातील महिलांच्या अंगभूत असलेल्या कलागुणांसह कार्यकौशल्य, सामाजिक जाण आणि बुध्दी चातुर्य यास वाव मिळविण्यासाठी शनिवार दि. 6 फेब्रुवारी 2016 रोजी आर्यवैश्य मंगल कार्यालयात दिवसभर " मुखेड लेडी आयकाँन " अर्थात परिपूर्ण व सक्षम महिला स्पर्धा आयोजीत केली आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस काढुन आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
यास्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदऊन आपले कौशल्य दाखवण्याचे आवाहन मोहनावती महिला मंचाच्या डाँ.दिपाली श्रावण रँपनवाड, माला दिलीप पुंडे, पुष्पा जगदीश बियाणी, संगीता नंदकुमार मडगुलवार, सविता देबडवार, कविता हनमंत आगलावे, आशा सत्यवान गरुडकर आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment