नमस्कार लाईव्ह २७-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- म्हणून अब्जाधीश मार्क झुकरबर्ग रोज एका रंगाचा टीशर्ट घालतो
२- पाकमध्ये तिरंगा फडकावणार्या विराटच्या ‘त्या’ फॅनला 10 वर्षांचा तुरुंगवास
३- आफ्रिका, आशियामध्ये आढळणाऱ्या झिका तापाचा प्रसार दक्षिण अमेरिकेपाठोपाठ उत्तर अमेरिकेत
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- हाजी अली दर्गा प्रवेशासाठी मुस्लिम महिलांचा एल्गार
५- गिरगावात 'मेक इन इंडिया'च्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
६- राम मंदिरामुळे गरीबांना जेवण मिळेल का? विद्यार्थ्याचा सरसंघचालकांना सवाल
७- मुंबईतच नव्हे तर गुलाम अली यांचा ठाण्यातील नियोजित कार्यक्रमही होऊ देणार नाही - शिवसेना
८- शनिशिंगणापूर वाद: प्रवेशाआधी प्रथेचा विचार करा-शंकराचार्य
९- अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ चौकशी करू द्या, सीबीआयची राज्यपालांकडे विनंती
१०- गुजरातचे दहशतवाद विरोधी विधेयक राष्ट्रपतींनी फेटाळले
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- ..तर भुजबळांवर कारवाई करा, हायकोर्टाचे आदेश
१२- बेळगाव : 26 जानेवारीला अनोखा प्रताप, जेलमध्ये मुंबईच्या आयटम गर्ल्सचा डान्स
१३- सोशल मीडियात मुंबई पोलिसांचा बोलबाला, #HoshMeinAaoची चर्चा
१४- स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि सोलापूर
१५- राजपथावरील महाराष्ट्राच्या सोंगी मुखवटा नृत्याला प्रथम क्रमांक
१६- मराठवाढ्यात महीन्याला ७० शेतकरी आत्महत्या करतात - विभागीय आयुक्त
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- लातूर: शेतीच्या वादातून जवळगा येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्यासह मुलानं घेतले विष, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न
१८- भोपाल; छेड काढणाऱ्या तरुणाला बाल्कनीबाहेर दोरीने लटकवलं
१९- बल्लारी; मंत्र्यांचा कॉल होल्डवर ठेवला, पोलिस अधिकाऱ्याची बदली
२०- नागपूर; देशभक्तीच्या नावे धिंगाणा, भाजप नगरसेवकपुत्रांवर कारवाई
२१- मुंबईतील बेस्ट वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक?
२२- अमरावती; पतीच्या ‘व्हॉट्स अॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
२३- राजस्थान; सेल्फीच्या नादात परदेशी पर्यटक पडली विहिरीत
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- भारत सहिष्णूच देश, त्यास अन्य काहीही मानणे चुकीचे - तबलापटू झाकिर हुसैन
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://files.appsgeyser.com/Namaskar%20Live.apk?dl=true
सविस्तर
----------------------------------------
..तर भुजबळांवर कारवाई करा, हायकोर्टाचे आदेश
मुंबई: उत्तपन्नापेक्षा जास्त संपत्ती आणि भ्रष्टचाराच्या आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आता चांगलेच अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत न्यायालयाने आज पुन्हा एकदा तपास यंत्रणांना चांगलेच खडसावले. यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ आणि परिवार तपासात सहकार्य करत नाही अशी तक्रार न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने इडीला खडसावले. “भुजबळ जर सहकार्य करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात काय तपास सुरु आहे हे जनतेला कळलं पाहिजे. त्यानुसार दर चार आठवड्यांनी या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करा” असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने इडी आणि एसीबीला सुनावले. तसंच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी इडीला ४ महिने आणि एसीबीला २ महिन्यांचा वेळ मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आम आदमी पार्टीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अंमलबजावणी महासंचालनालय यांच्या विशेष पथकामार्फत चौकशी सुरू होती.

बेळगाव : 26 जानेवारीला अनोखा प्रताप, जेलमध्ये मुंबईच्या आयटम गर्ल्सचा डान्स
बेळगाव : देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असताना, तिकडे कर्नाटकातील तुरुंगात मात्र वेगळाच पराक्रम सुरु होता. विजापूर तुरुंगात चक्क मुंबईच्या आयटम गर्ल्सच्या नाच-गाण्याचं आयोजन करण्यात आल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे 26 जानेवारी या दिवशी तेही तुरुंगात आयटम गर्ल्सच्या डान्सचं आयोजन करण्यात आल्याने, सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. या नाचगाण्यादरम्यान आयटम गर्ल्सच्या नृत्यावर फिदा होऊन कैद्यांनी नोटाही उधळल्या . सध्या या घटनेची चर्चा कर्नाटक भर सुरु आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कारागृह महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जेलमध्ये जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत गण राज्योत्सव दिनाचा कार्यक्रम पार पडल्यावर त्याच व्यासपीठावर आयटम गर्ल्सनी नाच केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, तुरुंग खात्याचे वरीष्ठ अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहेत.

सोशल मीडियात मुंबई पोलिसांचा बोलबाला, #HoshMeinAaoची चर्चा
मुंबई: सोशल मीडियामध्ये उशीरानं पदार्पण करण्याऱ्या मुंबई पोलिसांची मागील काही दिवसांपासून मात्र, बरीच चर्चा सुरु आहे. मुंबई पोलिसांचं ट्विटर हॅण्डल आता बरंच अक्टिव्ह झालं असून त्यांच्या ट्विट्सची सोशल मीडियात बरीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला सजग करण्याचं काम आता मुंबई पोलीस करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मात्र, आकर्षक आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारी ट्विट मुंबई पोलिसांच्या अकांऊट करण्यात येत आहे. त्यामुळेच Mumbai Police हे ट्रेंडिंगमध्येही दिसून येतं.

गिरगावात 'मेक इन इंडिया'च्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
मुंबई : मेक इन इंडियाचा सप्ताह महाराष्ट्रभर साजरा करण्यात येणार आहे. मात्र याअंतर्गत गिरगाव चौपाटीवर आयोजित कार्यक्रमाला हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र नाईट हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. 13 फेब्रुवारीपासून ‘मेक इन इंडिया’ सप्ताह राज्यात साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्त 14 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरगाव चौपाटीवर असे कुठलेच कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही. त्यामुळे हा कार्यक्रम घेऊ नये, इतरत्र घेण्यास हरकत नाही, मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नाईट या कार्यक्रमात मुंबई आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानं राज्य सरकार काय पाऊल उचलतं, ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि सोलापूर
नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज पहिल्या टप्प्यातील 20 शहरांची यादी जाहीर केली. या यादीत पुणे, सोलापूरसह बेळगावचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ज्या 20 शहरांचा समावेश करण्यात आला आहे, त्या 20 शहरांना पुढील ५ वर्षात एकूण ५२ हजार कोटींचा निधी मिळणार आहे.
स्मार्ट सिटीत समावेश झालेली शहरं
भुवनेश्वर (ओदिशा)
पुणे (महाराष्ट्र)
जयपूर (राजस्थान)
सुरत (गुजरात)
कोची (केरळ)
अहमदाबाद (गुजरात)
जबलपूर- (मध्य प्रदेश)
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
सोलापूर (महाराष्ट्र)
दावणगिरी (कर्नाटक)
इंदूर (मध्य प्रदेश)
नवी दिल्ली (दिल्ली)
कोइंबतूर (केरळ)
काकीनाडा (आंध्र प्रदेश)
बेळगाव
उदयपूर (राजस्थान)
गुवाहाटी (आसाम)
चेन्नई (तामिळनाडू)
लुधियाना (पंजाब)
भोपाळ (मध्य प्रदेश)
महाराष्ट्रातून 10 शहरांचा प्रस्ताव, 2 शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश
देशभरातून केंद्र सरकारकडे एकूण 97 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आज 20 शहरांची नावं घोषित करण्यात आली.
महाराष्ट्रातून मुंबई, पुण्यासह एकूण 10 शहरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. राज्यातर्फे 29 हजार 647 कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च आहे. त्यापैकी मुंबईसाठी (1 हजार 118 कोटी ) महाराष्ट्रातील सर्वात कमी प्रस्तावित खर्च आहे.
शहर – प्रस्तावित खर्च
मुंबई – 1,118 कोटी
ठाणे – 6,630 कोटी
अमरावती – 5,305 कोटी
नागपूर – 3,409 कोटी
पुणे – 2,932 कोटी
सोलापूर – 2,921 कोटी
नाशिक – 1,945 कोटी
नवी मुंबई – 1,734 कोटी
पाणी, वीज पुरवठा, सांडपाणी यासारख्या पायाभूत सुविधांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आयटी कनेक्टिव्हिटी, इ-गव्हर्नन्स यासारख्या बाबींवर शहरांचा विकास करण्यात येईल.

राम मंदिरामुळे गरीबांना जेवण मिळेल का? विद्यार्थ्याचा सरसंघचालकांना सवाल
पुणे: राम मंदिर बांधल्यानं गरीबांना जेवण मिळेल का? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांना आज थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला. पुण्यात सुरू असलेल्या छात्र संसदेत विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नानंतर मोहन भागवत बचावात्मक पवित्र्यात दिसून आले. राम मंदिर झालं नाही, म्हणून गरीबांना जेवण मिळालं का? असा प्रतिसवाल करत भागवतांनी बचावात्मक पवित्रा घेतला. प्रश्न मंदिर बनवण्याचा नाही, तर समाजासमोर आदर्श हवे, त्याचं प्रतिक म्हणून राम मंदिर व्हायला हवं, असं उत्तर मोहन भागवतांनी विद्यार्थ्यांना दिलं. दरम्यान यानंतर धर्म नेहमी राजकारणात का आणला जातो, यासंदर्भात भागवतांना प्रश्न विचारण्यात आला.

भोपाल; छेड काढणाऱ्या तरुणाला बाल्कनीबाहेर दोरीने लटकवलं
भोपाळ : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला लोकांनी अजब शिक्षा दिली. या तरुणाला चक्क बाल्कनीबाहेर दोरीने बांधून ठेवलं. दिनेश सेंगर असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने छेड काढल्याचं समजताच परिसरातील लोकांनी पहिल्यांदा त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर मुलाच्या तोंडाला काळं फासलं. दोन्ही हात-पाय बांधून त्याला बाल्कनीबाहेर लटकवलं. हा तरुण अनेक तरुणींची तसंच महिलांची छेड काढत असे. वारंवार सांगूनही त्याचे हे प्रकार सुरु होते. अखेर एका कुटुंबातील लोकांनी त्याला चर्चेच्या बहाण्याने घरी बोलावलं. वाद वाढल्यानंतर तरुणाच्या चेहऱ्याला काळं फासंलं. नंतर त्याला बाल्कनीबाहेर लटकवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाची सुटका केली. या प्रकरणी तरुणावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. तर कुटुंबातील दोन जणांवरही मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तरुणाला ज्या पद्धतीने बाल्कनीबाहेर बांधून ठेवलं होते, ते अतिशय धोकादायक होतं. दोरी सुटल्याने तो खाली पडला असता तर त्याचा जीवही गेला असता.

बल्लारी; मंत्र्यांचा कॉल होल्डवर ठेवला, पोलिस अधिकाऱ्याची बदली
बल्लारी : कॉल होल्डवर ठेवला म्हणून कर्नाटकच्या एका मंत्र्याने वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याची बदली केली आहे. प्रशासकीय कारणांमुळेच बदली झाली असून माझी यात कोणतीही भूमिका नाही, असा दावा मंत्री करत आहेत. परंतु या मंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांची पोलखोल झाली आहे.
…म्हणून अनुपमा शिनॉय यांची बदली केली
या व्हिडीओमध्ये कर्नाटकचे श्रम मंत्री पी टी परमेश्वर नाईक दावा करत आहेत की, बल्लारीतील कुडलिगीच्या पोलिस उपअधीक्षक अनुपमा शेनॉय यांची बदली केली.
मंत्री म्हणाले की, “माझ्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचा आहे. मी अनुपमा शेनॉय यांच्यासोबत 42 सेकंद बोललो. पुन्हा कॉल केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे मी त्यांची बदली केली, हे खरं आहे. आम्हाला अशा अधिकाऱ्यांची गरज नाही जे जिल्ह्याच्या मंत्र्यांचं ऐकत नाहीत”
अधीक्षकांच्या कॉलसाठी मंत्र्यांचा कॉल होल्डवर
परमेश्वर नाईक यांनी 18 जानेवारी रोजी त्यांच्या कार्यलयातील कर्मचाऱ्याला कुडलिगीच्या पोलिस उपअधीक्षक अनुपमा शेनॉय यांना फोन लावण्यास सांगितलं. हा कॉल स्वत: अनुपमा यांनी उचलला. अनुपमा शिनॉय यांनी 30-35 सेकंद वाट पाहिली, पण समोरुन प्रतिसाद आल्याने त्यांनी फोन कट केला. यानतंर लागलीच अनुपमा शिनॉय यांच्या वरिष्ठांचा कॉल आला. त्यांच्याशी बोलत असताना, त्यांनी मंत्र्यांचा कॉल होल्डवर ठेवला. यानंतर मंत्र्यांनी पुन्हा अनुपमा यांना कॉल करुन प्रचंड झापलं. त्यानंतर या प्रकाराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी दिली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अनुपमा शेनॉय यांना बदलीचे आदेश मिळाले. शिवाय या तडकाफडकी बदलीचं कारणही सांगितलं नव्हतं.

मुंबईतच नव्हे तर गुलाम अली यांचा ठाण्यातील नियोजित कार्यक्रमही होऊ देणार नाही - शिवसेना
मुंबई : मुंबईतच नव्हे तर पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा ठाण्यातील नियोजित कार्यक्रमही होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात गुलाम अली यांच्या गझल कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र त्याला आता शिवसेनेने विरोध केला आहे. ठाण्यात 11, 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला गझल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. “राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात सांगितले की गोळ्यांच्या आवाजात पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, तीच भूमिका आमची आहे. हा देशाचा अपमान आहे. शहिदांना मरणोत्तर दिलेल्या पदकांचा अपमान आहे. गुलाम अलींना देशात बोलवून संरक्षण देण्याची भाषा करणं निचपणा आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. याशिवाय “जितेंद्र आव्हाड हे दहशतवादी हाफिज साईदलाही बोलवू शकतात. उद्या इशरत जहाँच्या नावाने पुरस्कार द्यायला कमी करणार नाहीत. देशाला सर्वात जास्त धोका अशा बाडग्यांपासून आहे. ठाण्यात काय करायचं ते बघू”, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
सेनेचा इशारा, मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर कालच गुलाम अली यांचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. शुक्रवार 29 जानेवारीला मुंबईतील अंधेरी येथील द क्लब या ठिकाणी गुलाम अली येणार होते. मात्र, शिवसेना चित्रपट सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानं आयोजकांनी माघार घेतली. याआधीही मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील गुलाम अलींचा नियोजित कार्यक्रम शिवसेनेमुळं रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी भाजप या कार्यक्रमाला संरक्षण देऊन पुढाकार घेणार का, हे पाहणं महत्वाचं आहे.

म्हणून अब्जाधीश मार्क झुकरबर्ग रोज एका रंगाचा टीशर्ट घालतो
न्यूयॉर्क : एखादा अब्जावधींच्या संपत्तीचा मालक रोज महागडे, डिझायनर कपडे वापरत असेल, एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नसेल, अशी तुमची अपेक्षा असणं साहजिक आहे. मात्र फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग अब्जाधीश असूनही रोज केवळ एखाद-दुसऱ्या रंगाचेच टीशर्ट घालताना दिसतो. कार्यक्रम कुठलाही असो, मार्क राखाडी रंगाच्या टीशर्टमध्येच वावरताना दिसतो. त्यामुळे हा मार्कचा आवडता रंग आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात पडणं साहजिक आहे. त्यातच मार्कने एका फेसबुक पोस्टमध्ये ‘पॅटर्निटी लीव्हवरुन परत येतोय, काय कपडे घालावे?’ असा प्रश्न विचारला आहे. हा फोटो 38 हजार यूझर्सनी शेअर केला असून साडेबारा लाख लाईक्स आणि 72 हजाराहून अधिक कमेंट्स आहेत. यात दोनच रंगांच्या सुमारे 15 टीशर्ट्सचा फोटो आहे. अनेकांनी ‘तू अब्जाधीश असूनही तुला फॅशनची हौस, आम्हाला तुझा अभिमान आहे’ असं म्हटलं आहे. एका मुलाखतीत मार्कला त्याच्या एकरंगी टीशर्टबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘अशा छोट्या-छोट्या गोष्टींवर मी आयुष्यातला मौल्यवान वेळ फुकट घालावावा, असं मला वाटत नाही’ असं उत्तर मार्कने दिलं होतं.
‘एका रिपोर्टनुसार जर तुम्ही कपडे निवडण्यावर आणि नाश्त्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करत बसाल, तर तुमची ऊर्जा वाया घालवत आहात. ऊर्जा वाया न घालवता, समाजासाठी प्रत्येक क्षणी काहीतरी करत राहावं, असं मला वाटतं’ असंही मार्कने सांगितलं

शनिशिंगणापूर वाद: प्रवेशाआधी प्रथेचा विचार करा-शंकराचार्य
मुंबई: शनिशिंगणापूर चौथऱ्यावरील महिला प्रवेशासबाबत शंकराचार्यांनी विरोधी सूर आवळला आहे. महिलांना सामाजिक न्याय मिळाला, मात्र हा धर्माचा विषय असल्यानं त्यांनी प्रथा-परंपरेचा विचार करावा, असं शंकराचार्य यांनी म्हटलं आहे. शिवाय शनी बोलवण्याचा नाही तर दूर करण्याचा देव आहे, यावरही महिलांनी गांभिर्यानं चिंतन करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र याआधी आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, श्री श्री रविशंकर यांच्यासहित अनेक साधू आणि नेत्यांनी महिला प्रवेशास पाठिंबा दिला आहे. शनीच्या चौथऱ्यावर महिला गेल्यास मूर्तीतून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांनी विपरित परिणाम होतो. त्यामुळे त्याठिकाणी महिलांना प्रवेश मिळत नाही, असं बोललं जातं. काल भूमाता ब्रिगेडनं यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाबाबत सकारात्मकरित्या चर्चा केल्याचं भूमाता ब्रिगेडकडून सांगण्यात आलं.

नागपूर; देशभक्तीच्या नावे धिंगाणा, भाजप नगरसेवकपुत्रांवर कारवाई
नागपूर : प्रजासत्ताक दिनी देशभक्तीच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्या भाजप नगरसेवकाच्या मुलांविरोधात कारवाई होणार आहे. रॅली काढणाऱ्यांविरोधात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. करण आणि अर्जुन यादव या दोघा भावांनी काढलेल्या रॅलीचं व्हिडिओ फुटेजची पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलांनी 700 मित्रांसह प्रजासत्ताक दिनी विनापरवानगी रॅली काढली होती. डीजेच्या तालावर रस्त्याच्या मधोमध हिडीस नृत्य करत युवकांनी वाहतूक कोंडी केली होती. ‘एबीपी माझा’ने दाखवलेल्या वृत्ताने भाजप नेत्याच्या पुत्रांचे हे प्रताप सर्वांसमोर आले, त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं.

अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ चौकशी करू द्या, सीबीआयची राज्यपालांकडे विनंती
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला राज्यपाल आणि मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदिल मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. आदर्श घोटाळ्याप्रकरणी जस्टीस पाटील अहवालात चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र राहुल गांधी यांच्या दबावामुळे तत्कालीन राज्यपालांनी सीबीआय चौकशीस परवानगी नाकारली, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला. आदर्श इमारतीत आपल्या पदाचा वापर करुन अनेक नातलगांना सदनिका दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर आहे.

मुंबईतील बेस्ट वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक?
मुंबई : मुंबईतील बेस्ट वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक सहन करावा लागण्याची शक्यता आहे. आगामी तीन वर्षांसाठी बेस्टने आपल्या वीजदरांमध्ये 15 टक्के वाढीची शिफारस केली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज वितरण नियामक महामंडळाकडे देणार असल्याचं समजतं. गेल्या काही महिन्यात बेस्टची वाहतूक व्यवस्था तोट्यात आहे. मुंबईत मेट्रो, मोनो रेल आल्यानंतर बेस्टच्या सेवेवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी मुंबईकरांना 15 टक्के दरवाढ सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

राजपथावरील महाराष्ट्राच्या सोंगी मुखवटा नृत्याला प्रथम क्रमांक
नागपूर : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या राजपथावर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या नृत्याचा गौरव करण्यात आला आहे. सोंगी मुखवटे या नृत्याला बाल विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या नृत्यामध्ये नाशिकच्या 20 शाळेतील 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. चैत्र पौर्णिमेला देवीच्या पूजेच्यावेळी सोंगी मुखवटे हा नृत्य प्रकार आदिवासी जिल्ह्यात सादर केला जातो. साधारणत: होळीनंतर हा नृत्यप्रकार सादर केला जातो. हातामध्ये काठी घेऊन हे नृत्य सादर केले जाते. ढोल, संबल आणि पावरी वाद्याचा यात वापर केला जातो. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे यापूर्वी सादर झालेल्या या नृत्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचा चित्ररथ यंदाच्या संचलनात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला होता, मात्र रोटेशन पद्धतीनुसार यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला नव्हता.

हाजी अली दर्गा प्रवेशासाठी मुस्लिम महिलांचा एल्गार
मुंबई: शनीच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशबंदीचा मुद्दा देशभर गाजत असतानाच, मुंबईत दर्गा प्रवेशासाठी मुस्लिम महिलांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर मुस्लिम महिलांनी आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळं मुस्लिम महिला आक्रमक झाल्या आहेत. हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’ (गाभारा) महिलांना प्रवेश मिळावा यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. मुस्लिम महिला संघटनाच यासाठी पावलं उचलत आहेत. त्यासाठी हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 15 व्या शतकात उभ्या राहिलेल्या या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नाकरताना दर्गा ट्रस्टने अजब युक्तीवाद केला आहे. दर्ग्याच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देणं हे इस्लामच्या विरोधात आहे. ते घोर पाप आहे, असं म्हणत, ट्रस्टने 2011 मध्ये महिलांना दर्गाबंदी केली.
पुरुषांसह महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यामुळे केरळचं शबरीमला मंदिर, शनी शिंगणापुरातील चौथरा आणि हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी या मुस्लिम महिलांनी केली आहे.
हायकोर्टात याचिका दर्गाबंदीविरोधात ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ अर्थात बीएमएमए ने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. “महिलांना अशाप्रकारची बंदी घालणं घटनेविरोधी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन भारतात महिला अधिकारांशी संबंधित महत्त्वाचं पाऊल उचलावं” असं याचिकेमध्ये म्हटलं आहे. याबाबत हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय देऊन, समानतेचा मापदंड उभा करावा. जेणेकरून भविष्यात महिलांना अशा अपमानाला सामोरं जावं लागणार नाही, अशी अपेक्षा बीएमएमएच्या सहसंस्थापक नूरजहाँ नियाझ यांनी व्यक्त केली आहे. तसंच हायकोर्टाने सर्व समाजाला सकारात्मक संदेश देऊन, महिलांचं धैर्य वाढवण्यास मदत करावी. मग त्या हिंदू असो वा मुस्लिम, सर्वांना पूजेचा, प्रार्थनेचा समान अधिकार आहे, हे दाखवून द्यावं, अशीही अपेक्षा नूरजहाँ यांनी केली आहे.

पाकमध्ये तिरंगा फडकावणार्या विराटच्या ‘त्या’ फॅनला 10 वर्षांचा तुरुंगवास
विराटनं ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या टी-20मध्ये 90 रन्स ठोकले होते. विराटच्या या तुफान फटकेबाजीमुळे उमर दराजने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावला. दराज हा पंजाबच्या ओकारा प्रांतात राहतो. हा भाग पाकिस्तानात येतो. दराजने घरावर तिरंगा ध्वज लावल्यामुळे त्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. 26 जानेवारीला पोलिसांनी दराजला ताब्यात घेतलं. त्याच्यावर कलम 123 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याखाली दराजला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. परंतु, मी, विराटचा खूप मोठा फॅन आहे. आपण जे काही केलं ते विराटच्या प्रेमापोटी केलं. मी भारतीय टीमचा समर्थक आहे. आणि अधिकार्यांनी ही बाब लक्षात घेऊन मला सोडून द्यावं अशी विनंती दराजने केलीये.

राजस्थान; सेल्फीच्या नादात परदेशी पर्यटक पडली विहिरीत
राजस्थान – 28 जानेवारी : सेल्फीचा मोह किती असावा यालाही काही मर्यादा असायला हव्यात. पण, सेल्फीच्या नादापायी मागील महिन्यात मुंबईत दोन मुलींचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर मुंबईत काही भाग नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले. पण राजस्थानमधल्या जुनागढमध्ये एक ऑस्ट्रियाची पर्यटकही अशाच सेल्फीच्या नादात विहिरीत पडली.फ्रिडेल ही तरुणी जुनागढमधला किल्ला बघायला आली होती. इथं सेल्फी काढतांना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. तिचा आरडाओरडा ऐकून आजुबाजूचे लोक तिथं आलं आणि त्यांनी तिला बाहेर काढलं. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वेळीच तिला वाचवलं त्यामुळे तिचा जीव वाचला.

आफ्रिका, आशियामध्ये आढळणाऱ्या झिका तापाचा प्रसार दक्षिण अमेरिकेपाठोपाठ उत्तर अमेरिकेत
आफ्रिका आणि आशियामध्ये आढळणाऱ्या झिका या तापाचा प्रसार दक्षिण अमेरिकेपाठोपाठ आता उत्तर अमेरिकेत होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्येही झिकाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण पाश्चिमात्य जगतात चिंता व्यक्त केली जात आहे. ब्राझील पुरते मर्यादीत असणाऱ्या झिकाने दक्षिण आफ्रिकेस वेगाने कवेत घेतले आणि आता त्याचा प्रसार इतर देशांमध्ये होऊ लागला आहे. कॅनडा आणि चिलीमध्ये मात्र झिकाचे विषाणू वाहून नेणारे डास आढळत नसल्याने तेथे झिकाचे रुग्ण आढळलेले नाहीत. झिका म्हणजे काय? झिका हे नाव युगांडामधील वनांच्या प्रदेशावरुन आलेले आहे. झिका विषाणू सर्वात प्रथम १९४७ साली युगांडात आढळून आला. त्यानंतर १९६८मध्ये नायजेरियामध्ये तो दिसून आला. त्यानंतर आफ्रिकेत सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, इजिप्त, गॅबन, सिएरा लिओन, टांझानिया, युगांडा तर आसियामध्ये भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, थायलंड या देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून आले. मात्र आता खरी काळजी दक्षिण अमेरिकेत वेगाने प्रसारित झाल्यामुळे वाढीस लागली आहे. ब्राझीलमधील उद्रेक बार्बाडोस, कोलंबिया, इक्वेडोर, एल साल्वाडोर, फ्रेंच गयाना, ग्वाटेमाला, गयाना, हैती, मेक्सीको, पनामा, प्युएर्टो रिको, सुरिनाम असा मध्य अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. झिकाचा डास आणि ताप: झिका तापाचे विषाणू एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरवले जातात. त्यामुळे या डास चावलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे विषाणू जाऊन त्यांना ताप, डोळे येणे, सांधे दुखणे तसेच पुरळ येणे अशा तक्रारी संभवतात. झिकाचा सर्वात मोठा धोका हा गर्भवतींना आहे. कारण झिकाचे विषाणू चावलेल्या महिलांच्या मुलांना जन्मत:च मायक्रोसिफली झाल्याचे आढळून आले आहे. तर प्रौढ व्यक्तींमध्ये तात्पुरता अर्धांग होऊ शकतो. उपाय: झिकावर दुर्देवाने अद्याप कोणतेही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळेच या रोगाची भीती पाश्चिमात्य देशांमध्ये वाढली आहे. गलियन बार सिंड्रोम या रोगात तात्पुरत़्या अर्धांगास दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा काही ठिकाणी वापर केला जात आहे. ब्राझीलमध्ये भेटी देऊन झिकाची सँपल्स गोळा करण्याची तयारी सध्या सुुरु करण्यात आलेली आहे. काही तज्ज्ञांनी झिकाला इबोला इतके काही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. झिकाशी सामना करण्यासाठी त्याच्या डासांना मारणे आणि त्यांना लांब ठेवणे हा एकमेव उपाय सध्या आहे. साचलेल्या पाण्यात हे डास उपजू नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरामध्ये आणि बाहेरही डास होऊ नयेत याची खबरदारी अमेरिकेत घेतली जात आहे. त्याचप्रमाणे लांब बाह्यांचे व पूर्ण कपडे घालण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मायक्रोसिफली: मायक्रोसिफली या आजारामध्ये बाळाच्या डोक्याचा आकार नेहमीपेक्षा फारच लहान असतो. बाळाच्या मेंदूची वाढ सामान्य वेगाने न झाल्यामुळे हे संऊवते. ब्राझील, व्हेनेझुएलामध्ये मायक्रोसिफली झिकामुळे वाढीस लागल्याने सर्व जगात अचानक खळबळ माजली आहे.

अमरावती; पतीच्या ‘व्हॉट्स अॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
पतीचे सतत मोबाइलवर राहणे, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर बिझी असणे, उशिरा झोपणे नि उशिरा उठणे, मित्रांसोबत हुंदडणे हा प्रकार पसंत न पडल्याने, अवघ्या महिन्याभरात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. मोर्शी येथील धर्मपाल तिवारी यांची कन्या पूनमचा विवाह अमरावतीच्या अभिजित त्रिवेदी याच्यासोेबत ३ जानेवारी रोजी झाला होता, पण महिना होण्यापूर्वीच पती-पत्नीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर व्यस्त असणे, रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे आणि मित्रांसोबत सतत बाहेर राहणे पूनमला आवडत नव्हते. या कारणावरून त्यांची सतत भांडणे होत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बुधवारीदेखील अभिजित सकाळी १०.३० वाजता उठला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या कल्याचे आढळून आले. तिला सुरुवातीला खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

No comments:
Post a Comment