श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 11- पशुपालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध पशु, अश्व, लालकंधारी, देवणी, संकरीत तसेच दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
दरवर्षी वळू व देवणी गटात जिल्हा परिषदेच्या वतीने चँम्पियनशिप देण्यात येते. यामध्ये नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील पशुपालक तीरुपती विठ्ठलराव कदम यांचा लालकंधारी अदात वळू माळेगाव यात्रेत एक लाखाचा पुरस्कार मिळवून चँम्पियन ठरला आहे.
उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील नारायण माधवराव खरात यांचा देवणी नरदोन दात याने चँम्पियनशिपमध्ये पन्नास हजारांचे पारितोषिक पटकावले, तर लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील दत्ता थोराजी सुरनर यांच्या लाल कंधारी मादी गाय गटाने पन्नास हजारांचे तर जळकोट तालुक्यातील कुनकी येथील बालाजी माधव तिडके यांच्या देवणी मादी गायी गटाने पंचविस हजाराचे पारितोषिक पटकावले आहे.
No comments:
Post a Comment