मुखेड :- रियाज शेख
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थींना आधार कार्ड क्रमांक दिल्याशिवाय धान्य मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी 15 जानेवारीच्या अगोदर आधार कार्ड क्रमांक संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास द्यावे अन्यथा आपणास मिळणारा धान्यपुरवठा बंद होणार आहे. दि.13 जानेवारी पर्यंत तालुक्यातील 205 दुकानदारांचे 35% आधार सिडींग झाल्याची माहीती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.
राज्यशासनाने धान्य व केरोसिन वितरणासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने स्वस्त धान्य लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. याविषयी दुकानदारांमार्फत अनेकवेळा सूचना देण्यात आल्या, परंतु अनेक लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व बँक खाते नंबर संबंधित दुकानदारांकडे जमा केले नाहीत. आधार कार्ड व बँक खाते दुकानदारांकडे देण्याचि अंतिम तारिख 31 डिसेंबर पर्यंत होती. त्यामुळे ज्या लाभार्थींनी अापले आधार कार्ड व बँक खाते क्रमांक दिले नाहीत, त्यांच धान्य सरकारने जानेवारी पासुन बंद केले आहे. यापुढेही जोपर्यंत आधार कार्ड व खाते क्रमांक देणार नाहीत, तोपर्यंत धान्यपुरवठा बंद राहणार आहे. म्हणुन शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व खाते क्रमांक स्वस्थ धान्य दुकानदारांकडे जमा करावें व याबाबत गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व तलाठी यांनी लाभधारकांमध्ये जनजागृति करावी असे आवाहण तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.
आधार सिडिंगची प्रकिया शिघ्र व्हावी म्हणुन तालुक्यातील जांब, बा-हाळी, मुक्रमाबाद व येवती येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष वरिल ठिकाणी भेट देवुन आधार सिडींग प्रक्रियेबाबत माहीती घेतली. यावेळी पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार, तलाठी बालाजी बोरसुरे, मंडळ अधिकारी पद्मावार उपस्थित होते.
" 'आधार' नसलेले लाभार्थी होणार 'निराधार' "
तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांचे स्वस्त धान्य वाटप शासन बंद करणार असल्याने सदर लाभार्थी हे 'निराधार' होणार आहेत. म्हणुन आधार कार्डाची मोहीम प्रभावीपणे राबवुन मग आधारकार्ड सक्तीचे करावें अशी मागणी आधार नसलेल्या लाभार्थ्यांकडुन होत आहे.
गेल्या दोन वर्षापासुन तालुक्यात भिषण दुष्काळ पडला आहे. बहुतांश मजूरांनी हाताला काम नसल्याने स्थलांतर केले आहे. यावर्षी सुध्दा दुष्काळसदृष्य परस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशी गंभीर परस्थिती असताना शासनाने आधार कार्ड नसल्याच्या नावाखाली स्वस्त धान्य वाटप बंद करुन त्यांना 'निराधार' करत आहे. म्हणुन प्रथम आधार कार्ड नोंदणी प्रभावीपणे राबवुन मगच स्वस्त धान्य लाभार्थ्यांना आधार सक्तीवे करावें अन्यथा आगामी काळात शासनाच्या निर्णया विरोधात जन आंदोलन होवु शकते असे चित्र दिसते.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 
No comments:
Post a Comment