~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- गेल्या महिन्यात इराक आणि सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटचे २५०० दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन
घेतला. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे 22 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अखेर आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
३- आमीर खानला 'अतुल्य भारत'च्या ब्रँड अम्बेसेडरवरुन हटवलं
अभिनेता आमीर खान आता केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाचं अभियान ‘अतुल्य भारत’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल. असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्य आमीरला भोवल्याचं म्हटलं जात आहे. ‘अतिथी देवो भव’ अभियानाचा करार प्रसून जोशी मॅकेन एरिक्सन लिमिटेड या एजन्सीद्वारे झालं होतं, जे आता संपलं आहे. त्या एजन्सीने आमीरची या कॅम्पेनसाठी निवड केली होती. तो करार संपल्याने आता आमीर या अभियानात नसेल, असं स्पष्टीकरण केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिलं. या कंपनीसोबत 2.69 कोटी रुपयात ‘अतुल्य भारत’ अभियानाचा करार झाला होता. मात्र तो करार रद्द झाल्याने आता आमीर खान अतुल्य भारतचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल.
४- बँकांची कामं आजच उरकून घ्या, उद्या 5 लाख बँक कर्मचारी संपावर
तुम्हाला बँकांची काही महत्वाची कामं असतील तर ती आजच उरकून घ्यावी लागणार आहेत. कारण उद्या देशभरातील ५ लाख बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळं शनिवार आणि रविवार असल्यानं बँका सलग ३ दिवस बंद राहतील. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, त्रावणकोर, म्हेसूर अशा एकूण ५ बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याचा धोरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्या निषेधार्ह उद्या संप पुकारण्यात आला आहे.. देशभरातील पाच लाख बँक कर्मचारी उद्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. परिणामी लाखो ग्राहकांची परवड होणार आहे. पाच बँकेंच्या विलीनीकरण करण्याच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने संपाची हाक दिल्याचे जनरल सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी सांगितलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- गजेंद्र चौहान आज FTII चा पदभार स्वीकारणार
अभिनेते गजेंद्र चौहान आज फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणार आहेत. विद्यार्थ्यांचा विरोध पाहता पोलिसांनी 17 विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे. गजेंद्र चौहान यांच्या निवडीला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. आपला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी तब्बल 139 दिवस आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनला बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी पाठिंबा दिला होता. गजेंद्र चौहान हे ‘महाभारत’मधील ‘युधिष्ठिर’च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहेत.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 9 जून 2015 रोजी गजेंद्र चौहान यांची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तेव्हापासून विद्यार्थ्यांचा विरोध कायम आहे.
६- पंढरपुरात भर चौकात पत्नी-मुलासमोरच युवकाची निर्घृण हत्या
पंढरपूर शहरात रात्री साडेआठच्या सुमारास सोमानाथ टाकणे नावाच्या व्यक्तीची तलवारीचे वार करत हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या समोरच असलेल्या भादुले चौकात हे भीषण हत्याकांड घडलं. सोमनाथ टाकणे पत्नी आणि मुलासह जात असताना अचानक दुचाकीवरुन 10 ते 12 शस्त्रधारी लोकांनी येऊन सोमनाथ यांच्या डोळ्यात चटणी टाकून नंतर त्यांच्या डोक्यात तलवारीचे वार केले. या हल्ल्यात सोमनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. यातील अनेकांना सोमनाथ यांच्या पत्नीनं ओळखलं असून सध्या हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. या जीवघेण्या हल्ल्यामागंच नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. मात्र, या हत्याकांडानं पंढरपूर शहरात दहशत पसरली आहे.
७- सोलापूर; सिद्धरामेश्वर यात्रेसाठी यंदा आत्पकालीन रस्ता वापरण्यास परवानगी
सिद्धरामेश्वर यात्रेसाठी यंदा आपत्कालीन रस्ता वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात ‘सह्याद्री’ अतिथीगृहात बैठक झाली. त्यात यावर्षी यात्रेसाठी रस्ता वापरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र पुढील वर्षी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून निर्णय घेण्यात येईल, असंही बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे.
८- श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष माऊली तथा ज्ञानेश्वर थोरात यांनी सबनीस यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आकुर्डी येथील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. “गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी होता. तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही. मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे मरायची लक्षणे होती. त्यामुळे पाडगावकरांआधीच मोदींना श्रद्धांजली द्यायची वेळ आली असती”, असं सबनीस म्हणाले होते.
९- चंद्रपूरमध्ये दारूबंदी कायम राहणार, नागपूर खंडपीठाने दारूबंदीविरोधातील याचिका फेटाळली.
१०- पठाणकोट हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे आज शवविच्छेदन
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- गोरक्षकांचा पर्दाफाश, कसायालाच विकले पोलिसांच्या ताब्यातले बैल
जिथे स्वार्थ असतो तिथे सगळं मागे पडतं, कोल्हापुरात सहा जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकायला जाणारे बैल पोलिसांना पकडून दिले आणि त्यातले बैल चोरुन ते कसायाला विकले. मुक्या बैलांचा यात जीव गेलाच पण गोरक्षणचा खोटा आव आणणार्यांचा चेहराही उघडा झाला.पोलिसांच्या ताब्यात असलेले हेच ते सहा आरोपी ज्यांनी नाट्यमयरित्या 4 बैल चोरले आणि त्याची कत्तल केली. सावंतवाडीहुन बैलकत्तलीसाठी बेळगावला नेले जात असल्याची टीप या सगळ्यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांच्या मदतीने विकायला जाणारे 25 बैल पकडले. हे बैल पोलिसांनी गोशाळेत ठेवले होते. या सहा पैकी तिघांनी पोलिसांच्या ताब्यातील बैलांपैकी 4 बैलांची चोरी केली आणि बेळगावमधील कसायांना कापण्यासाठी ते विकले. आधी स्वतःच पोलिसांना खबर करायची, गोरक्षणाचा आवा आणायचा आणि नंतर त्यांच्याच ताब्यातले बैल पळवण्याचं कारस्थान या आरोपींनी केलं. तेही स्वतःच्या स्वार्थासाठी…यातले तिघे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत हे अधिक गंभीर आहे.
१२- उस्मानाबाद; छेडछाडीचा विरोध करणाऱ्या शिक्षकाला गावगुंडांकडून मारहाण
कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या छेडछाडीचा विरोध करणाऱ्या शिक्षकाला गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. काही विद्यार्थी आणि गावगुंड या कॉलेजमधील विद्यार्थिनींची छेडछाड करत होते. शिक्षक रविंद्र माने यांनी मुलांना वारंवार या गावगुंडाना तंबी देऊनही त्यांचा हा प्रकार सुरुच होता. शिक्षकाने छेडछाडीला विरोध केल्याने ही मुलं कॉलेजमध्ये आली. शिक्षक रविंद्र माने शिकवत असताना या मुलांनी त्यांना बाहेर बोलावून चैन, केबल वायर आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या रविंद्र माने यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
१३- पुणे : अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी गजेंद्र चौहान FTIIमध्ये दाखल
१४- मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर.
१५- त्रिपुरामध्ये बेलिनिया येथे बस पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात ६ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१६- भाजप जिल्हा कार्यकारणी निवडण्यासाठी निरीक्षकांची साखळी कार्यरत - राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांची माहिती
१७- महापौर शैलेजा स्वामी यांनी कणखर भूमिका घेत गोंधळी नगरसेवकांना दिली समाज
१८- माहूर; कारला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटून २९ प्रवासी जखमी
१९- कंधार शहरात मोठ्या आवाजाने जनता भयभीत
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सभेत राडा, विरोधक-सत्ताधारी भिडले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड राडा पाहायला. खर्चाच्या हिशेबावरुन विरोधक आणि सत्ताधारी भिडले. इतकंच नाही तर दोन्ही गटांमधील सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. चित्रपट मंडळाच्या माजी अध्यक्षांनी केलेल्या 13 लाखांच्या खर्चाचा हिशेब द्या, त्यानंतरच सभा सुरु करा, असा तगादा विरोधकांनी लावला होता. या दरम्यान माईक हिसकावून घेणे, घोषणाबाजी करणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, असे प्रकार सुरु होते.
~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य म्हणजे आपण लहानपणी बालवाडीत खेळायचो तशी "चमचागोटी"ची चमच्यामध्ये गोटी ठेवुन धावायची शर्यत आहे. जर धावताना चमचामधील गोटी पडली तर पहिला क्रमांक येउनही काय फायदा?
[जयश्री देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संदीप बचाटे, मनीष कुमार, विठ्ठल मुपडे, अनिल सर्जे, देवी कार्वासार, संजय पवार, सय्यद कंधारी, माधव भाले, अनिल जाधव, अनिकेत चक्रावर, अनुराग पोवळे, ताज मिती, विनायक गुज्जर, अजित कपूर,
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment