श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 11- शेती विकासासाठी शेतक-यांनी सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी व्यक्त केले.
माळेगाव यात्रेत कृषी प्रदर्शनात विविध फळे व पिके शेतक-यांनी ठेवली असून त्याची जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या की, शेती विकासात सुधारीत तंत्रज्ञानाची गरज असून पारंपारीक शेतीबरोबरच याचा अवलंब केल्यास शेती उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.
अनियमित पावसामुळे कमी पाण्यात येणारी पिके कोणती आहे. याचा अभ्यास करुन शेतक-यांनी अशा पिकांची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होऊ शकते. माळेगाव यात्रेत या अनुषंगाने कृषि प्रदर्शनात विविध सुधारीत जाती, बि-बियाने आणि खते यांची माहिती शेतक-यांना देण्यात येत असून त्याचा फायदा घेणे काळाची गरज आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे,महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई लहानकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर, कावेरी भालेराव, पंचायत समिती सभापती सोनालीताई ढगे, उपसभापती रोहीत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment