नमस्कार लाईव्ह १५-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- नोव्हेंबर मध्ये झालेल्या पॅरीस दहशतवादी हल्ल्यातील एका संशयीतास पॅरीस मध्ये अटक
२- अर्जेंटिनामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-यांना घेऊन जाणा-या बसला साल्टा प्रांतात भीषण अपघात, पूलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. ४३ ठार ८ जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या घरातून 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त, CBI ची छापेमारी
४- बीड : Z+ सुरक्षा असूनही शाहांच्या हेलिकॉप्टर लँडिंगमध्ये हलगर्जी
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगडाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. मात्र अमित शाह यांचे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर न उतरता दुसऱ्या हेलिपॅडवर उतरल्याने पोलीस बंदोबस्ताची चांगलीच धांदल उडाली. खरं तर या सगळ्या प्रकाराची चर्चा गोपीनाथगडावर पोलिसांच्या झालेल्या धावपळीनंतरच सुरु झाली होती, मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी बीड गाठलं, तेव्हा प्रकरणाला तोंड फुटलं. अमिताभ गुप्ता यांनी या प्रकारणाची सखोल माहिती घेतली.
५- केंद्र सरकार आणि भाजप हे दिल्लीचे विरोधक - केजरीवाल
६- २ लाख रुपयापेक्षा अधीकचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचं - अरुन जेटली
७- आज मध्यरात्री पासून पेट्रोल ५० पैशांनी तर डिजेल ४६ पैशांनी स्वस्त
८- CBIने सर्वात इमानदार सरकारच्या कार्यालयात छापा मारलेला आहे. - केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- योद्धा शेतकरी अनंतात विलीन, शरद जोशींवर अंत्यसंस्कार
शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या शरद जोशी यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शरद जोशी यांच्या दोन्ही मुली आणि देशभरातून आलेले शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शरद जोशींनी 80 च्या दशकात शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात शरद जोशी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणं होते. त्यामुळे राज्यभरातील आलेल्या कार्यकर्त्यांना आपले अश्रू अनावर झाले.
१०- 'दिलवाले'वर बहिष्कार ही पक्षाची भूमिका नाही : राज ठाकरे
राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, “शाहरूख खानने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटीची मदत केली, पण ते महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना विसरले, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांचा निषेध केला आहे. त्यांचं म्हणणं योग्य आहे. महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्रालाच विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे. अर्थात असं असलं तरी आमच्या चित्रपट सेनेने त्यासाठी त्यांच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे जे आवाहन केले आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही हे मी इथे स्पष्ट करू इच्छितो” असं म्हटलं आहे.
११- महाधिवक्ता श्रीहरी अणेंविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव फेटाळला
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव आज फेटाळण्यात आला आहे. वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी अणेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. पण हा प्रस्ताव आज सभागृहासमोर येताच अध्यक्षांनी तो फेटाळून लावला. हा प्रस्ताव फेटाळून लावताना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनीही निवेदन दिलं. सरकारच्या या कृतीविरोधात शिवसेनेनं अणेंविरोधात सभागृहात आणि विधानभवनाबाहेर निदर्शनंही केली.
१२- प्रश्नोत्तराच्या तासाला विधानसभेत पॉर्न पाहत होता आमदार
ओडिशा विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना काँग्रेसचा एक आमदार चक्क पॉर्न क्लिप बघण्यामध्ये दंग असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या सभागृहाकडून जनता नैतिकतेची अपेक्षा करते, त्याच सभागृहात एका आमदाराने चक्क आपली लैंगिकविकृती दाखवून दिली. नाबा किशोर दास असे या आमदाराचे नाव असून, ओडिशा विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्या आमदाराला सात दिवसांसाठी निलंबित केले आहे. पुढील चौकशीसाठी विधानसभाअध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे पाठवले आहे. स्थानिक वृत्तवाहिनी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासाच्या कामकाजाचे प्रक्षेपण करत असताना नाबा दास हा आमदार पॉर्नक्लिप बघत होता.
१३- हरियाणात १०,१७ आणि २४ जानेवारी रोजी स्थानिक निवडणूका होणार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, अपघातात ३ जण ठार, तिघे जखमी
१५- नवी मुंबईत उद्यापासून आठवड्याला 2 दिवस पाणी बंद
नवी मुंबईमध्ये 24 तास पाणीपुरवठा असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. नवी मुंबईत किमान मूलभूत गरजा, पाणी, रस्ते चांगले असल्याने या शहराला लोकांकडून राहण्यासाठी पसंती दिली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःचं मोरबे धरण उभारल्याने या ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र या वर्षी आलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे सध्या मोरबे धरणातील पाणीसाठा फक्त 45 टक्क्यांवर आला आहे.
१६- नागपुरात लग्नघरी वऱ्हाडींना गुंडांची मारहाण, दोघं जखमी
नागपुरातील पटेल कुटुंबीयांच्या लग्नघरात गजबजाट असण्याऐवजी सन्नाटा पसरला आहे. याला कारण ठरली आहे नागपुरातली गुंडगिरी. वरात निघाल्यानंतर स्थानिक गुंडांशी किरकोळ बाचाबाचीनंतर चक्क वऱ्हाडालाच मारहाण करण्यात आली आहे.मारहाणीत दोघं जण जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी टिमकी परिसरात मुन्नालाल पटेलांच्या मुलीचं लग्न होतं. खांडव्याहून वऱ्हाड आलं, पण वरात निघाल्यावर परिसरातील गुंड प्रशांत गौर, कैलाश गौर आणि सोनू वर्माशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यामुळे या तिघांनी पाहुण्यांना मारहाण करायला सुरुवात केली. वऱ्हाडाने विरोध करताच तिघं निघून गेले. हा प्रकार इथेच थांबला असं समजून ही घटना विसरु पाहणाऱ्या पाहुण्यांना धक्काच बसला. रात्री 10 च्या सुमारास 7 ते 8 जण लाठ्या, काठ्या आणि तलवारी घेऊन आले आणि घरात दिसेल त्याला जबर मारहाण केली.
१७- पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार ३ जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- डेन्मार्कची फुटबॉलपटू लवकरच मनमाडची सून
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. त्यामुळे कोणाची गाठ कोणाशी आणि कुठे जुळेल हे कोणी सांगू शकत नाही. मात्र अशीच एक रेशीमगाठ मनमाडमध्ये बांधली आहे. मनमाडच्या राहुल एळींजेने आयुष्याची गाठ सातासमुद्रापार राहणाऱ्या डेन्मार्कची सिसिलीया पीटरसनशी बांधली आहे.
१९- धोनी आता पुणे संघाचा शिलेदार
महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोघांसाठी पुणे आणि राजकोट या दोन्ही संघानी अनुक्रमे 12.5 कोटी मोजले आहेत. तर रहाणे आणि जडेजाला दोन्ही संघांनीन तब्बल 9.5 कोटीला खरेदी केलं आहे. या ड्राफ्टच्या माध्यमातून नव्याने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या पुणे आणि राजकोट या दोन संघांना आगामी दोन मोसमांसाठी पाच-पाच प्रमुख शिलेदारांची निवड करण्याची संधी देण्यात आली. त्यातही पहिला मान पुण्याच्या संघाला देण्यात आला. अशावेळी सहाजिकपणे पुण्याने सर्वात आधी महेंद्रसिंह धोनीला आपल्या संघात घेतलं.
२०- सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, मॅकलम, डवॅन ब्राव्हो, आणि फॉल्कनर राजस्थान टीमकडून खेळणार
२१- आयपीएल २०१६ मध्ये महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन पुणे संघाकडून खेळणार
२२- आयपीएल २०१६ रविंद्र जाडेजा, सुरेश रैना राजकोट संघाकडून खेळणार
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- नांदेड; सोमेश्वरच्या महिला बचत गटास स्वस्तधान्य दुकानाचा परवाना असून याचा शुभारंभ 13 डिसेंबर रोजी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांच्याहस्ते
http://goo.gl/sk3bKa
~~~~~~~~~~~~~~~
२४- गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डयांचा उपक्रम राबविल्यास गाव डासमुक्त होऊन गावात स्वच्छता नांदेल - निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताई देवरे-चिखलीकर
http://goo.gl/hHjK5r
~~~~~~~~~~~~~~~
२५- कंधार तालुक्यातील पोखर्णी येथे सौरउर्जा दिव्याचे सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते उदघाटन
http://goo.gl/6KBcqZ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समाजात विशिष्ठ उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा का अपेक्षित उंचीपर्यंत पाहोचालात की आयुष्यातील अनेक उंची ती समस्याच सोडवते
[यु.बी. चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment