नांदेड --- [धम्मदीप गायकवाड]
शहरातील गुरूगोविंदसिंगजी शासकीय रूग्णालय हे शहरापासुन दुर स्थलांतरीत झाले असुन रूग्णाला याचा त्रास होत असुन पुर्वीच्या इमारतीला डागडुगी व शुभोभिकरण करून त्वरीत दोन खाटाचे रूग्णालय सुरू करणा असल्याचे दि. 16 डिसेंबर रोजी शासकीय रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी आ. हेमंत पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन करताना त्यांनी सांगितले यावेळी, नगरसेवक, अभिषेक सौदे, तुलशेष यादव वैजनाथ देशमुख, सितल खांडील, बळी कदम, अवतारसिंग, हैदर अली, शासकीय गुत्तेदार हेंद्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता देशमुख व शासकीय रूग्णालयाचे डाॅक्टर उपस्थित होते.
या रूग्णालयाचे स्थलांतर विष्णुपुरी येथे झाले असुन येथे कोणतेच उपचार सुरू नसुन या इमारतीचा सुशोभीकरण व बांधकाम करून शहरातील नागरीकांना योग्य उपचार होण्यासाठी सोय व्हावी व गुरूगोविंद सिंग यांच्या नावे येथे रूग्णालय सुरू राहवे यासाठी मी पर्यन्त करून जो काही निधी लागणार तो मी मंत्रीमंडळातून मागुन घेऊन येथे दोन शे काॅटचे रूग्णालय सुरू करणार असल्याचे आ. हेमंत पाटील यांनी भुमिपुजन करताना केले आहे.शहरातील रूग्णाना उपचार घेण्यासाठी शहराबाहेर जावे लागते त्यामुळे रूग्णाना व नातेवाईकांना याचा त्रास होतो जाण्यासाठी वाहनाची सुविधा व्यवस्थीत नाही. व रूग्णाना विनाकरण 10 ते 15 किलो मीटर चा प्रवास करावा लागत असल्यामुळे रूग्ण जास्त प्रमाणात तेथे जास्त नसुन ते महानगर पालीकेच्या रूग्णालयातच गदी करीत आहेत त्यामुळे येथे रूग्णालय सुरू होणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगुन त्वरीत दोन खाटाचे रूग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment