१- श्याम मानव यांनी २ कोटींसाठी दाभोळकरांची हत्या केली, सनातनचा गंभीर आरोप
२- डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या मातोश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
३- रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी, आजपासून रेल्वे प्रवासात मिळणार कंफर्म तिकीट
४- नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत किनवट व माहूर तालुक्यात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी मिळणे याबाबतचे इब्टाने दिले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना निवेदन
५- नांदेड लातूर रोडवरील जानापुरी येथे राजकीय द्वेषातून दोन पार्टीत हाणामारी, ९ जणांवर गुन्हे दाखल
६- देशाची तांदूळ निर्यात २०२० पर्यंत निम्म्याने घटनाची शक्यता
७- युरिया उत्पादन वाढीसाठी देशात बंद असलेले ३ प्रकल्प सुरु करण्याचा शासनाचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी, संजय खन्ना, श्याम राय यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
2-कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणः समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगवर ३ ऑक्टोबरला सुनावणी
3-आम्हाला बदनाम करण्याचा कटः सनातन संस्था
4-मुंबईः लालबाग राजाच्या मंडपात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी २ महिला पोलीस निलंबित
5- नाशिकमध्ये बनावट शीतपेय जप्त
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज ३०ºC / ३२ºC आहे
उद्या दि. ३० सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३१ºC / ३३ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
२- आयकर विवरणपत्र सदर न केल्याने १६ पक्षांची मान्यता रद्द होण्याची शक्यता, खा. राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती रडारवर
३- शारदा भवन एजुकेशन सोसायटीचे संचालक डॉ. शंकरराव चव्हाण सहकारी बायोशुगर व अग्रोप्रोडक्ट्स लि.चे नवनिर्वाचित चेअरमनपदी नरेंद्र भगवानराव चव्हाण यांची निवड
४- निराधारांचे थकीत अनुदान ८ दिवसात वाटप करू, माजी खा. खातगावकरांना जिल्हाधिकारी काकाणी यांचे अश्वासन
५- भाजपचे जेष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी राहत्या घरी निधन
६- १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन, नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारीनी काढले निर्देश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याज दरात ०.५ टक्क्याने कपात.
2-शांतता मिशनची व्याख्या आज बदलली आहे. शांतता राखणं आणि सुरक्षिततेची हमी देण्याबरोबरच या मोहिमेत आणखीही आव्हानं अभी राहिली आहेत - पंतप्रधान मोदी
3-जर सनातनवर बंदी घातली, तर एमआयएमवरही बंदी घालावी लागेल, खडसें
4-सुभाष चंद्र बोस यांचा परिवार १४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार.
5- निवडणुकीआधीचं शिवसेना-भाजपत धुसफूस सुरु, सत्तेचा वापर करुन सरकार आम्हाला अडचणीत आणतंय, सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
साजिद खान, गौरव डावकर, भारत ताकोर, अनिकेत साळुंके, कुणाल ढंग, प्रमोद राकोळे, विवेक जाधव, ईश्वर पापले,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
समुद्र हा सर्वासाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात. काहीजण त्यातून मासे उचलतात तर काहीजण आपले पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्वाचे
२- राजकीय नेत्यांवर कोट्यावधींची माया जमविल्याचे आरोप आहेत पण माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही - पंतप्रधान मोदी
३- नांदेड शहरातील चीरागगल्ली भागात अचानकपणे सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही
४- प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज विष्णुपुरी येथे मुद्रा योजना शिबिराचे आयोजन
५- पुण्यातील सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये भीषण आग
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट PSLVC-३० या उपग्रहाचे प्रक्षेपण, अंतराळात वेधशाळा लॉन्च करणारा भारत जगातील चौथा देश.
2-सॅन होजेः जगाच्या शांतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेः पंतप्रधान नरेंद्र मोदी.
3-कोल्हापूर: पंचगंगा नदीघाटावर पहाटे २ वाजेपर्यंत ४५४ गणेशमूर्तींचे विसर्जन, ११२ गणेशमूर्तींचे करण्यात आले दान.
4-पुढच्या महिन्यात गुजरातीसह ११ नव्या भाषा अॅन्ड्रॉइडवर समाविष्ट करणार: सुंदर पिचाई
5-'डिजिटल इंडिया'ला पाठिंबा दिल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बदलला आपला प्रोफाइल फोटो
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो
१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन; आज ओझरचा विघ्नेश्वर
२- राज्यात गणेश विसर्जन उत्साहात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१-पुणेः मुस्लिम बांधवांकडून मानाच्या पाच गणपतींची आरती. प्रथमच मुस्लिम बांधव मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभागी. उद्या पोलिसांना व कार्यकर्त्यांना शिरखुर्मा वाटणार.
२- कोल्हापुरातल्या मिरवणुकीत ‘म्हाळसा’ आणि ‘खंडोबा’ची हजेरी
३- विसर्जनासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त, 35 हजार पोलिस रस्त्यावर, लोकलचा मेगाब्लॉक रद्द, रस्ते मार्गातही बदल
४- गुजरातमधल्या जुनागढचे भाजप खासदार राजेंद्र चुडासमा आणि कृषीमंत्र्यांचे चिरंजीव दिलीप बारड यांनी गणपती विसर्जनात चक्क नोटांची उधळण केली आहे.
५- रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीमुळे गेली दोन दिवस संपावर असलेल्या केईएम हॉस्टिपटलच्या डॉक्टरांचा संप मागे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
व्यर्थ गोष्टींची करणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा
१- आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन, कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन
२- धर्मापासून दहशतवाद वेगळा काढण्याची गरज - पंतप्रधान मोदी
३- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न
४- गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या काळात झालेला नांदेडचा विकास डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादचा विकास होणार
५- विष्णुपुरी जलाशयात तरंगत असलेली वनस्पती काढण्याचे काम सुरु
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण एकत्र दिसणार आहे. ३३ वर्षांपूर्वी सन १९८२ मध्ये असा योग आला होता. आता यानंतर असा योग १८ वर्षांनी सन २०३३ मध्ये येणार - दा.कृ. सोमण, खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते
2-सत्या नाडेला, सुंदर पिचाई आणि आणखी काही बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.
3-शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष
4-आज गूगलचा १७ वा वाढदिवस
५- टोल बंद होणे अशक्य - नितीन गडकरी
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ठरवलेले सर्व काही मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर जे आपण ठरवतो त्यासाठी आपण कधीच प्रामाणिक नसतो
१- तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी भेटवस्तू आणि दोन हजार कोटींचा दागिने घोटाळा उघडकीस आणणारे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस
२- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कामावर पंतप्रधान नाखूष, मोदींनी पाठविले नाराजीपत्र
१- एसीबीपाठोपाठ आता अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर अजित पवार, बाळगंगा धरण घोटाळ्यात चौकशी होण्याची शक्यता
२- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरीच निधन, रात्री ऋषिकेशमध्ये घेतला अखेरचा श्वास
३- लेंडी प्रकल्पाचे १७ कोटी मिळाले नाहीत - जिल्हाधिकारी काकाणी
४- रेतीघाटावर अवैध्य उत्खनन करण्यास बंदी
५- मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी निसर्ग संपत्तीचे जतन करणे आवश्यक - अप्पर जिल्हाधिकारी बी.एन. कांबळे
६- धर्माबादेत ३३ गावांत एक गाव एक गणपती
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-संजय दत्तची शिक्षा रद्द करणारी दया याचिका महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळली, माजी न्यायमूर्ती काटजू यांनी केली होती दया याचिका.
2-नाशिकः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, उद्या कुंभमेळातील त्र्यंबकेश्वरच्या अखेरच्या तिसऱ्या पर्वणीला राहणार उपस्थित.
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६-२७ सप्टेंबर रोजी कॅलिफॉर्नियाला जाणार असून कॅलिफॉर्नियाला भेट देणारे मोदी हे ३० वर्षांनंतरचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.
5-मोदींना आयर्लंडच्या पंतप्रधानांकडून आयर्लंड क्रिकेट टीमची जर्सी भेट, आयर्लंडच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये गायलं स्वागत गीत
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
डॉ. दिलीपकुमार शिवल, मयंक बंडेवार, प्रसन्न कांबळे, सोनू संगेवार, गोविंद शर्मा, संजय कोल्हे, अनिल धुळे, विश्वजित कानजे, राज थोरात, पुष्पेंद्र राठोड, अमित खेडा, अनिल गुंडले, रवी तोंबाळे, विशाल शहा,
१- नमस्कार लाईव्हवर अष्टविनायक दर्शन, आज रांजणगावचा महागणपती
२- स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन सेन्ट्रल झोन खोखो व बुद्धिबळ स्पर्धेचे आ. तुषार राठोड यांच्या हस्ते उदघाटन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-गदारोळानंतर संपूर्ण विसंकेत धोरण आराखडाच मागे घेण्याचा निर्णय
2-दहशतवाद, घुसखोरी थांबवावीच लागेल, राजनाथ सिंह यांचा ‘शेजारी देशांना’ स्पष्ट संदेश
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून ७ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार.
4-आरक्षणाचे धोरण बदलले तर देशभर विरोध करणारः मायावती
5-मुंबईः ४ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २ मेट्रो मार्गांचे भूमिपूजन, दहिसर ते डिएननगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मार्गांसाठी होणार भूमिपूजन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते
१- बिहारच्या रणसंग्रामात सेनेची उडी, आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर निवडणुकीची धुरा
२- राज्यभरातून सनातनवर बंदीची मागणी, शिवसेना मात्र सनातनच्या बाजूने
३- कॉ. पानसरे हत्येचं ‘सनातन’शी संबंध स्पष्ट, मडगाव स्फोटातला रुद्र पाटील प्रमुख आरोपी
४- माहूर तालुक्यातील शेतकर्यांना पीककर्ज वाटप सुरु करावे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
५- रमाई योजनेसाठी पुन्हा डीआरडीची अट, पहिल्या यादीत ५५८ लाभार्थी
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन
२- बंगला देशातून भारतात आलेल्या विविध जातींच्या लोकांना भारताचे नागरिकत्व द्या - सर्वोच्च न्यायालय
३- अंबरनाथ; मुसळधार पावसाने शाळेचा वर्ग कोसळला, गणेश उत्सवाच्या शाळेला सुट्ट्यामुळे अनर्थ टाळला
४- गौराईसोबत 5 दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप
५- विष्णुपुरीतील जलसाठा ६५ टक्के
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
रमाकांत पाटील, भुजंगराव निर्मल, अविनाश कदम, सोनू मिसाळे, सोमेश मारावर, संतोष जाताळे, विकी पवार,
केशव वागचौरे, चैतन्य गावंडे, अमित बोरा, सचिन पोटवाल
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, मात्र कोणत्याही गोष्टीसाठी सत्याचा त्याग करू नये
(सतीश इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मथुराबाई तुकाराम देशमुख, तरोडेकर
किशनराव उकंडजी वाठोरे, भाटेगावकर
१- बिहारच्या रणसंग्रामासाठी शिवसेना सज्ज, स्वबळावर 150 जागा लढवणार
२- राजारामपुर, कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याप्रकारिणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करणेबाबत धर्माबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन
३- पत्रकार व नांदेड पोलीस यांचे दरम्यान क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाचा २४ धावांनी पराभव
४- बिलोली नगर पालिकेला मिळाला नाही साठ वर्षापासून बौद्ध समाजाचा उपाध्यक्ष, २२ सप्टेंबर रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड, बौद्ध समाजाला उपाध्यक्षपद देण्याची मागणी
५- टोलमुक्तीसाठी ट्रकमालकांचा 1 ऑक्टोबर रोजी संप -ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट नांदेड जिल्हाध्यक्ष दीपसिंघ गाडीवाले
६- आ.डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते मुक्रमाबाद येथे विकास निधीतून सिमेंटच्या रोडचे भुमिपुजन
७- मोटर अपघातात मरण पावलेला शेख इब्राहीमच्या वारसांना तेरा लाख मावेजा विमा कंपनीने द्यावा - जिल्हा न्यायालय (नांदेड)
८- अभ्यासक्रमात बदलत्या विचार प्रवाहाचे प्रतिबिंब असावयास हवे; तरच स्पर्धेच्या युगात भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर यशस्वी होतील - प्रा.सुरेश वाघमारे
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- सनातनवर आधीच बंदी आणली असती, तर पानसरे, कलबुर्गींची हत्या रोखता आली असती - मुक्ता दाभोळकर
२- ओडिशाः ट्रक उलटून नऊ कबड्डीपटूंचा मृत्यू
३- मुंबईचे डबेवाले करणार दुष्काळग्रस्तांना मदत
४- आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद धोनीकडे कायम
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ अंश सेल्सिअस
ढगाळ वातावरण, आद्रता ८०%, वारे ६ कि.मी.प्र.ता.
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते
(दयानंद वाठोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१५ बातमीपत्र
www.http://namaskarlivenanded.blogspot.in/
१- लोकशाहीत जनतेची ताकद महत्त्वाची, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी
२- कालचे चहाविक्रेते आज लाखांच्या सुटाबुटात - राहुल गांधींची बोचरी टीका
३- गुजरात समोर, महाराष्ट्र मागे, हेच का ते अच्छे दिन - खा. अशोकराव चव्हाण
४- ठानसिंघ बुंगाई यांची नांदेड गुुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या प्रभारी अधीक्षकपदी नियुक्ती
५- नेत्रदानाबरोबरच अंध व्यक्तींचे प्रमाण कमी होणे आवश्यक – जिल्हाधिकारी काकाणी
६- यात्री निवास पोलिस चौकी येथील पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास दोन हजार दंड
७- गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर गगनाला
८- विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे आज पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा
९- माहूर येथे माजी जि.प. सदस्य प्रफुल्ल राठोड व यांच्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या विरोधात विनयभंग व अट्रॅसिटीचा गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- लग्नानंतरही नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, आसारामच्या सुनेचीच तक्रार
२- अवैध वाळू तस्करीविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई, 8 जेसीबी, 70 ट्रक सोलापूरमध्ये जप्त
३- मुंबईत आज सकाळपासून पासून जोरदार पाऊस
४- कश्मीर पाकिस्तानचे कदापीही होऊ शकत नाही - मी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला
५- जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्यास नाशिकमध्ये आडकाठी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
दयाल गिरी, वैभव डांगे, महेश कंधारे, विश्वनाथ चिकारे, समर्थ बिलावाडीकर, उमेश देशमुख, आशिष गोदनगावकर, गणेश गटलावार, सचिन लांगासे, किरण कसराळीकर,
अमित काकड, परेश लोणी, सागर आव्हाड, राम अंकाम, प्रल्हाद देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
(सविता मोहिते, नमस्कार लाईव्ह वाचक)
१- पटेल समाजाला ओबीसीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरु झालेले आंदोलन आता अमेरिकेपर्यंत पोहचण्याची शक्यता
२- मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात संपन्न
३- बिलोली तालुक्यातील मौजे कोल्हेबोरगावात पाण्याची भीषण टंचाई
४- राज्यातील अंध आणि अपंगासाठी २० सप्टेंबर रोजी बेरोजगार मेळावा
५- दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरावे, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
६- यादव लोकडे यांच्या हस्ते शंकरनगर बिलोली यथे ध्वजारोहण संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार एसीबीच्या कार्यालयात गैरहजर. वकिलांमार्फत बाजू मांडली.
2-पुणेः डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात अंनिसची फसवणूक झाली. संशयाची सुई ज्या दिशेला आहे त्या दिशेने तपास व्हावाः अविनाश पाटील (कार्याध्यक्ष, अंनिस)
3-आपच्या सोमनाथ भारतीविरोधातील अहवाल गुरुवारी १२ वाजेपर्यंत कोर्टात सादर कराः कोर्टाचे पोलिसाला आदेश
4-पानसरे यांच्या हत्ये संदर्भात पोलिसांनी उचललेले पाऊल हे आशादायी आहे, पोलिसांचे अभिनंदन: मुक्ता दाभोलकर
5-सरकारला माझी सूचना आहे की त्यांनी 'मन की बात'ऐवजी 'ढंग की बात' सुरु करावीः कपिल सिब्बल.
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २५ºC / २७ºC आहे
उद्या दि. १८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
अंशतः ढगाळ वातावरण राहील
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवाडी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे
१- मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतिक असलेला गणपती बाप्पा घरा-घरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान
२- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ४४२० शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ - जिल्हा पुरवढा अधिकारी सुनील यादव
३- लातूर जिल्ह्यातील १०५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मनसे करणार मदत
४- राज्यातील पाणी टंचाईचे संकट नैसर्गिक किंवा अस्मानी नाही, हे शासन निर्मित आहे - दुष्काळ निर्मुलन समिती उपाध्यक्ष एच.एम. देसरडा
५- रोजगार हमी योजनेत लातूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख जणांसाठी रोजगार देण्यात येणार - तहसीलदार संजय वारकड
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी याचे पोस्ट स्टँप रद्द केल्याचा, काँग्रेसकडून निषेध, मोदी सरकारने काँग्रेसची माफी मागावी काँग्रेसकडून मागणी
2-मांसविक्रीवरील बंदीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबई महापालिकेचाही निषेध, फर्ग्युसन, एस.पी., डीईएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
3-औरंगाबाद: जामा मशिदीचे अध्यक्ष मौलाना रियाजोद्दीन फारूखी यांचे आज दुपारी निधन झाले
4-विश्वेश्वरय्या अभियंता संघटना कायमस्वरुपी दुष्काळ निवारणासाठी घेणार लातूर जिल्ह्यातले एक गाव दत्तक
१- श्री चक्रधर स्वामी अवतारदिन नांदेड शहरात उत्साहात संपन्न
२- मुक्रमाबाद येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शाखेत ट्रान्स्फॉर्मर डी.पी.च्या फिल्टर युनिटचे उदघाटन
३- बोगस व निरक्षर अंगणवाडी सेविकेवर कार्यवाही व्हावी म्हणून परतपूर गावकरी उपोषणावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार एसीबीच्या कार्यालयात गैरहजर. वकिलांमार्फत बाजू मांडली.
2-पुणेः डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात अंनिसची फसवणूक झाली. संशयाची सुई ज्या दिशेला आहे त्या दिशेने तपास व्हावाः अविनाश पाटील (कार्याध्यक्ष, अंनिस)
3-आपच्या सोमनाथ भारतीविरोधातील अहवाल गुरुवारी १२ वाजेपर्यंत कोर्टात सादर कराः कोर्टाचे पोलिसाला आदेश
4-पानसरे यांच्या हत्ये संदर्भात पोलिसांनी उचललेले पाऊल हे आशादायी आहे, पोलिसांचे अभिनंदन: मुक्ता दाभोलकर
5-सरकारला माझी सूचना आहे की त्यांनी 'मन की बात'ऐवजी 'ढंग की बात' सुरु करावीः कपिल सिब्बल
6-अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा किनवटच्या अध्यक्षपदी फुलाजी गरड तर उपाध्यक्षपदी भोजराज देशमुख यांची निवड
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांनमुळेच आपण थोर बनतो. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे
१- गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या विद्यापिठांची यादी जाहीर, जागतिक क्रमवारीत पहिल्या दोनशेत दोन भारतीय संस्थांचा समावेश
२- गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज
३- जुन्या मोंढ्यातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाचे कठडे त्वरित दुरुस्त करा, शहर विकास समितीची मागणी
४- नांदेड जिल्हा हा नरेगा कामाच्या भष्टाचाराचा जनकच होय, पंचायतराज समितीचे प्रमुख आ. संभाजी निलंगेकर
५- धर्माबाद शहर व तालुक्याचा विविध विकासकामासाठी भाजपा तालुकाध्याक्षांचे प्रधान सचिव व संबंधित मंत्र्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-२००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट: मोक्का कोर्टाकडून १२ दोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता
2-आज पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, मुळशी-भोर-मावळ-जुन्नर-वेल्हा धरणक्षेत्रात २ वाजता होणार प्रयोग
3-आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
4-निवडक भारतीय भाषांमध्ये ‘डॉट भारत’ ही डोमेनसेवा पुरवणारी ‘नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया’ (निक्सि) ही संस्था लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ही डोमेनसेवा पुरवणार
5-मराठी बोलणार्यांनाच मिळणार रिक्षाचा परवाना, रावतेंची घोषणा
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव तुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या बरोबर असतात
१- नांदेड उत्तर शिवसेना आयोजित वुशू कराटे स्पर्धा, ३६ जिल्ह्यातील १२०० खेळाडूंचा समावेश
२- देगलूर येथे गोळ्वलकर विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-चहावाल्याचाही दुष्काळग्रस्तांना हातभार, नोंदणी कार्यालयातच नानांच्या हाती मदत सुपूर्द
2-दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॉलिवुडचाही पुढाकार, अभिनेता अक्षय कुमार देणार ९० लाखांची मदत
3-इंदूर-अहमदाबाद मार्गावरील सरदरपूर जवळ ट्रकमधून जप्त केले २४ टन स्फोटके
4-पश्चिम बंगाल: कोलकाता शहरातील रायटर्स बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा वृत्तानंतर इमारत रिकामी करण्यात आली,
5-मंडपाविषयी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी उद्या चेक देण्याचे उच्च न्यायालयाचे तुर्भे येथील गणेशोत्सव मंडळाला आदेश, तसेच न्यायालयाच्या आदेशाचे आणि नियमांचे पालन करण्याची लेखी हमी देण्याची सूचना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते एकही ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात
१- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी नाना-मकरंदची 'नाम' संस्था, मदतीसाठी बँक अकाउंटचे तपशील जाहीर
२- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य विजय कुमार येणार नांदेड दौऱ्यावर
३- सचखंडच्या भाविकास मारहाण केल्याप्रकरणी डीएमआर सिन्हा यांना निवेदन
४- जागतिक गुंतवणूकदारांनी पायाभूत सुविधा, उत्पादन व संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी - अर्थमंत्री अरुण जेटली
५- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके याचा १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत नांदेड दौरा
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-दिल्ली: 'आप'चे आमदार सोमनाथ भारती यांना न्यायालयाकडून दिलासा, १७ सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही
2-अहमदनगर: उत्सव काळात चाचणी परीक्षा न घेण्याचा आदेश धाब्यावर. १४ ते ३० या काळात नगर जिल्ह्यात शाळांच्या परीक्षा होणार
3-दिल्लीत श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, अनेक करारांवर केल्या स्वाक्षऱ्या
4-भारत -पाक युद्धाच्या (१९६५) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते विशेष नाण्याचं अनावरण करण्यात आलं.
5-नाशिक: महाराष्ट्राची सत्ता एकदा हाती द्या, महाराष्ट्र कसा ठिक होत नाही तेच बघतो. - राज ठाकरे
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / २८ºC आहे
उद्या दि. १६ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
व्यवस्थित नियोजन हे ध्येयाकडे घेवून जाणारे असे वाहन आहे की ज्यावर आपण उत्साहाने विश्वास ठेवतो आणि उत्साहाने कृतीही करतो. याशिवाय यशाकडे जाणारा दुसरा कोणताही मार्ग नाही