(स्थानिक प्रतिनिधी) किनवट या भागालगतच्या दगडी कोळसा व सिमेंट यांचा वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी आदिलाबाद मुदखेड हि मिटरगेज रेल्वे लाईन टाकली. या मार्गे बराच माल वाहतूक झाल्यानंतर माजी खाजदार कै. उत्तमराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठ पुराव्यामुळे तसेच सर्व पक्षीय व इतर सर्व संघटनांची आंदोलने व किनवट तालुका पत्रकार संघाच्या उग्र आंदोलनातून सन २००५ ते २००७ मध्ये या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. आज किनवट रेल्वे स्टेशन घाणीच्या तसेच दुर्गंधीच्या विळख्यात सापडले असून येथून प्रवास करणाऱ्यांना अनेक प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदन मराठवाडा जनता विकास परिषदचे जिल्हाध्यक्ष गंगन्नाजी नेम्मानीवार यांच्या नेतृत्वात विभागीय रेल्वे व्यवस्थापक DRM नांदेड यांना देण्यात आले.
No comments:
Post a Comment