Thursday, 17 September 2015

Namaskar Live 17-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह 1७-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतिक असलेला गणपती बाप्पा घरा-घरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान

२- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ४४२० शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ - जिल्हा पुरवढा अधिकारी सुनील यादव

३- लातूर जिल्ह्यातील १०५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मनसे करणार मदत

४- राज्यातील पाणी टंचाईचे संकट नैसर्गिक किंवा अस्मानी नाही, हे शासन निर्मित आहे - दुष्काळ निर्मुलन समिती उपाध्यक्ष एच.एम. देसरडा

५- रोजगार हमी योजनेत लातूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख जणांसाठी रोजगार देण्यात येणार - तहसीलदार संजय वारकड

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी याचे पोस्ट स्टँप रद्द केल्याचा, काँग्रेसकडून निषेध, मोदी सरकारने काँग्रेसची माफी मागावी काँग्रेसकडून मागणी

2-मांसविक्रीवरील बंदीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबई महापालिकेचाही निषेध, फर्ग्युसन, एस.पी., डीईएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

3-औरंगाबाद: जामा मशिदीचे अध्यक्ष मौलाना रियाजोद्दीन फारूखी यांचे आज दुपारी निधन झाले

4-विश्वेश्वरय्या अभियंता संघटना कायमस्वरुपी दुष्काळ निवारणासाठी घेणार लातूर जिल्ह्यातले एक गाव दत्तक

5-लातूरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिक अंकुश राठोड यास शेतक-याकडून ०३ हजाराची लाच स्वीकारताना पकडले

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते

(पल्लवी जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील


No comments: