Thursday, 24 September 2015

Namaskar Live 24-09-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २४-०९-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी भेटवस्तू आणि दोन हजार कोटींचा दागिने घोटाळा उघडकीस आणणारे पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस

२- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कामावर पंतप्रधान नाखूष, मोदींनी पाठविले नाराजीपत्र

३- लातुरात अवैद्य बांधकामे जोरात, नगरसेवक घेतात लाच

४- रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव, नगरसेवक चंद्रकांत चिकटे लातूर महानगरपालिकेतील रिपाई गटनेते तसेच स्थायी समितीचे सदस्यही

५- लातूरच्या जुन्या रेल्वे रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगरः सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षण वक्तव्याचा रिपाइं आठवले गटाकडून निषेध.

2-व्यापमं घोटाळाः मध्य प्रदेशचे माजी मंत्री शर्मा यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा.

3-हार्दिक पटेलच्या याचिकेवर आज होणार गुजरात हायकोर्टात सुनावणी.

4-शिर्डी: बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातील घटना

5-दिग्विजय सिंहांकडून ओवेसी-भागवतांचा एकत्रित फोटो ट्विटवर पोस्ट, ओवेसींचं प्रत्युत्तर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात

(दिवाकर कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज ३०ºC / ३२ºC आहे

उद्या दि. २५ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३१ºC / ३३ºC राहील

No comments: