Sunday, 27 September 2015

Namaskar Live 27 09 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्वाचं साधन - पंतप्रधान मोदी

२- भारतीय चित्रपट आणि टेलीव्हिजन संस्थाच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, मंगळवारी होणार सरकारसोबत चर्चा

३- देग्लुरात 'श्री' विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार

४- आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गिरीश नेम्मानीवार यांचे अनुसूची जमाती आयोगाचे अध्यक्ष खा. रामेश्वर उराव यांना निवेदन

५- मान्सून परतीनंतरही वर्षभर अवकाळी गारपीट, हवामान तज्ञांनी व्यक्त केले मत

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१-दहशदवाद हे एक आव्हान आहे परंतू यावर भारत विजय मिळवणारः राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री.

२-केरळ सरकारची वेबसाइट पाकिस्तानी ग्रुपकडून हॅक.

३-तीन सदस्यांची समिती करणार खासदारांच्या पगारीची समीक्षा, खासदारांना सध्या महिन्याला ५० हजार रुपये पगार मिळतो, २०१० साली करण्यात आली होती समीक्षा.

४-भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केरळमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

५-अहमदनगरः कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, उन्हामुळे मिरवणुकीतील भक्तांची गर्दी ओसरली.

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २८ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो

(सत्यजित तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: