नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 11 September 2015
Namaskar Live 11-09-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ११-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- नाशिककरांना गुडन्यूज, आता नाशिकमार्गे धावणार मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन
२- कंधार येथील ग्रामीण रुग्णालयावर गावगुंडाचा हल्ला, दोन कर्मचारी जखमी
३- नांदेड शहरात श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सवाचे आयोजन
४- अनुसूची जाती कल्याण समितीने दिली किनवट तालुक्याला भेट
५- देगलूर शहर व तालुक्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचा वृत्ताने उडाली खळबळ
६- महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित टीप्रेसवार यांची निवड
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट
2-पुणेः स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणारा कायदा राज्यात व्हायलाच हवा. हा कायदा करण्याची सरकारकडे मागणी करणार - आमदार विनायक मेटे
3-नागपूरः पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना इंजिनिअरिंग फोरमच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर, १६ सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण.
4-मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी आज राजभवन येथे जाऊन घेतली राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट.
5-मुंबईः दप्तर ओझे कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा राज्य सरकारचा निर्णय २१ जुलैच्या जीआरच्या दिवसापासूनच लागू झाला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मी कोणापेक्षा तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल
(वैजनाथ मठपती, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC आहे
उद्या दि. १२ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
पावसाची शक्याता मध्यम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment