नमस्कार लाईव्ह १६-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- रिक्षा चालकांना मराठीच्या सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय वादात, रिक्षाचालकांना मराठी सक्तीवर विरोधकांचा आक्षेप
२- डॉ. आंबेडकरनगरात १५ सप्टेंबरपासून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन
३- काँ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला समीर गायकवाड निर्दोष, सनातन संस्थेचा दावा
४- मुक्रमाबाद पोलीस स्टेशन तर्फे शहरात पथ संचलन करण्यात आले
५- समाजवादी पक्षाचे सर्वोसार्वा मुलायमसिंह यादव यांच्यावर आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना धमकावल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १२ आरोपींना सोमवारी (२१ सप्टेंबर) शिक्षा सुनावणार.
2-मुंबईः कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळण्याच्या निर्णयाबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले.
3-विमानतळावरील व्हीव्हीआयपीच्या लिस्टमधून रॉबर्ट वाड्रा यांचं नाव हटवलं, आता वाड्रा यांना सामान्य नागरिकांप्रमाणे सर्व तपास प्रकियेतून जावे लागणार
4-विचाराचा विरोध करण्यासाठी झाली कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कलबुर्गी यांची हत्या: मुक्ता दाभोलकर
5-अहमदनगर- एमआयआरसीसमोर अपघातात दुचाकीवरून जाणारा जवान ट्रकखाली सापडून ठार
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६ºC / २७ºC आहे
उद्या दि. १७ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होवून चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ट
(शोभा बिरादार, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment