Sunday, 20 September 2015

नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- बिहारच्या रणसंग्रामासाठी शिवसेना सज्ज, स्वबळावर 150 जागा लढवणार
२- राजारामपुर, कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याप्रकारिणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करणेबाबत धर्माबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन
३- पत्रकार व नांदेड पोलीस यांचे दरम्यान क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाचा २४ धावांनी पराभव
४- बिलोली नगर पालिकेला मिळाला नाही साठ वर्षापासून बौद्ध समाजाचा उपाध्यक्ष, २२ सप्टेंबर रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड, बौद्ध समाजाला उपाध्यक्षपद देण्याची मागणी
५- टोलमुक्तीसाठी ट्रकमालकांचा 1 ऑक्टोबर रोजी संप -ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट नांदेड जिल्हाध्यक्ष दीपसिंघ गाडीवाले
६- आ.डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते मुक्रमाबाद येथे विकास निधीतून सिमेंटच्या रोडचे भुमिपुजन
७- मोटर अपघातात मरण पावलेला शेख इब्राहीमच्या वारसांना तेरा लाख मावेजा विमा कंपनीने द्यावा - जिल्हा न्यायालय (नांदेड)
८- अभ्यासक्रमात बदलत्या विचार प्रवाहाचे प्रतिबिंब असावयास हवे; तरच स्पर्धेच्या युगात भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर यशस्वी होतील - प्रा.सुरेश वाघमारे

~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- सनातनवर आधीच बंदी आणली असती, तर पानसरे, कलबुर्गींची हत्या रोखता आली असती - मुक्ता दाभोळकर
२- ओडिशाः ट्रक उलटून नऊ कबड्डीपटूंचा मृत्यू
३- मुंबईचे डबेवाले करणार दुष्काळग्रस्तांना मदत
४- आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद धोनीकडे कायम
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ अंश सेल्सिअस
ढगाळ वातावरण, आद्रता ८०%, वारे ६ कि.मी.प्र.ता.
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते
(दयानंद वाठोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: