Monday, 9 November 2015

नमस्कार लाईव्ह ०९-११-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०९-११-२०१५चे बातमीपत्र

१- 'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका
२- दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शाह सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला
३- महाराष्ट्र भूषणची रक्कम पुरंदरेंकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला, लता दीदींकडे सुपूर्द केला २५ लाखांचा धनादेश
४- संपत्तीच्या वतनदारांचा बिहारमध्ये पाचोळा, सेनेचा भाजपवर बोचरा वार, तर बिहार निवडणूक परिवर्तनाची नांदी, राष्ट्रवादीचा टोला
५- महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या, शिवसेना स्वबळावर विजयी होईल - उद्धवनी सुनावले
६- सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे बिहारमधील आमच्या पराभवामागचे मोठे कारण आहे - हुकुमदेव यादव, भाजपा नेते
७- पराभवानंतर बिहारमधल्या भाजप मंत्र्यांना कॅबिनेटमधून डच्चू मिळण्याची शक्यता, मोठ्या पराभवानंतर भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चिंतन
८- दिवाळीच्या मुहुर्तावर मॅगीप्रेमींसाठी नेस्लेची आनंदाची बातमी, मागील 5 महिन्यापासून बंदी असलेली 'मॅगी' आजपासून बाजारात उपलब्ध
९- तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा इशारा
१०- सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी, प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर, सोनं खरेदीला वेग
११- तब्बल ७५ सहाय्यक फौजदारांना नांदेड जिल्ह्यात पदोन्नती, दोन महिलांचा समावेश, दिवाळीची भेट
१२- हिमायतनगर; लुईब्रेल सेवाभावी संस्थेच्या अंध विद्यार्थांचा आ. आष्टीकर यांच्या हस्ते शालेय साहित्य देवून सत्कार
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
सचिन बेंद्रे, सुरज, गोविंदराव नागेलिकार, कैलास पाटील, कीर्ती तह्ल्यानी, श्रीपाद पटेल, आकाश भदोरिया, सदाशिव भुयारे, गंगाधर डांगे, दौलतसिंघ हजारी, शिवम पाटील, आकाश उगले, बालाजी सुनपे, सुरेश रंगेंवार, इक्बाल सय्यद, श्रीपाद राऊतवार,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आनंद हा एक 'भास' आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे,
'दु:ख' हा एक अनुभव आहे, जो प्रत्येकाकडे आहे,
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे......
(अंकिता पदमवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:- फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: