नांदेड [गंगाधर गच्चे]
उपविभागातील अनेक गावच्या पोलीस पाटीलाचे पद रिक्त होते वर काही गावच्या पोलीस पाटलाकडे अतिरीक्त कारभार जोडला होता त्यामुळे गृहविभागाच्या वतीने जिल्हयातील अनेक गावच्या रीक्त पदाची भरती करण्यासाठी आदेश येताच नंादेड उपविभागातील 47 गावचे दि. 3 डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालयात नांदेड अर्धापुर तालुक्यातील गावचे आरक्षण सोडत करून जाहीर करण्यात आले नांदेड व अर्धापुर तालुक्यातील 47 गावच्या पोलीस पाटील पदाचे आरक्षण चिठी काढुन करण्यात आले त्यामध्ये अनुसुचित जाती महिला साठी नाळेश्वर व जांभरुण तर अ.जा. पुरुषासाठी बळीरामपुर भनगी आलेगाव हे राखीव झाले असुन अनुसुचित जमाती साठी पुरुष मालकी भोगाव वाहेदपुर खडकी ता अर्धापुर तर महिलासाठी आमराबाद कलदगाव ही दोन गावे राखीव झाली असुन विशेष मागास प्रवर्ग साठी महिला बामणी ता. अर्धापुर तर पुरुषासाठी भुजामपेठ ता. नांदेड ही गावे आरक्षीत झाली आहे तर विमुक्त जाती साठी वाघी ता. नांदेड źमहिला˝ कामठा źबु˝ ता. अर्धापुर खुपसरवाडी ता. नांदेड हे पुरुषासाठी आरक्षीत झाले आहेत. भटक्या जमाती 5 साठी महिला पार्डी मक्ता ता. अर्धापुर वाडी बु.ता. नांदेड सावरगाव ता. अर्धापुर ही गावे पुररुषासाठी राखीव झाले आहेत तर इतर मागासवर्गासाठी महीला लिबगाव ता. नांदेड उमरी ता. अर्धापुर हे तर पुरुषासाठी मरळक बु. राहटी बु. वडगाव कोळी ता. नांदेड ही गावे आरक्षीत झाली आहेत.
तर खुला प्रवर्ग महिलासाठी, दर्यापुर,राहेगाव त्रिकुट, तळणी,नसरतपुर ता. नांदेड गणपुर ता. अर्धापुर ही गावे आरक्षीत असुन पुरुषासाठी पिंपळगाव मिश्री गाडेगाव, मार्कड,धनगरवाडी,निळा कामठा खु., पिपंळगाव निमजी, एकदरा वांगी, पुयणी ता. नांदेड व देगाव źबु˝ येळेगाव, शेलगाव खु, निझाामपुर ता.अर्धापुर ही गावे आरक्षीत झाली असुन नांदेड उपविभागातील 47 गावचे पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय कार्यालय नांदेड येथे दि. 3 डिसेंबर रोजी पार पडले यावेळी उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी नांदेडचे तहसिलदार ठाकुर अर्धापुरचे तहसिलदार रोजी यांच्यासह अधिकारी व गावचे नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment