Tuesday, 1 December 2015

नमस्कार लाईव्ह ०१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- असहिष्णुता चर्चा: गृहमंत्री लोकसभेत उत्तर देणार
२- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, दर ६.७५ टक्क्यांवर कायम
३- गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जातीय हिंसाचाराच्या घटनात वाढ - केंद्रीय गृहराज्यमंत्री
---------
देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये वाढ झाली असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले. मात्र, त्याचवेळी २०१३ च्या तुलनेत २०१५ या घटनांमध्ये घट झाली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरण रिजीजू म्हणाले, २०१४ मध्ये मे महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावर्षाच्या तुलनेत २०१५ मध्ये जातीय हिंसाचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. मात्र, २०१३ या वर्षाशी तुलना केली असता, चालू वर्षात या घटनांमध्ये घट झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या विषय असून, राज्य सरकारला आवश्यक असलेली सर्व मदत केंद्र सरकारकडून केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
***********************
४- आमीर देशाबाहेर गेल्यास परत आणेन - आठवले
-------------------
‘जर आमीर देशाबाहेर राहण्यासाठी गेला, तर रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते त्याला परत आणतील. जर त्याला संरक्षणाची गरज असेल, तर कार्यकर्ते त्याच्याभोवती सुरक्षेचं कडं उभारतील’ असं आठवलेंनी भोपाळमध्ये म्हटलं आहे. आमीरच्या वक्तव्यानंतर देशभरातून नाराजीचा आणि समर्थनाचा असा दुहेरी सूर उमटला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना आमीरने माझं भारतावर प्रेम असून देश सोडून कुठेही जाणार नसल्याचं सांगितलं होतं.  
***********************
५- अहमदनगर: भ्रष्टाचार हटविण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही, नाहीतर त्यांनी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली असती - अण्णा हजारे
६- डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांमी वधारून ६६.५१ वर
७- गुजरातच्या किना-याजवळ बीएसएफने काल २ पाकिस्तानी बोटी जप्त केल्या असून पुढील तपास सुरू
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मंत्र्यांच्या ताफा अडवणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल
गेल्या आठवड्यात सेनेचे आमदार आणि उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. कळंब तालुक्यातल्या हांवरगावात संतापलेल्या शेतकर्‍यांनी सावंतांचा ताफा अडवला. अगोदर मदत करा नंतर पाहणी करा अशी मागणी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून महसूल विभागानं शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केलेत.
***********************
९- सूरज परमार आत्महत्या प्रकरणात आव्हाडांचं नाव ?
              --------------------------
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंही नाव पुढे येतंय. या प्रकरणात आरोपी असलेले नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या अकाउंटवरुन जितेंद्र आव्हाड यांच्या अकाउंटवर जवळपास एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची बाब सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हायकोर्टात सांगितलंय.
***********************
१०- सिनेमागृहातल्या राष्ट्रगीतावरुन मनसे-एमआयएममध्ये नवा वाद, इम्तियाज जलिलांनी राष्ट्रगीताला नौटंकी म्हटल्याचा मनसेचा आरोप
११- राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या कुटुंबाने मागितली माफी
              -----------------------------
मुंबईच्या पीव्हीआर सिनेमागृहात राष्ट्रगीताचा अपमान प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आहे. हॉलमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबाने माफी मागितली आहे. मुस्लिम कुटुंबाच्या दृष्टीने या प्रकरणाला वाढविण्याची इच्छा नाही. मला वाटते की माझ्याकडून चूक झाली आहे. मी चित्रपट पाहण्याच्या मूडमध्ये गेलो होतो आणि अचानक हे सर्व काही घडले. आता मला याची जाणीव होत आहे. आता मी या प्रकरणात काही म्हणू इच्छित नाही. 
***********************
१२- चर्चच्या फादरकडून अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची तक्रार
            -----------
मुंबई: शिवाजीनगर परिसरातील क्राईस्ट द चर्चचे फादर जॉन्सन लॉरेन्स यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
13 वर्षीय तरुणाने 27 नोव्हेंबरच्या रात्री फादरने चर्चमध्येच अनैसर्गिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चर्चमध्ये गेलं असताना फादरने दुष्कृत्य केल्याचा आरोप तरुणाने केला आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
***********************
१३- मदरशातील उस्तादने माझं लैंगिक शोषण केलं होतं : दिग्दर्शकाचा दावा
            -------------
थिरुअनंतपुरम: केरळमधील मदरशांमध्ये लहान मुलांवर लैंगिक शोषण होतं, असा खळबळजनक आरोप दिग्दर्शक अली अकबर करीब यांनी केला आहे. मी स्वत: लैंगिक अत्याचाराचा बळी ठरल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे. याआधी केरळच्या एका महिला पत्रकारानेही फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहून असे आरोप केले होते, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात येत आहेत. अली अकबर करीब यांनी 20 पेक्षा जास्त मल्याळी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शनाशिवाय ते सिनेमासाठी गाणं आणि कथा लिहिण्याचं कामही करतात. त्यांच्या आयुष्यात घटलेल्या घटनेचा खुलासा करताना त्यांनी केरळच्या मदरशांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सहावी इयत्तेत प्रवेश घेतल्यानंतर एका उस्तादने अनेक वेळ लैंगिक शोषण केलं, असं अली अकबर करीब यांनी सांगितलं. त्या  घटनेनंतर अली अकबर कधीही मदरशात गेले नाहीत. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पिंपरीच्या वाल्हेकरवाडीत सशस्त्र दरोडा, 17 तोळं सोनं लंपास, महिलेच्या प्रसंगावधानानं 2 मुली बचावल्या
             --------------
वाल्हेकरवाडी रोडवरील रजनीगंधा हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या मधुकर पाटील यांच्या घरावर रविवारी (दि.30) साडेअकराच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पाटील हे कामावर गेले असल्याने घरी त्यांची पत्नी आणि मुले होती. पाटील यांना सेकंड शिप असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत ते घरी येतात. काल रात्री दरोडेखोरांनी पाटील यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. पती आले असावेत असा समज झाल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडला. याचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. पाटील यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील तसंच घरातील 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. 
***********************
१५- औरंगाबादमध्ये विवाहितेला सहा महिने कोंडून अमानवीय अत्याचार
              ---------------
नुकतंच लग्न झालेल्या विवाहितेला सहा महिने एका खोलीत कोंडून तिच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. औरंगाबादमधील मिसारवाडीत ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव करून विवाहितेची सुटका केली. महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण आहेत. तसंच पुरेसं अन्न पाणी न मिळाल्यामुळे तिची प्रकृती देखील चांगलीच खालावली आहे. यातील अतिशय घृणास्पद प्रकार म्हणजे या विवाहित तरुणीवर तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी प्रचंड मारहाण केली. इतकंच नव्हं तर जेवण्यासाठी गाईचं शेण आणि पिण्यासाठी गोमूत्र दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती तरुणीने दिली. सहा महिन्यापासून विवाहितेला डांबण्यात आल्याने तिची प्रकृती अंत्यत खालावली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रारही योग्यरित्या देता येत नव्हती. सिडको पोलिसांनी तिचे म्हणणे ऐकून घेत तिला तात्काळ उपचारासाठी घाटीत पाठविले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून या महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.
***********************
१५- बेळगाव : खानापूर तालुक्यातील नंदगडजवळ कारची झाडाला धडक, तिघांचा जागीच मृत्यू
           --------------
१६- पाटण्यात माकड आरोपीच्या पिंजऱ्यात, पुजाऱ्याची हत्या 
पाटण्यात माकड आरोपीच्या पिंजऱ्यात, पुजाऱ्याची हत्या माकडाने मंदिरातील पुजाऱ्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मंदिरासमोरची साफसफाई करत असताना माकडाने पुजाऱ्यावर दगड मारायला सुरुवात केली आणि त्यात पुजाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिराच्या परिसराची साफसफाई करताना छतावरुन एका माकडाने पुजाऱ्याच्या दिशेने दगड मारला. हा दगड वर्मी बसल्याने पुजारी जागीच गतप्राण झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार पाटण्यातील सिटी चौक परिसरातल्या मिरचाई गल्लीत माकडांचा सुळसुळाट झाला आहे. 
***********************
१७- मोबाईलमुळे दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
              ------------------
नवी दिल्ली: शिक्षिकेने संबंधित विद्यार्थ्याला मोबाईल फोनसह पकडलं होतं. पालकांना याबाबत समजेल या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं.मृत्यूपूर्वी विद्यार्थ्यांने सुसाईड नोट लिहिली होती.

“मी या जगात आलो तेव्हा तुम्ही सगळे हसत होता आणि मी रडत होतो. मात्र आता मी हसणार आहे आणि तुम्ही सगळे रडणार. सॉरी, मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न केला पण काय करायचंय हे मला समजत नाही. मी एक पाऊल पुढे गेलो तर दोन पावलं मागे येतो. आजही माझी चूक होती. मी अनेक दिवसांपासून स्वत: नियंत्रण ठेवलं होतं आणि शिक्षा होईल, अशी कोणतीही गोष्ट वर्गात करत नव्हतो. आज मी शाळेत मोबाईल फोन घेऊन गेलो, माझी चूक होती की मी वर्गातच फोन बाहेर काढला आणि सेल्फी घेण्यास सुरुवात केली. पण माहित नाही कोणीतही मॅडमना सांगितलं आणि मी अडकलो.मला माहित आहे शिक्षकांच्या नजरेत माझी प्रतिमा अतिशय वाईट आहे, पण मी सुधारण्याचा प्रयत्न केला होता. जर माझ्या पालकांना शाळेत जावं लागलं असतं तर त्यांची मान शरमेने झुकली असती. माझे कुटुंबा माझ्याकडून खूप अपेक्षा असतील, मी हे करेन किंवा ते करेन. मलाही कोणाची तरी मदत हवीय माझ्या कुटुंबियांनी माझ्यासाठी खुपच केलं, पण मी त्यांच्यासाठी काहीच करु शकलो नाही.”दरम्यान, शाळा प्रशासनाच्या छळामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तर शाळेने हे आरोप फेटाळले आहेत. आम्ही फक्त पालकांना बोलावण्यासाठी सांगितलं होतं, त्याचा छळ केला नाही, असा दावा शाळेने केला आहे. 
***********************
१८- केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील एस.एच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ३३ वर्षीय ननचा मृतदेह सापडल्याने खलबळ
१९- हरियाणातील अंबाला येथे एका आरोग्य शिबीरात डोळ्यांच्या ऑपरेशननंतर १५ लोकांनी दृष्टी गमावली
२०- उत्तर प्रदेशमधील बाराबांकी येथे गावातील गुंडांनी पोलिसांसमोरच एका तरूणीला जाळल्याचा आरोप
२१- मुसळधार पावसामुळे चेन्नईतील शाळा-कॉलेजेस आजही बंद
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- प्रख्यात सारंगीवादक उस्ताद सबरी खान यांचे दिल्लीत निधन
२३- भारताजवळ ४ गीगावॅट एवढी पॉवर असून आम्ही येत्या २०२२ पर्यंत १०० गीगावॅट इतकी सोलार पॉवर निर्माण करण्याचे लक्ष
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अरुण साठे, बालाजी नरवाडे. बलराम, ज्ञानेश्वर वानखेडे, गणेश जोशी, गणेश यशवंतकर, गोविंद हाक्के, कमलाकर बिरादार, खाजा शेख, महेश मेहराज, नंदू कस्तुरे, नरसिंग पवळे, प्रवीण त्रिभुवन, पी.एस. सूर्या, रजत पदमवार, राजेश गोवंदे, रोहन तामलुरे, शिवाजी पवार, श्री उप्पेर्पेल्ली, शुभम मानकरी, सुनील वट्मवार, सुरेश कदम, वैभव गाजे, शिवाजी पवार, जीत सिंघ, अक्षय आप्पण, कमलाकर बिरादार, प्रसाद ओंबासे, बाळासाहेब कुंबकर, वैजनाथ सोनाणीस
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार] 
बोलताना जरा सांभाळून, शब्दाला तलवारी पेक्षा धार असते..
फरक फक्त एवढाच कि,
तलवारीने मान तर शब्दाने मन कापले जाते..
जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दाच्या जखमेतून अश्रू येत असतील तरी...
दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखीच असते...
[अमोल देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: