Tuesday, 1 December 2015

राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी दि. ३०/११/२०१५ रोजी सुहास देशपांडे लिखित ‘अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम



राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी दि. ३०/११/२०१५ रोजी सुहास देशपांडे लिखित ‘अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम’ या नाटकाचा पुन्हा एकदा पयोग सादर झाला. याच नाटकाचा प्रयोग स्वःता लेखक सुहास देशपांडे यांनी याच स्पर्धेत प्रयोग सादर केला आणि पुन्हा त्याच नाटकाचा प्रयोग माजी विधार्थी पती. योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई, जी.बीड या संस्थेने सादर केला. या वेळेस या नाटकाच्या दिग्दर्शिका होत्या प्रा. डॉ. सौ. संपदा कुलकर्णी, संपदा कुलकर्णी ह्या नाट्यशास्त्राच्या प्राध्यापिका असल्यामुळे हे नाटक पाहण्याची अनेक जणांना उत्कंठा होती. या नाटकाची संहिता, आशय बर्याच जणांना माहित होती तरीही सादरीकरण पाहण्यासाठी म्हणून अनेक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. नाटकाचा प्रयोग पाहत असतांना आसे लक्षात आले कि या नाटकाच्या संहितेत प्रा. डॉ. सौ. संपदा कुलकर्णी यांनी अनेक बदल केल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रेक्षकांना आपण तेच नाटक पुन्हा पाहतोय असे कदाचित वाटले नसावे.
    या नाटकाचे नेपथ्य श्री. आकाश पवार यांनी आशय पूर्ण साकारले तर प्रकाश योजना श्री. गिरीष बडवे, संगीत श्री. अनिल जाधव, रंगभूषा सौ. वनिता राउत यांनी आशय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
    या नाटकात अविनाशची भूमिका श्री. मिलिंद मुकद्द्म, अनघाची भूमिका सौ. रुपाली देशमुख, प्राचीची भूमिका कु. वृषाली गेधर, तर प्लंबरची भूमिका श्री. दत्तात्रय राऊत यांनी आप-आपल्या अभिनयातून पात्रास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला.

No comments: