Sunday, 6 December 2015

क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे यांच्या विचाराची ज्योत अंखडपणे तेवत ठेवण्याचा निर्धार - दांगडे पाटील

मुंबई/- 
                 धनगर जमातीच्या भविष्यातील संघर्षासाठी यशवंत सेनेच्या घौडदौडीला सोलापुर येथुन सुरवात केली असून
क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे यांच्या विचाराची ज्योत अंखडपणे तेवत ठेवण्याचा निर्धार यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री मानिकराव पाटील दांगडे यांनी सोलापुर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत केला असुन संघर्षा साठी सरसेनापती क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन यशवंत सेनेच्या माध्यमातुन '' भंडारनामा '' तील प्रश्नासाठी लढा देत आहोत हा लढा अविरत सुरु राहील 
असे वचन श्री दांगडे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन दिले तर यशवंत सेना ही रजिस्टर केलेली अधिकृत संघटना असुन संघटनेत इथुन पुढे कुणीही सरसेनापती होणार नाही फक्त सरसेनापती ही उपाधी स्व बापुसाहेब कोकरे यांच्यापुरती मर्यादीत
आहे

यशवंत सेने ची संघटनात्मक रचना, कार्यपध्दत, उद्देश व आदी नियमावली तयार केली असुन महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी 
प्रदेशाध्यक्ष माणिकराव दागंडे पाटील कार्याध्यक्ष अरविंद देवकते सरचिटणीस रामभाऊ लांडे संघटक राजेंद्रकुमार बुध्याळ या प्रमाणे असुन या व्यतीरिक्त यशवंत सेनेचा कुणीही अधिकृत पदाधिकारी नाही यशवंत सेना या नावाचा  तसेच बोधचिन्ह व लेटरहेड चा संघटनेच्या परवानगीशिवाय वापर करु नयेअसा एकमुखी ठराव घेवुन तो पारित करण्यात आला असल्याची घोषणा सर्वाणुमते करण्यात आली या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी यांनी आपले विचार प्रकट केले 

                 राज्यातील धनगर जमातीला यशवंत सेनेचे सरसेनापती क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे यांनी अज्ञानाच्या अंधकारातुन बाहेर काढुन मोठी जागृती केली आहे मात्र धनगरांना राजकिय अस्मितेची जानिव नसल्याने त्यास आपल्या निश्चित ध्येयापर्यतं पोहचता येत नाही म्हणुन या जमातीला आपल्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो याकरिता धनगर जमातीत राजकिय अस्मितेची जानिव निर्माण होण्याची गरज असल्याचे परखड मत समाजाचे गाढे अभ्यासक बाळासाहेब कोळेकर  यांनी सोलापुर येथील समाज कल्याण सभागृहात दि 29/11/2015 रोजी संपन्न झालेल्या यशवंत सेनेच्या राज्यस्तरीय बैठकीत व्यक्त केले

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव पाटील दांगडे हे होते तर बैठकीला कार्याध्यक्ष अरविंद देवकते संघटक राजेंद्रकुमार बुध्याळ सरचिटणीस रामभाऊ लांडे जेष्ठ नेते रामभाऊ वाघमोडे सोलापुर जिल्ह्याचे युवानेते अर्जुन सलगर मुंबई येथील
ललित बंडगर सुभाष गाडे संजय थोरात संदिपान वाघमोडे प्रा सचिन गाढे दत्ता गावडे सुनिता गाडे पुजा  बुध्याळ मनिषाताई माने प्रा प्रकाश वनगे यांची प्रमुख उपस्थिती होती तर पुढे बोलतांना श्री कोळेकर म्हणाले की आज समाजाला बलिदानाची  नव्हे तर योगदान देणा-याची गरज आहे यापुर्वीचसमाजाच्या गळ्यातील गुलामीचा दोरखंड तोडण्याचे काम बापुसाहेब कोकरे यांनी केलेले असुन समाजातील पुढा-यांनी दुस-याच्या दोरखंडाने पंतग उडविण्याऐवजी स्वत:च्या पंखानी गरुडझेप घेतली पाहीजे तर यशवंत सेना ही समाजाची अस्मिता जपणारी संघटना आहे तर यशवंत सेना हीच समाजाची पोलादी ताकद आहे १९८९ ते१९९१ या कालखंडात यशवंत सेनेने केलेल्या आदोलनामुळे तत्कालीन राज्यकर्ते नैतिकदृष्ट्या घाबरून समाजापुढे झुकले होते तर यापुढे ही यशवंत सेना ही समाजासाठी लढत राहील असा आशावाद संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्रकुमार बुध्याळ यांनी व्यक्त केला तसेच यशवंत सेना समजुन घेवुन पुढील वाटचाल ही जानिवेतुन धनगर जमातीने करावी हा लढा कुण्या ऐकट्याचा नसुन तो समस्त धनगरांचा असल्याची भावना राज्य संघटक अरविंद पाटील देवकते यांनी व्यक्त केली
        
 स्व बी के कोकरे यांच्या विचाराशिवाय कुठलेही आंदोलन यशस्वी होणार नाही काळाची गरज ओळखुन तरुणांनी यशवंत सेनेचा  पिवळा झेंडा खाद्यांवर घेतला पाहीजे असे आवाहन यशवंत सेनेचे जेष्ठ नेते रामभाऊ वाघमडे यांनी केले तर धनगरांना ऐतिहासिक वारसा असुन त्या प्रमाणे लढण्याची खरी प्रेरणा सरसेनापती स्व बापुसाहेब कोकरे यांनी दिली असुन समाज एका विचाराखाली संघटीत करण्याचे काम स्व बापुसाहेब कोकरे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातुन केल्याने तेच क्रांतिवीर  ठरतात आधी एक व्हा -विचार करा-संघटीत व्हा-योगदान द्या-स्वंय निर्णय घ्या-हक्कासाठी संघर्ष करा या सुत्राने वाटचाल करुन आपले हक्क यशवंत सेनेच्या माध्यमातुन मिळवु असे आवाहन राज्याचे सरचिटणीस रामभाऊ लांडे यांनी केले असुन धनगर जमातीने संघटनेसोबत राहीले पाहीजे समाजाच्या संघटनाच आज लढा देत असतांना समाज सोबत राहत नाही म्हणुन संघटनांचा प्रभाव दिसत नाही ही परिस्थिती बदलली पाहीजे बी के कोकरे यांनी यशवंत सेना ही क्रांतिकारी संघटना देवुन समाजाला  राजकीय व सामाजिकदृष्ट्या दखलपात्र केले असल्याचे सोलापुर जिल्ह्याचे तरुण तडफदार युवानेते अर्जुन सलगर यांनी म्हटले आहे

यशवंत सेना ही कुंटुबासारखी सघंटना असुन स्व बी के कोकरे कुंटुंबप्रमुख होते संघटनातुन एकत्रितपणे निर्णय घेण्याचा त्यांचा वारसा आजही पुढे चालवला जात असल्याचे प्रतिपादन प्रा सचिन गाडे यांनी केले 

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक ढोणे यांनी करुन आभार संदीपान वाघमोडे यांनी मानले तर कार्यक्रमासाठी स्वनिल हुक्के अभिलाष बुध्याळ यांनी सहकारीसमवेत परिश्रम घेतले तर यशवंत सेनेच्या मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सह
क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे स्व अरुणकुमार वाघे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन येळकोट येळकोट जय मल्हार ,यशवंत सेना जिदांबाद च्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात उपस्थित बांधवात चैतन्य निर्माण झाले होते

No comments: