Sunday, 6 December 2015

मुखेड; बाबरी मस्जिदची पुर्णनिर्मिती करा, राष्ट्रपतीना पाठवले निवेदन


मुखेड:-
       अयोध्या उ.प्र. येथील प्राचीन बाबरी मस्जिद शहिद करणा-या  आरोपींना व संघटनांना शिक्षा करुन त्याच जागी बाबरी मस्जिदीचे पुर्णनिर्मिती करावी यामागणीचे निवेदन रियाज शेख यांच्या नेतृत्वात तहसिलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले.
    तन्जीम ए इन्साफ च्यावतीने आज दिलेल्या निवेदनात म्हटले की,   6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या उ.प्र. येथील प्राचीन बाबरी मस्जिद देशविघातक लोकांनी शहीद करुन धर्मनिरपेक्ष लोकशाहीला काळीमा फासली. संविधानाने धर्म व आस्था च्यासंदर्भात दिलेल्या मौलिक व मूलभूत अधिकाराला पायदळी तुडविण्यात आले. यामुळे देशातील अल्पसंख्यक समुदायात असुरक्षितेची भावना निर्माण झाली. या घटनेचा आँल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते. या दुखद घटने नंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी बाबरी मस्जिदीची पुर्णनिर्मिती करण्याचे आश्वासन देशाला दिले होते. म्हणुन लवकरात लवकर बाबरी मस्जीद शहीद करणा-या आरोपींना शिक्षा करुन मस्जीदीचे पुर्णनिर्मिती करावी. यावेळी हाफिज अब्दुल गफार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनावर शेख रियाज, रमजान सौदागर, आसद बल्खी, बबलु मुल्ला, शेख मुनवर, पत्रकार शेख महेताब, शेख रफीक सदर, मसरुर भाई, बबलु धुंदी, अन्सार रजा, इमरान पठाण, शरिफ कुरेशी, शेख वाजीद, बबलु चौधरी यांची स्वाक्षरी आहेत. 6 डिसेंबर च्या निमित्ताने पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सपोनि के.एन.चव्हाण, पिएस आय बिराजदार, डि.एस.बी. भगवान केंद्रे समेत पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त लावला होता.

No comments: