Friday, 4 December 2015

कुसुम सभागृहात सुरु असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील नांदेड केंद्रावर दि.०३/१२/१५ रोजी ‘अग्नीकन्या’ हे नाटक सादर




कुसुम सभागृहात सुरु असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील नांदेड केंद्रावर दि.०३/१२/१५ रोजी अंबाजोगाईच्या दासोपंत संशोधन मंडळाने प्रा. रा. द. अरगडे लिखित, श्री. अमोल अरगडे दिग्दर्शित ‘अग्नीकन्या’ हे नाटक सादर केले.
     या नाटकात आदर्शवाद, मूल्य यांचा राजकारणात सोयीने होणारा वापर व त्यामुळे मानवी नात्यांची होणारी घुसमट, तसेच पुरुषी अहंकारातून नात्यांची होणारी शोकांतिका, प्रतारणा दाखवण्यात आलेला आहे, तसेच त्या विरोधात स्त्रीने आप्ळूं आत्मसम्मानासाठी केलेला संघर्षही प्रभावीपणे मांडला गेल्याने प्रेक्षकांना एक चांगला सामाजिक संदेश सोप्या भाषेतून, नाट्यमय पद्धतीने फोह्चवण्याचा प्रयत्न ‘अग्नीकन्या या नाटकाच्या प्रयोगातून करण्यात आला.
    हे नाटक वास्तववादी शेलीचे असल्या मुळे दिग्दर्शकाने या नाटकात घडणाऱ्या सर्व घटना ह्या वास्तवात जशा घडतात तशाच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नाटकाचे नेपथ्य सचिन भोकरे, शिरीष राखे यांनी आशयाशी निघडीत केले आहे. या नाटकातील पात्र ज्ञानदास ( अमोल अरगडे ) हे बुद्धिवादी, आदर्शवादी व एका विनाअनुदानित संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या घरात पुस्तकाचं कपाट, व भिंतीवर त्यांचे आदर्श महात्मा फुले व कर्वे यांचे फोटो आहेत. भिंतीचा रंगही फिकट निळा दाखवण्यात आलेला आहे व घरात गरजे पुरत्याच वस्तू दिसून येतात. या उलट मानाजीराव ( मुरलीधर फड ) हे स्वार्थी, धुर्थ असल्याने त्यांच्या घरात देवाच्या फोटो बरोबर स्वतःचाच फोटो लावलेला दिसतो. घरात आलिशान फर्निचर आहे. ते वृत्तीने विलाशी आहेत, त्यामुळे गुलाबी रंगाचा वापर त्यांच्या घरासाठी केलेला दिसून येतो.
  या नाटकात डॉ.गिरीश यांची भूमिका संकेत यांनी, महादूची भूमिका सागर कुलकर्णी, साधनाची भूमिका रोहिणी पाठक, मोहिनीची भूमिका रुपाली भोकरे यांनी सांभाळली तर प्रकाश योजनेची बाजू डॉ. गणेश मुडेगांवकर, संगीत- अमित अरगडे यांनी तर रंगभूषा-सुनील कुलकर्णी, वेशभूषा-राजू वाघमारे, श्रीधर फड यांचे होते.
होशी राज्य नाट्य स्पर्धेचा या प्रवासात नांदेड केंद्रावर आज दि.०५/१२/२०१५ रोजी ‘नर्कचतुर्दशी’ हे शेवटचे नाटक सादर होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थिती लाऊन या नाटकाचा आस्वाद घ्यावा व शासनाच्या या उपक्रमास प्रतिसाद द्यावे आशी विनंती नांदेड केंदारावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केले आहे.

No comments: