नमस्कार लाईव्ह ०३-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
वायफायमुळे 15 वर्षीय मुलीची आत्महत्या!
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलीने वायफायच्या अॅलर्जिक सिग्नलला कंटाळून आत्महत्या केली. आई-वडिलांच्या आरोपानुसार, त्यांच्या मुलीला म्हणजेच जेनीला इलेक्ट्रो हायपर सेंसेटिव्हिटी (EHS) आजार होता, त्यामुळे तिला डोकंदुखी आणि थकव्याचा त्रास होत असे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, जेनीच्या आईने सांगितलं की, शाळेतील वायफाय कनेक्शनची तिला अॅलर्जी होत असे. याबाबत तिने शाळेत सांगितलंही होतं. अनेक तपासण्या करुनही डॉक्टरांना अॅलर्जीचं कारणं समजू शकलेलं नाही.शाळेत असलेलं वायफाय आमच्या मुलीच्या मृत्युला कारणीभूत ठरलं आणि त्यामुळे तिने कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप जेनीच्या आई-वडिलांनी केला. शिवाय कोर्टातही त्यांनी सांगितलं की, जेनी स्वत:ला शाळेतील वायफाय राऊटरपासून दूर असलेल्या एखाद्या रिकाम्या वर्गात कोंडून घ्यायची. यामुळेच आम्ही घरातील इंटरनेट कनेक्शनही बंद केलं होतं.वायफायच्या अॅलर्जिक सिग्नलमुळे मला अतिशय त्रास होतो. शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच त्यांच्या शाळेतही सर्टिफाईड वायफाय राऊटर लावलं आहे, असं जेनीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.शाळांमध्ये वायफाय लावू नये असं मत जेनीची पालकांनी व्यक्त केलं आहे. तसंच इलेक्ट्रो हायपर सेंसिटिव्हिटीसाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावं, जेणेकरुन अशा घटना रोखता येतील, अशी मागणी जेनीच्या आई-वडिलांनी सरकारकडे केली आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- मी नुकसानीची पाहणी केली, मुसळधार पावसामुळे झाले नुकसान. तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १००० हजार कोटी देण्याचे निर्देश दिले - नरेंद्र मोदी
२- राळेगण सिद्धी : प्रशांत भूषण आणि अण्णा हजारे यांच्यात चर्चा.. केजरीवाल सरकारने सादर केलेल्या जनलोकपाल विधेयकात अनेक त्रुटी असल्याचं अण्णांचं मत असल्याचा भूषण यांचा दावा
३- डिस्काऊण्ट वॉर अंगलट, फ्लिपकार्टला 2 हजार कोटींचा फटका
डिस्काऊण्ट वॉरच्या नादात देशातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेलिंग कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. गळेकापू स्पर्धेत टिकण्यासाठी दिलेलं डिस्काऊण्ट अंगलट आल्याने फ्लिपकार्ट कंपनीला तब्बल 2 हजार कोटींचा तोटा झाला आहे. मार्च 2014 ते 2015 या आर्थिक वर्षात हे नुकसान झालं आहे.ऑनलाईन ग्राहक खेचण्यासाठी आणि स्नॅपडील, अॅमेझॉन इंडियासारख्या प्रतिस्पर्धींच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी मोठं डिस्काऊण्ट दिलं. फ्लिपकार्ट इंटरनेटला एकूण 1096.4 कोटी रुपयांचा तर फ्लिपकार्ट इंडियाला 836.5 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी मात्र आर्थिक स्थितीबाबत कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
४- तामिळनाडूमधील मुसळधार पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक
५- जम्मूच्या पुंछ सेक्टर मध्ये भारतीय सेना आणि आतंकवादी यांच्यात गोळीबार, यामध्ये ३ आतंकवाद्यास मारण्यात भारतीय सेनेस यश
६- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तामिळनाडूला ५ कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा
७- एअर इंडिया अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी हैदराबाद ते आराकोनम नौदल तळादरम्यान विशेष विमान चालवणार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- गेल्या वर्षीपेक्षा मराठवाड्यात मोठा दुष्काळ, आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे - उद्धव ठाकरे
शिवसेनेचा मुंबईत आज वर्षपूर्ती सोहळा आहे, यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे, मात्र काहींना सरकार पडणार की नाही यांची चिंता आहे. आज देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली, त्या दिवसाची वर्षपूर्ती आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे, उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्याचा दुष्काळी दौरा केला.
९- शनिशिंगणापूर वाद: पंकजा मुंडेंचा गावकऱ्यांना पाठिंबा
शनिशिंगणापूरला महिलांना जाऊ न देणे ही प्रथा आहे, यामुळे महिलांचा अपमान कसा, असा सवाल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.महिलेचा जन्म होऊ न देणं, स्त्री भ्रूण हत्या, मुलींना शिक्षण घेऊ न देणे हा स्त्रीयांचा अपमान आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनिशिंगणापुरात प्रथमच एका स्त्री भक्ताने शनीदेवाचं दर्शन घेतलं होतं. शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यापर्यंत जाण्यास महिला भक्तांना बंदी आहे. मात्र संबंधित महिलेने देवाचं दर्शन घेत देवाला तेलाचा अभिषेकही केला होता.या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंद पाळून शनिदेवावर दुग्धाभिषेक केला होता.गावकऱ्यांच्या या प्रतापामुळे देशभरातून संतापाची लाट उठली. या प्रकारामुळे महिलांचा अपमान झाल्याची भावना सर्वत्र उमटत आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
१०- पुण्यातून उजनी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने सोलापूरला धक्का
११- शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मुंबई उच्च न्यायालयाचा संताप.. महाराष्ट्रात शेती करणं सन्मानाचं होईल, यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावे असे आदेश
१२- रेल्वेसाठी प्रवाशांचे मृत्यू हा फक्त आकड्यांचा खेळ, हायकोर्टाने झापलं
मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टाने रेल्वेला फटकारलं आहे. उपनगरी रेल्वे लोकलमध्ये प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याप्रकरणी आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवू न
शकल्याबद्दल कोर्टाने रेल्वेला धारेवर धरलं आहे.‘कोणीही हा विषय गांभीर्याने घेत नाही. रेल्वेच्या दृष्टीने एका प्रवाशाचा मृत्यू म्हणजे निव्वळ एका आकड्याने वाढ. मात्र ही दुर्दैवी बाब असून रेल्वे प्रशासन पूर्णपणे असहाय्य दिसतंय. पुढील पिढ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी’ असं जस्टीस एन. एच. पाटील यांनी सांगितलं.गर्दी कमी करण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये काय उपाय योजण्यात आले, अशी विचारणाही कोर्टाने केली. ‘गेल्या 5 वर्षांत काय पावलं उचलली गेली? लोकसंख्या वाढत राहणार, मात्र रेल्वेने ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय केलं? रेल्वेकडे याबाबत नियोजनाचा अभाव आहे’ असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.
१३- छोटा राजनच्या न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ
१४- तुरूंगात अबू सालेमची बडदास्त... पार्टीसाठी चिकन, २४ तास मोबाइल
पार्टीसाठी केएफसीमधून चिकन मागवण्याची सवलत, २४ तास मोबाइल आणि अंघोळीसाठी गरम पाणी असा तुरुंगातील एकेक राजेशाही थाट ऐकला की, थक्क व्हायला होईल. तुरुंगातील गैरप्रकाराच्या बातम्या वारंवार येत असताना, आता थेट तळोजा कारागृहातील अबू सालेमच्या बडदास्तीची माहिती समोर येत आहे. या वेळेस ही धक्कादायक माहिती जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांनी चौकशी समितीला दिलेल्या लिखित जबाबातच दिली आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- बुलढाण्यातील खामगावमधील सेंट टॉन्स शाळेतील सहलीसाठी गेलेले 64 विद्यार्थी चेन्नईत अडकले
१६- सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा
सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली. या तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अशी माहिती तहसिलदार सचिन डांगरे यांनी दिली आहे. संबंधित तलाठी हा दारू पिऊन बरळत असल्याचं दिसून आला आहे, प्रसिद्धी माध्यमांमध्येही या तलाठ्याचा व्हिडीओ दिसून येत आहे.
१७- पिंपरी-चिंचवडमध्ये राम मंदिर आणि शीतलादेवी मंदिराच्या दानपेट्या फोडल्या
१८- रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग फसला
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून सर्वाधिक अपघात होत असल्याने ते रोखण्यासाठी म्हणून स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर हा प्रयोग करण्यास सुरुवात करण्यात आली. एका लोकलमधील प्रथम श्रेणीच्या एका महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवून त्याची चाचणी महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये केली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर ही लोकल मार्च महिन्यात चालविण्यात आली. मात्र काही महिने प्रयोग केल्यानंतर तांत्रिक समस्या येऊ लागल्या. लोकलचा दरवाजा काही वेळेला बंदच होत नसल्याचे निदर्शनास आले आणि अनेक अडचणींमुळे स्वयंचलित दरवाजाची सुविधा पश्चिम रेल्वेवर अखेर बंद करण्यात आली. याबाबत रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला विचारले असता, स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा प्रयोग असला तरी तो होणे अशक्य आहे. ल्वेमंत्र्यांनी अपघात रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावयाचा असून त्यात पश्चिम, मध्य रेल्वेसह राज्य शासनाचे प्रतिनिधी आणि प्रवासी संघटना आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करून आणि अनेक तांत्रिक बाजूंचा विचार करूनच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले.
१९- भांडूप; अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून बलात्कार
भांडुप येथील एलबीएसच्या फूटपाथवर राहत असलेल्या नऊ वर्षांच्या एका बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी प्रकाश बर्नाबस (वय ३३) व संतोष पुजारी (२४) यांना अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. एलबीएस परिसरातील फूटपाथवर एक महिला दोन लहान मुलींसह राहते. २७ नोव्हेंबरला जेवण आणण्यासाठी गेली असताना, तिच्या एका मुलीला दोन माणसे घेऊन गेली होती. घरी परतल्यावर त्या महिलेला घडलेला प्रकार तिच्या लहान मुलीने सांगितला. त्यानंतर या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दिली
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- गर्लफ्रेण्डच्या हत्येप्रकरणी ब्लेड रनर दोषीच
२१- BCCI कडून सेहवागचा सन्मान, कोटला स्टेडियमच्या दोन एण्ड्सला वीरुचं नाव
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२२- ‘रक्तमुखी’ नाटकाचे ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि.०२/१२/२०१५ रोजी कुसुम सभाग्रहात सादरीकरण
~~~~~~~~~~~~~~~
२३- महापरीनीर्वान दिना निमीत्त मुंबई करिता ५ डिसेंबर रोजी एक विशेष गाडी
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
दु:खाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय अशा नाही, अपयशाशिवाय यश नाही पराजयाशिवाय विजय नाही
[विठ्ठल करपे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment