Wednesday, 2 December 2015

मुंबई -नांदेड - काझीपेत- मुंबई मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद विशेष गाडी


\
दक्षिण मध्य रेल्वे ने मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई - काझीपेत- मुंबई मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद विशेष  गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ह्या गाडीच्या सहा फेऱ्या पूर्ण होतील.  या पुढील प्रमाणे--

१. गाडी संख्या ०१०९३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - ते काझीपेत मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद.

हि गाडी मुंबई येथून ११. १८ आणि २५ डिसेंबर रोजी  सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, किनवट, आदिलाबाद चंद्रपूर, मार्गे काझीपेत  येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १५.००  वाजता पोहोचेल. 

२. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०१०९४ हि काझीपेत - लोकमान्य टिळक कार्मिनास मुंबई मार्गे आदिलाबाद, किनवट, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे 

हि गाडी काझीपेत येथून दिनांक १२, १९ आणि २६ डिसेंबर रोजी सायंकाळी १७.४५ वाजता सुटेल आणि चंद्रपूर, आदिलाबाद, किनवट,  भोकर, नांदेड, परभणी,  जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री २३.१५ वाजता पोहोचेल. 

या गाडीला १८   डब्बे असतील ज्यात - १- द्वितीय वातानुकुलीत, १- तृतीय वातानुकुलीत, ७  - द्वितीय शय्या, ६  - जनरल, २ - लगेज तथा एस. एल. आर. असतील.

No comments: