अंबेजोगाई कै. आर. डी. देशपांडे प्रतिष्ठान यांच्या वतीने ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत दि.०१/१२/२०१५ रोजी नांदेड केंद्रावर ‘स्वप्नभूमी डॉट कॉम’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
वंश, जात, धर्म यांच्या भेदांमुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. परंतु सर्वांनी माणूस म्हनून जगन हेच खर स्वप्न आसल पाहिजे असा निथळ संदेश या नाटकातून देण्यात आला.
सागर ( अमृत महाजन ) व मधु ( कल्पना महाजन ) हे पती-पत्नी असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती हि बेताची असते. सागर हा एक विचारी लेखक असतो. त्या दोघांचा मित्र मंग्या ( संकेत तोरंबेकर ) हा सामान्य माणसाची स्वप्न पूर्ण करण्याचा अनोखा व्यापार करत आसतो. मंग्या आप्पांचे ( अमर हबीब ) यांचे ‘बॉस’ होण्याचे व सासूबाई ( संध्या काळेगावकर ) यांचे ‘सासू’ होण्याचे स्वप्न सागर व मधु यांच्या सहकार्याने एका नाटकीय पद्धतीने पूर्ण करतो.
परंतु स्वतः मंग्या मात्र ऑनर किलिंग चा बळी आहे. तसेच अप्पांचा मुलगा बेकार असून जात-धर्म यांच्यामुळे विद्वेष वाढवण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत आसतो. तर सासुबाई या इंटरकास्ट मॅरेज मुळे सासर-माहेरच्या लोकांपासून दुरावल्या जातात तर भाऊ ( शशांक दामोशन ) हा राजकारणात जात-धर्म यांचा वापर गेर न मानणारा आहे.
मधु आच्यानक उद्भवलेल्या दंगली मध्ये आपले बाळ गमावते. अशा प्रकारे सर्व पात्र या द्वेष-भावनेच्या एका सत्रात गुंफले जातात.
शेवटी हे सर्व भेद विसरून आपण सर्वांनी ‘माणूस’ म्हणून जगावे हा संदेश हे नाटक देते.
सर्व कलावंतानी आप-आपल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. या नाटकाचे दिग्दर्शन महेश सबनीस यांचे होते तर लेखन अमृत महाजन यांनी केले होते. प्रकाश योजना सुनीलदत्त कुलकर्णी-बाळ मुकद्द्म यांनी केली, नेपथ्य दीपक देवगावकर यांचे तर संगीत अभिजित जोंधळे, सुधीर कन्नडकर यांचे होते.
अनेक विषयात एकदात भाष्य करणारे हे नाटक मानवास विचार करण्यास नक्कीच भाग पाडतो
No comments:
Post a Comment