नमस्कार लाईव्ह ०१-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- रशियाने तोडले आंतरराष्ट्रीय नियम, सीरियावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला
ISISला जेरीस आणण्यासाठी रशियाने कडक पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीरियातील ISISचे मुख्यालाय असलेल्या राक्का शहरावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. रशिया आणि सीरियातील यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असून रशियाने युद्धच पुकारल्याचे दिसून येत आहे. सीरियावर आता अत्यंत घातक अशा व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. तसा दावा सीरियातील ISISने केलाय.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- सर्वांना एकत्र ठेवण्याची राज्यघटनेत शक्ती : नरेंद्र मोदी
सर्वांना एकत्र ठेवण्याची राज्यघटनेत शक्ती सोबत चालण्याने देश प्रगती करतो तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, सोबत चालण्याने देश प्रगती करतो राज्यघटना सामाजिक दस्ताऐवज आहे
३- रस्त्यावर नव्हे, लोकांच्या मनात घाण : राष्ट्रपती
अहमदाबाद : देशातील कथित असहिष्णुतेबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. मनात साचलेली घाण काढून टाका असा इशाराही राष्ट्रपतींनी दिला आहे. प्रणव मुखर्जींनी गुजरातमधील अहमदाबादेत तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ‘स्वच्छ भारत अभियानाचं आपण स्वागतच केलं पाहिजे. हे अभियान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे, त्यामुळे ते यशस्वी करण्यात आपला हातभार लागलाच पाहिजे. खरंतर आपण आपल्या मनात साचलेली घाण काढून टाकायला हवी. गांधीजींचे विचार सर्व अंगांनी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे एक छोटं पाऊल आहे.’ अशा शब्दात स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
४- शीना बोरा हत्या प्रकरण : पीटर मुखर्जी यांना 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
५- आता आमीरला देश सोडण्याची गरज नाही : संजय राऊत
“पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी सहिष्णुता दाखवली आहे. देशात असहिष्णुता आहे असं म्हणणाऱ्यांसाठी यापेक्षा सहिष्णुतेचं उदाहरण काय असू शकतं. शत्रू राष्ट्राच्या पंतप्रधानांशी चर्चा करून खुद्द मोदींनी इतकी सहिष्णुता दाखवली आहे. त्यामुळे आता अभिनेता आमीर खानने देश सोडून जाण्याची गरज नाही”, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
६- मोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात : तेजस्वी यादव
मोदी हे केवळ कपडे धुण्यासाठी भारतात येतात. त्यांनी देशासाठी वेळ काढायला हवा, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना देशातील नागरिकांनी त्यांना परदेश दौरे करण्यासाठी निवडून दिलेले नाही. दरम्यान, बिहारमधील नवीन सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देईल. जनतेसाठी काम करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करेन, असे यादव म्हणाले.
७- नरेंद्र मोदी सर्वात जास्त असहिष्णुतेने पिडीत - राजनाथ सिंह, ग्रहमंत्री
८- आज गुजरातमधील पाटीदार समाज अंदोलनास का उभा आहे - राहूल गांधी, लोकसभा मध्ये
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- डिसेंबर उजाडला, दुष्काळी मदत कधी देणार ? -अशोक चव्हाण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. डिसेंबर उजाडला तरीही 3000 शेतकर्यांनी आत्महत्या केली अशा महाराष्ट्राला संकटातून काढण्यासाठी केंद्र सरकार कधी निधी देणार असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय.
१०- पिंपरी : देहूरोडजवळ लोकलमधून तिघे जण पडले, निकीता अग्रवाल या विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अमृता तलारी, धनराज तोडकर जखमी
पिंपरी-चिंचवड: देहूरोड रेल्वे स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशनदरम्यान चालत्या लोकलमधून पडून तिघेजण खाली पडले. या घटनेत एक जण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. निकिता आगरवाल (वय- 18, रा. देहूरोड) हिचा या अपघातात मृत्यू झाला असून तिची मैत्रीण हर्षदा तलारी (वय-19, रा. देहूरोड) व धनराज तोडकर (वय- 26) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर देहूरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देहूरोड रेल्वे स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या बोपदेवनगर येथे रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. आज दुपारी एकच्या सुमारास पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलने निकिता व तिची मैत्रीण हर्षदा या दोघी घरी चालल्या होत्या. त्या दोघीही दरवाजामध्ये बाहेर पाय सोडून बसल्या होत्या.काम सुरु असलेल्या ठिकाणी एका कामगाराने आपली पहार खडीमध्ये रोवलेल्या स्थितीत उभी केली होती. त्या ठिकाणी लोकल आली असता निकीता हिची चप्पल त्या रोवलेल्या पहारीमध्ये अडकली. त्यामुळे निकीताचा तोल गेला. यावेळी तिला वाचवायला गेलेली तिची मैत्रीण हर्षदा व त्या दोघींना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा धनराज असे तिघेही चालत्या गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने निकिता हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिला वाचविण्याचा प्रयत्न करणारे हर्षदा व धनराज दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देहूरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
११- मुंबई-ठाण्यातील खासदारांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंसह बैठक, लोकलमधून पडून वाढत्या मृत्यूंबाबत चर्चा
१२- विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 61 रुपये 50 पैशांनी वाढ
विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय. सरकारी तेल कंपनीने दिल्लीत जाहीर केले की, विना अनुदानित सिलिंडरची किंमत वाढली आहे. १४.२ किलोचा विनाअनुदानीत सिलिंडर राजधानीत दिल्लीत ६०६.५० रुपये झाला आहे. याआधी या सिलिंडरची किंमत ५४५ रुपये होती. विनाअनुदानीत सिलिंडरच्या किंमती दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधी एलपीजी सिलिंडरचा भाव २७.५ रुपयांनी वाढविण्यात आला होता. सरकार ग्राहकांना एकावर्षात १४.२ किलोचे १२ एलपीजी सिलिंडर अनुदानित देतात. त्यानंतर १३ वा सिलिंडर बाजार भावाने सिलिंडर दिला जातो.
१३- राष्ट्रगीताचा अवमान, मनसेने जाळला MIM चा झेंडा
राष्ट्रगीताच्या अवमान केल्याप्रकरणी आज एमआयएमविरोधात मनसेनं आंदोलन केलं. दादरच्या शिवाजीपार्क जवळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी MIMचे झेंडे जाळले. एमआयएमच्या नेत्यांनी याप्रकरणी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
एमआयएमचे आमदार इम्पियाज जलील यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावर मनसेनं आज आक्षेप नोंदवून आंदोलन केलं.
१४- भाजप खासदारांनी बेताल विधाने बंद केली तर, असहिष्णूतेच्या चर्चेची गरजच पडणार नाही - सुप्रिया सुळे
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ठाणे : सूरज परमार आत्महत्या प्रकरण : चारही नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
१६- डोंबिवली लोकल अपघाताच्या निषेधार्थ प्रवाशांची गांधीगिरी
डोंबिवली : वाढत्या गर्दीमुळे होणाऱ्या लोकलमधील अपघातांविरोधात डोंबिवलीतल्या रेल्वे प्रवाशांनी मंगळवारी आवाज उठवला. गांधीगिरीच्या माध्यमातून डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपरमधल्या प्रवाशांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा निषेध केला. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीच्या भावेश नकाते या तरुणाचा लोकलच्या गर्दीतून पडून मृत्यू झाला होता. याविरोधात रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सकाळी डोंबिवली स्थानकात प्रवाशांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला. गर्दीच्या वेळी डोंबिवलीहून जास्तीच्या लोकल सोडण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली.
१७- लग्नापूर्वी एड्स चाचणी बंधनकारक, बुलडाण्यातील ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव
चिखली तालुक्यातील मुंगासरी, पेठ, कोलारा, आंचारडवाडी, दिवठाना अशा या पाच ग्रामपंचायातींनी मात्र घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे एड्सच्या रोगाला मुळापासूनच उच्चाटन करता येणार आहे. त्याचबरोबर या रोगाच्या अज्ञानामुळे अनाहूतपणे जी कुटुंबे उद्ध्वस्त होतात ते पण थांबेल.या पाच ग्रामपंचायतींनी घेतलेला हा निर्णय क्रांतिकारकाच आहे एचआयव्ही या रोगाविरोधात समाजाच्या स्थारावरुन केलेली हा एक एल्गार आहे. या निर्णयामुळे येणाऱ्या पिढ्या एड्स मुक्त तर असतीलच. मात्र या रोगाला प्रसार होण्यापासून तिथेच रोखण्यात येणार आहे. बुलडाण्यातील या 5 ग्रामपंचायतींचा हा निर्णय सर्वांना अनुकरणीय आहे
१८- नववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत
शाळेतील १३ वर्षाच्या विद्यार्थीनीला शाळेतच प्रसव कळा येऊ लागल्या. तिला माहीत नव्हते की तीच्यासोबत काय होते आहे. तिने शिक्षकांना पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यांनी तिला शौचालयात जाण्यास सांगितले. शाळेच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला जेव्हा त्यांना समजले की विद्यार्थीनीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना सूचित करण्यात आले. मुलीचे पालक धक्क्यात असून त्यांना कळत नव्हते की आपली मुलगी गर्भवती कशी झाली. ही घटना गेल्या शनिवारी घडली. पण प्रकार सोमवारी समोर आला. विद्यार्थीनी आणि तिची नवजात मुलगी रुग्णालयात असून दोन्ही सुरक्षित आहेत.
१९- दिल्लीसह उत्तर भारताला मुसळधार पाऊस
२०- मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळाच्या परिसरात पाणी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- तिस-या कसोटी सामन्याची नागपूरची खेळपट्टी खराब होती -आयसीसी
२२- प्रख्यात सारंगीवादक उस्ताद सबरी खान यांचे दिल्लीत निधन
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी दि. ३०/११/२०१५ रोजी सुहास देशपांडे लिखित ‘अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम'
~~~~~~~~~~~~~~~
२४- वर्षपुर्तीनिमित्त पालकमंत्री दिवाकर रावते यांची आकाशवाणी नांदेडवर गुरुवारी मुलाखत
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात
[गणेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment