Wednesday, 2 December 2015

नांदेड ते पुणे विशेष रेल्वे गाडीच्या ४ फेऱ्या



नांदेड ते पुणे विशेष गाडीच्या ४  फेऱ्या 

दक्षिण मध्य रेल्वेनांदेड विभागाने नांदेड पुणे दरम्यान विशेष गाडीच्या ०४   फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. या पैकी एक गाडी लातूर मार्गे धावेल तर एक गाडी मनमाड मार्गे धावेल. वेळापत्रक पुढील प्रमाणे :

१.      गाडी संख्या ०७६२२/०७६२१ हु. सा. नांदेड - पुणे विशेष गाडी मार्गे लातूर (एकूण २  फेऱ्या):
 गाडी संख्या ०७६२२ हु. सा. नांदेड -  पुणे  विशेष गाडी गुरुवारी रात्री २१.२० वाजता १० डिसेम्बर २०१५ रोजी निघून पुणे येथे दुसर्या दिवशी सकाळी ११.०० वाजता पोहोचेल. 
परतीच्या प्रवासात हि गाडी संख्या ०७६२१ पुणे - नांदेड विशेष गाडी ११ डिसेम्बर रोजी पुणे येथून शुक्रवारी रात्री १९.५५ वाजता  निघून नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.२५ वाजता पोहोचेल. 
हि गाडी दोन्ही दिशेला पूर्णापरभणीपरळीलातूर रोडलातूर,उस्मानाबादकुर्डूवाडी आणि दौंड स्थानकावर थांबेल.

 २.      गाडी संख्या ०२७३० / ०२७२९ हु. सा. नांदेड - पुणे विशेष गाडी मार्गे मनमाड (०२ फेऱ्या) :

हि गाडी संख्या ०२७३० हु. सा. नांदेड ते पुणे विशेष गाडी नांदेड येथून शनिवारी रात्री २०.५० वाजता दिनांक १२ डिसेम्बर २०१५ रोजी निघून पुणे येथे दुसर्या दिवशी सकाळी ०९.२० वाजता पोहोचेल. 
परतीच्या प्रवासात हि गाडी संख्या ०२७२९ पुणे - नांदेड विशेष गाडी पुणे येथून रविवारी रात्री २१.३५ वाजता दिनांक १३ डिसेम्बर रोजी निघून नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता पोहोचेल. 
हि गाडी पूर्णापरभणीपरळीलातूर रोडलातूरउस्मानाबादकुर्डू वाडी,आणि दौंड स्थानकावर दोन्ही मार्गावर थांबेल.  

या गाडीस पूर्णापरभणीसेलूपरतूरजालना आणि औरंगाबादमनमाड,कोपरगावबेलापूरअहेमद नगरआणि दौंड येथे दोन्ही मार्गात थांबेल.

या दोन्ही गाड्यांत एक द्वितीय श्रेणी वातानुकूलीतएक तृतीय श्रेणी वातानुकुलीततीन स्लीपर क्लासआणि चार जनरल आणि दोन सामानाचे डब्बे राहतील. 

No comments: