Saturday, 5 December 2015

५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि. ०४ /१२/२०१५ रोजी ‘गीनिपिंग’ या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण





महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि. ०४ /१२/२०१५ रोजी भाग्योदय महिला मंडळ, परळी, जी. बीड च्या वतीने मिलिंद चन्ने लिखित, दिग्दर्शित ‘गीनिपिंग’ या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण झाले.
    ‘गीनिपिंग’ हे आजच्या समाजातील वातावरणात बदल घडविण्यासाठीचा केलेला एक प्रयोग आहे. जश्या प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तश्या परिस्थितीच्या पण दोन बाजू असतात. एक चांगली दुसरी वाईट, मग नेमक्या कोणत्या बाजूने आपण विचार करावा. ह्याचा विचार करायला भाग पाडणार हे नाटक आहे.
     वडील हे आयुष्यभर स्वतःच्या मुलांसाठी मर-मर करतात. आई ही वातीसारखी जळत राहते मुल हि अभ्यास, संस्कार, करिअर ह्या सगळ्या गोष्ठीच्या तणावाखाली आयुष्य काढतात ह्या सगळ्यांचा कुठेतरी धागा एकच आसतो, ध्येय एकच असते ते म्हणजे एक सुखी आयुष्य....त्यात थोडा जरी रस्ता चुकला तर आयुष्य हे विस्कळीत होत जाते. ह्याचीच जाणीव हे नाटक पाह्तानी होते.
     या नाटकात असलेले पात्र दिनकर ( आक्रूर साळुंके ) ह्या मुलाचे आयुष्य कसे बदलत जाते वडिलांना-कमलाकर ( संतोष चतुर्भुज ) आणि आई-संध्या ( तृप्ती चन्ने ) यांना आपल्या मुलाच्या आयुष्या विषयी वाटणारी चिंता त्याला सरळ मार्गाने चालवण्यासाठी प्रवीणच्या ( सुनील काळे ) मदतीने केलागेलेला प्रयोग आणि त्याचे परिणाम या नाटकात मांडण्यात आला.
     शेख अकबर बागवान यांनी साकारलेली पांडुरंग ची भूमिका सभाग्रहात हाश्याची लहर उमटून जातो तर स्नेहल विखे, दिनेश कदम, बाबासाहेब मुंडे, साहिल आरेकर यांनी आप-आपले पत्र योग्य रीतीने वटवीण्याचा प्रयत्न केला. या नाटकात आदित्य पाथे यांनी संगीत, हेमंत झाडे यांनी नेपथ्य, अनुजा मोरे यांनी वेशभूषा, रोशन वाघ, स्वाती आंबेकर यांनी रंग मंच व्यवस्था सांभाळली. हि स्पर्धा वेवस्थित रित्या पार पाडण्यासाठी दिनेश कवडे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.  

No comments: