Saturday, 5 December 2015

नमस्कार लाईव्ह ०५-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०५-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- कॅलिफोर्नियातील गोळीबाराचं आयसिस कनेक्शन उघड
                      अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात झालेल्या हल्ल्याचं आयसिस कनेक्शन समोर आलं आहे. बुधवारी सॅन बर्नाडिनो शहरात एका कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबारात 14 जणांची हत्या झाली होती तर 14 जण जखमी आहेत. पोलिसांनी सयेद रिझवान फारुख आणि तश्फीन मलिक या दोघा हल्लेखोरांना ठार केलं होती. हे दोघंही पाकिस्तानी वंशाचे असून, हल्ल्याआधी तश्फिननं फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये आयसिसला आणि आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादीला पाठिंबा दर्शवला होता. अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यामागे अतिरेकी संघटनेचा हात आहे की नाही याचा तपास करत असल्याचंही जाहीर केलं आहे.

२- पॅरिस हल्ला प्रकरणात बेल्जियमची तपास यंत्रणा दोन संशयितांच्या शोधात - एएफपी
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
३- दिल्ली पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाचा हल्ल्याचा कट उधळला
४- चेन्नई : पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
५- गेट वे ऑफ इंडिया परिसरात नौदल दिनाचं सेलिब्रेशन, जवानांच्या कसरतीने जिंकली उपस्थितांची मनं
६- फेसबुक, व्हॉट्सअॅपवर बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
७- हिंदी महासागरात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
८- दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी
               वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील. हा निर्णय दिल्ली  आणि दिल्ली बाहेरच्या शहरातील खासगी वाहनांनाही लागू होणार आहे. सीएनजीवर चालणा-या बस टॅक्सी आणि ऑटो रिक्शा तसेच व्यवसायिक वाहनांना या निर्णयातून वगळण्यात आलंय.

९- पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी काम करत असल्याच्या आरोपावरुन लष्कराच्या आणखी एका निवृत्त जवानाला अटक. दिल्ली न्यायालयात आज हजर करणार
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य] 
१०- भुजबळांविरोधात आरोपपत्राला मुख्यमंत्र्यांची परवानगी
११- जायकवाडीला सोडलेलं पाणी बंद करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, 17 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार
१२- राममंदिर उभारल्यास मोदींच्या लोकप्रियतेला चार चाँद : शिवसेना
१३- बिल गेट्स यांनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची भेट
१४- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या राम मंदिर उभारण्याच्या वक्तव्याचे शिवसेनेकडून स्वागत
१५- पूरामध्ये अडकलेल्या १६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले - ओ.पी.सिंह, एनडीआरएफ महासंचालक
१६- चेन्नई शहरात ८५ टक्के वीजपुरवठा सुरळीत केल्याचा सरकारचा दावा
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१७- गोवा महामार्गावर 10 लाखांची अवैध दारु जप्त, लांजानजीक कारवाईत एका आरोपीसह पिकअप व्हॅन ताब्यात
१८- बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरण, ठाणे महापालिकेचे चारही नगरसेवक पोलिस उपायुक्तांकडे शरण
१९- पश्चिम बंगालमध्ये महिलेने तक्रार मागे घ्यायला नकार दिला म्हणून झाडाला बांधून केली मारहाण
~~~~~~~~~~~~~~~
 [इतर]
२०- शनिदेवाला महिला, पुरुष समानच - हेमामालिनी
२१- 'बिग बीं'ची टेनिस कोर्टवर एंट्री
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- मनपा स्टाई समितीच्या सभापती पदाची ९ डिसेंबर रोजी निवड
२३- वसमत; कुरुंद येथील टोकाई सहकारी साखर कारखान्यात अखेर १३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निघणार साखर
२४- देगलूरमध्ये चोरटे पुन्हा सक्रीय, सहा लाखांचा ऐवज लंपास
२५- विजेची हानी कमी करून वाढणारे भारनियमना नियंत्रणात आणण्यासाठी ४८५ वीजचोराविरुद्ध महावितरणाची कारवाई
२६- औसा तालुक्यातील कवठा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
२७- बिलोली; केरूर सज्जाला मागील तीन महिन्यापासून तलाठीच नाही, ग्रामस्थांची गैरसोय
२८- विष्णुपुरी जलाशयात ४१ टक्केच पाणीसाठा शिल्लक, नांदेडवासियांना आगामी काळात भीषण पाणीटंचाईला जावे लागणार सामोरे
२९- माहूर; चार वर्षाचा हिशोब नसल्याने नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा तहकूब, कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याची शक्यता
३०- तरोडा [खु] झेंडा चौक भागात सत्तर हजारांची घरफोडी
३१- धार्मिक महत्व असलेल्या गोदावरीला आता आले गटारगंगेचे स्वरूप
~~~~~~~~~~~~~~~
 [सविस्तर]
३२- मराठवाडयातील दुष्काळावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊन विकास करणार - अर्थ व नियोजनमंत्री सुधिर मुंनगटीवार
~~~~~~~~~~~~~~~
३३- नांदेड उपविभागातील 47 गावच्या पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर
~~~~~~~~~~~~~~~
३४- सातारा; अंबवडे [ता. सातारा] येथे भक्तीगीत अभंग गायन स्पर्धेचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
३५- ५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि. ०४ /१२/२०१५ रोजी ‘गीनिपिंग’ या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
महेश धोंडगे, मुहीबर रहमान, श्रीपाद गारुडी, सुरेश मराठे, राजेश जाधव, राहुल दरक, युवराज वाघमारे, मनीष वडजे, नीलकंठ भोसीकर, मनोज काकडे, अनुष्का देशमुख, भागवत पाटील, आनंद कदम, रमाकांत घोणसीकर, राजश्री सोनवणे, राहुल कांबळे, गजानन मारावर, शिवाजी गडप्पा, मुकेश यादव, संजय नैनवाड, शोवीत गुप्ता, पी.एस. खातोडे, नताशा सिंघ, राकेश कवठे, संदीप बांगल, नचिकेत धर्माधिकारी, गुंजल, अविनाश कोटकर, वाहिद खान, पल्लवी कुलकर्णी, कैलाश कासर,
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार] 
जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखू नका, तुमच्यापेक्षा जास्त कुवत असूनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो, याची जाणीव ठेवा
[कृष्णा भोसीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: