मुक्रमाबाद ..प्रतीनीधी .
मजुराना हाताला गावातच कामे मिळावित उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणली .
मुखेड तालुक्यातील परतपूर येथील मनरेगा या योजनेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सोमवारी ता.सात .मुखेड न्यायालयाच्या आदेशाने परतपूर ता.मुखेड.येथील प्रशासनातिल अधिकारी व लोकप्रतिनिधी अशा 13 जणावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुक्रमाबाद पोलिसांना दिले होते .या आदेशान्वये वरुन पोलिसांनी शुक्रवारी ता.11. रात्री उशीरा गुन्हे दाखल केले .
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परतपूर येथे 2011 ते 2014 या वर्षात गावात व परिसरात पांदण रस्ते , नाला सरलीकरन,रस्ते बनविन्यात आले.या कामासाठी एकुण 40 लाखाचा निधी आला होता .हि कामे नियमाप्रमाणे मजुराकडुन करुन घ्यायचे असते .असे न करता त्यांनी जेसीबीच्या साह्याने करण्यात आली.कामावर मजूर खोटे दाखविने, खोटे जाँबकार्ड बनविने,बाहेरगावी असलेल्या नागरिकांचे मजुर म्हणून नावे दाखवून पैसे उचलने,मृत्यू झालेल्या मजुराची नावे जाँबकार्ड तयार करून शासनाची दिशाभुल करून पैसे हडप केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती .
मुखेड न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी रात्री रोजगारसेवक शिवराज पाटील ,सरपंच रुक्मीनबाई शिवराज पाटील , ग्रामसेवक तुकाराम भायेगावे, पोस्ट मास्तर हनमंत जळागोड, तत्कालीन तहसीलदार प्रविण फुलारी, टी.के नवले, कृषी अधीकारी व्ही.व्ही.सिंगनवाड, गटविकास अधिकारी जि.एल रामोड, उपअभियंता वसंत रावणगावकर, ए.के. धनवाडे, लेखाधिकारी जी. झेड.सांगवीकर,आर. जी.कांबळे ,यांच्यासह 13 जणावर दत्तु नागोराव धमणे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे हे करत आहेत .

No comments:
Post a Comment