Saturday, 5 December 2015

शिक्षण विभगाच्या भोंगळ कारभारामुळे बेटसांगवी येथील अनेक विदयार्थी उल्पसंख्याक शिष्यवृत्ती पासुन वंचित

नांदेड {गंगाधर गच्चे] ―
               जिल्हयातील अनेक गोरगरीब विदयार्थाना शिक्षण घेता यावे व त्याला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने अनेक विदयाथ्र्याना अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना राबवणी जात आहे परंतु नांदेड जिल्हयापरिषद मधील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हयातील अनेक विदयार्थी मागील दोन ते तिन वर्षा पासुन वंचीत असल्याचे दिसत आहे.
नांदेड जिल्हयामध्ये ग्रामीण भागासह शहरातील पहिली ते चैथी  व सातवी  पर्यन्त विदयार्थाला  केंद्र शासनाच्या वतीने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती दिली जाते एका वर्षाला प्रत्येक  विदयाथ्र्याला वर्षाकाटी एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते  यामध्ये अल्पसंख्याक विदयार्थाना बॅकमार्फत वाटप केली जाते परंतु नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावचा जिल्हा परिषद शाळेतील बरेच विदयार्थी या शिष्यवृत्ती पासुन वंचीत राहत असुन त्यांना मागील दोन ते तिन वर्षापासुन बॅकेमध्ये खाते काढले असुन अदयापही शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अल्पसंख्याकांची शिष्यवृती बॅक खात्यामध्ये जमाच होत नाही.  बेटसांगवी येथील विदयार्थी मागील दोन वर्षापासुन जिल्हा परिषद पायÚया झिजवत असुन या कार्यालयातील शिक्षण विभागात सावळा गोंधळ असुन येथील अधिकारी कर्मचारी हे केवळ पायंपुजी गोळाकरण्यात दंग राहतात जिल्हयातील अनेक विदयार्थीना मात्र या शिष्यवृतीपासुन वंचीत राहवे लागत आहे केंद्र व राज्य शासन शिक्षण क्षेत्र सुधारावे विदयाथ्र्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबवत आहे मात्र येथील शिक्षण विभाग नेहमी या ना त्या  कारणाबारुन चर्चा मध्ये राहत असुन शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे बेटसांगवी सारख्या अनेक विदयार्थी अल्पसंख्याक  शिष्यवृत्ती पासुन वंचीत राहत आहेत त्यामध्ये कु. अंकिता गोडबोले, अदीत्य गोडबोले, अजय गोडबोले, बाबासाहेब गोडबोले, कु.संघर्षा गोडबोले,शैलय वाढवे, विकास गोडबोले, काजल गोडबोले, संदेश गोडबोले, सुमेश गोडबाले, करीष्मा गोडबोले, मनोज गोडबोले, कु. शिल्पा गोडबोले,मंगल गोडबोले, शिला गोडबोले, शुभम गोडबोले, अरिफ शेख, करण गोडबोले, कु. मयुरी गोडबोले, नंदा गोडबोले, कु. पुजा गोडबोले, शमा गोडबोले, राणी गोडबोले, या विदयाथ्र्यांना अदयाप शिष्यवृत्ती मिळाली नाही.

No comments: