Saturday, 5 December 2015

नांदेडचे तहसिलदार माधव किरवले यांना कर्मचारीच्या वतीने निरोपसंभारम संपन्न



नांदेड (गंगाधर गच्चे)
                   तहसिल कार्यालयात मागील तीन वर्षापासुन कार्यरत असलेले तहसिलदार माधव किरवले यांची नुकतीच धर्माबाद तहसिलदार म्हणुन बदली झाल्याने नांदेड तहसिल विभागाच्या वतिने नुकताच कार्यक्रम घेऊन निरोप देण्यात आला व नुतन तहसिलदार ठाकुर यांचे स्वागत करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की नांदेड तहसिल कार्यालयात मागील तिन वर्षापुर्वी तहसिलदार पदावर माधव किरवले यांची नियुक्ती झाली व त्यांना पदभार घेऊन सर्व कर्मचारी नागरीकांना विश्वासात घेऊन अनेक नागरीकांच्या हिताची कामे त्यांनी केली व सर्वानांचा  लोकप्रिय तहसिलदार किरवले झाले त्यांनी तालुक्यातील  अनेक समस्या हया सुरळीत सोडवुन नागरीकांना शासनाच्या विविध योजना त्यांनी सर्वच्या दारापर्यन्त नेऊन पोचल्या तालुक्यातील पाणी टंचाई पांदन रस्ते रोजगार हमीची कामे निराधारांचा प्रश्न गावच्या विकासाचे प्रश्न त्यांनी सहन हाताळुन कामे केली यामुळे ते सर्वानांच एक दक्षता अधिकारी म्हणुन परिचीत झाले होते. राज्य शासनाच्या वतीने मराठवाडयातील अनेक तहसिलदारांच्या बदल्या केल्या त्यामध्ये नांदेडचे तहसिलदार माधव किरवले यांची धर्माबाद तहसिल मध्ये तहसिलदार पदावर बदली केली यामुळे नांदेड तहसिल कार्यालयाच्या वतीने त्यांचा निरोप संभारभ च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी  जयराज कारभारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी नामदेव केंद्रे हे होते सर्वप्रथम तहसिल कर्मचारी अधिकारी यांच्यावतीने मावळते तहसिलदार माधव किरवले यांच्या सत्कार केला व नांदेडला बदललुन आलेले तहसिलदार ठाकुर यांचे पदभार घेतल्याने स्वागत करण्यात आले. यावेळीपुरवठाचे नायब तहसिलदार माचेवाड, उप्पेडे मॅडम माधव नागमवाड चिखली (खु) चे सरपंच संजय कोकाटे आदी सह मंडळ अधिकारी सहोर
तालुक्यातील सर्वच स्वतधान्य दुकानदार तलाढी मंडळ अधिकारी व तहसिलचे सर्वच  कर्मचारी अधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तलाढी, पढाण यांनी केले आभार पेशकार फुलवले यांनी मानले 

No comments: