बिलोली : ( यादव लोकडे )
तालुक्यातील सगरोळी येथिल संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनिलराव देशमुख यांची राज्य शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्यावतीने राज्यातील सर्व सैनिकी शाळांचा दर्जा उंचावण्यांच्या हेतुने तपासणी व अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वे शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या कार्यकारणीवर सुनिलराव देशमुख यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यात असलेल्या एकूण 30 सैनिकी शाळांची तपासणी करून या संबंधित शाळेचा तपासणी अहवाल शासनाकडे प्रतवारी देण्यासाठी तसेच CBSC अभ्यासक्रमाच्या दर्जा बाबत अभ्यास करून राज्यातील सैनिकी शाळांचा आभ्यासक्रम दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने सदर समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये मा.आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदर समितीमध्ये महाराष्ट्रातील एकूण १४ व्यक्तींची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यासमितीत नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथिल सुनिलराव देशमुख यांची एकमेव निवड जाहीर करण्यात आली आहे .या समितीच्या मार्फत शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या विविध अहवालाबाबत अवलोकन करून राज्यातील सैनिकी शाळांचा विविध बाबतीचे तपासणी अहवाल समितीमार्फत शासनाकडे सादर करणे यासाठी ही कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. सुनिलराव देशमुख यांनी यापुर्वी देखील शासनाची विविध महत्त्वपुर्ण पदे भुषवली असून त्यांच्या नुकत्याच राज्य सैनिकी शाळांच्या आभ्यासक मंडळावर सदस्यपदी निवडीबद्दल संस्थेच्या वतिने व सगरोळीसह परिसरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment