Thursday, 3 December 2015

नमस्कार लाईव्ह ०३-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०३-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- कॅलिफोर्नियात झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला असून मृतांना श्रद्धांजली

२- कॅलिफोर्नियात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या महिलेची ओळख पटली. तशफीन मलिक महिलेचे नाव
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात गोळीबार करणा-या एका संशयिताची ओळख पटली असून सय्यद फारूख असे त्याचे नाव

३- ब्रिटनचा सीरियावर पहिला हवाई हल्ला

४- डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी घसरून ६६.७२ वर पोचला
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईकडे रवाना, पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा

६- आरक्षण देशासाठी घातक; गुजरात उच्च न्यायालयाची टिपण्णी

७- न्या. टी.एस.ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून घेतली शपथ

८- निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुटका लांबणीवर

९- निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुटका तूर्तास लांबणीवर पडली आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी बाल

१०- सुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या, गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असलेल्या दोषीची (आता वय 21 वर्षे) डिसेंबरमध्ये सुटका होणार नाही.
               दिल्ली पोलिस 
कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अल्पवयीन दोषीला किमान आणखी एक वर्ष प्रशासनाच्या देखरेखीत ठेवण्यात येईल. त्याच्या वर्तनावर करडी नजर ठेवली जाईल. बालसुधारगृहात त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळे पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 16 डिसेंबर 2015 ला त्याची शिक्षा पूर्ण होणार होती.

११- आपल्या हयातीतच राम मंदिर उभारलं जाईल, मोहन भागवतांचा पुन्हा यल्गार
                 अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा संघाचा निर्धार बाबरी प्रकरणाच्या 23 वर्षांनंतरही कायम आहे. आपल्या हयातीतच राम मंदिर उभारलं जाईल, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. ‘माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरु शकतं. उघड्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकतो.’ असं भागवत कोलकात्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. ‘राममंदिराचं निर्माण कधी आणि कसं होईल हे सांगू शकत नाही. मात्र आपल्याला त्यासाठी तयार राहण्याची आणि तयारी करण्याची आवश्यकता आहे.’ असं आवाहनही त्यांनी केलं.

१२-  पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे भारताच्या कुवतीबाहेर - फारूख अब्दुल्लांचे पुन्हा वादग्रस्त विधान
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- 4 हजार 268 कोटींचा डाळ घोटाळा, मुख्यमंत्र्यांना पत्र
                    तब्बल 4 हजार 268 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप ग्राहक पंचायतीच्या सदस्या वर्षा राऊत यांनी केला आहे. या घोटाळ्याची तातडीने सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वर्षा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डाळ घोटाळ्याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तुरडाळीच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्राने राज्य सरकारला निर्देश देऊनही डाळीची किंमत खाली आणण्यात यश आलं नाही. डाळ घोटाळ्याचा पैसा कुणाच्या घशात गेला याचीही चौकशी व्हायला हवी अशी भूमिका ग्राहक पंचायतीने घेतली आहे 

१४- 11 वर्षाच्या चिमुकल्याने वाचवले ७ वर्षाच्या मुलाचे प्राण
                 25 नोव्हेंबरला 7 वर्षाचा चैतन्य मानकर आपल्या मित्रांसोबत सोसायटीमध्ये लपाछपीचा खेळ खेळत होता. यावेळी त्याने शेजारच्या साई निकेतन इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन आत उडी मारली. मात्र इमारतीतील चेंबर उघडा असल्याने तो थेट चेंबरमध्ये पडला. यावेळी चैतन्यच्या ओरड्याचा आवाज ऐकून ऋषी त्याच्या मदतीला धावला. अंधारात ऋषीला चैतन्यचा फक्त हात दिसला. मात्र या हाताला धरुन त्याने चैतन्यला चेंबरबाहेर खेचलं. ऋषीने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचं पालघरमध्ये सध्या चांगलंच कौतुक होतं आहे

१५- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अपात्र उमेदवारांना दिले गेल्याचा आरोप
                     क्रीडाक्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना राज्य शासनातर्फे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मात्र या पुरस्कारासाठी आवश्यक असणार्‍या मुलभूत क्षमता नसणार्‍यांचं यंदाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचा आरोप ज्येष्ठ क्रीडा समीक्षक वि.वि.करमरकरांनी केलाय. या पुरस्कारासाठी योग्यता असणारे अनेक धुरंधर खेळाडू राज्यात असतानाही निवड समितीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत केवळ जिल्हास्तरावरच काम करणारे गणपत माने तर पुण्याचे रमेश एन वीपट या दोघांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे विविध प्रकारच्या 17 खेळांमध्ये मार्गदर्शन करताना 292 खेळाडू घडवण्याचा दावा करणार्‍या गणपत माने यांना जीवनगौरव दिल्यानं या पुरस्कारांचे गौडबंगाल समोर आलंय.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- पुणे: सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बेडरूममध्ये गळफास
                       संकेत विश्वास गेंजगे (वय-28, रा. लेकसाइट, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा सॉफ्टवेअर अभियंता असून सध्या तो कामाच्या शोधात होता. त्याने  घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली

१७- चेन्नईत पूरामध्ये अडकलेल्या २०० जणांना हवाईमार्गे तेलंगणातील बेगमपेठ येथे हलवले

१८- नगर : टेम्पो-दुचाकीच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू, दोघेही साईबाबा संस्थानाचे सुरक्षा कर्मचारी

१९- पुणे - पैसे घेऊन बनावट पदव्या विकणाऱ्या कॅम्प भागात विनापरवाना कॉलेजवर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा

२०- चंद्रपूर - नागभीड परिसरातील दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, आगीत 32 गाड्या जळून खाक
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेते मनोज कुमार रुग्णालयात
                       78 वर्षीय मनोज कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केलं आहे. मनोज कुमार यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही माहिती देऊ नये, अशी विनंती कुटुंबियांनी हॉस्पिटलला केली आहे. त्यामुळे रुग्णालयाने मनोज कुमार यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. देशभक्तीपर भूमिकांसाठी मनोज कुमार यांना ओळखलं जातं. त्यांना ‘भारत कुमार’ असं म्हटलं जातं. त्यांनी शहीद, पूरब और पश्चिम, उपकार, क्रांती, रोटी कपडा और मकानसह 55 सिनेमांत काम केलं होतं. शिवाय सात चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- तीन पक्ष बदलणाऱ्या जाकेर चाऊस यांचा आता राष्ट्रवादीत प्रवेश
२४- माहिती अधिकाराच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी महादेवी मठपती यांची नियुक्ती
२५- बिदर-नांदेड प्रवासादरम्यान महिलेचे एक लाख त्रेचाळीस हजारांचे दागिने लंपास
२६- नासरीफाटा ; अधिकाऱ्याच्या आडमुठी धोरणास कंटाळून शेतकऱ्याने बँकेतच ओतून घेतले अंगावर पेट्रोल
२७- गटशिक्षणाधिकारी के.पी. सोने व विस्तार अधिकारी गोणारे यांना निलंबित करण्याचे आदेश
२८- धर्माबादमध्ये कापसाची आवक वाढली; भाव मात्र घसरले
२९- हदगाव; चिंचगव्हाण येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर भावाकडूनच भावाचा खून `
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मिर्झा बैग, सक़्लैन अबरार, दत्ता खानसोळे, मित्तल साहेब, विवेक देशमुख, गणेश शिंदे, महेश स्वामी, शुभम मंडळ, महेश नंदल, सुनील तुरुकमाने, राणा सिंघ, सतीश महेश्वरी, हर्षद उपाध्याय, शुभम भिंताडे, विक्रम कातरी, ऋषिकेश पवार, सुरेंदर वर्मा, निहार रेड्डी,
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार] 
चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच...
कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी
[प्रकाश सावंत, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: