Thursday, 3 December 2015

‘रक्तमुखी’ नाटकाचे ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि.०२/१२/२०१५ रोजी कुसुम सभाग्रहात सादरीकरण



श्री. सुभाष सारंगधर लिखित गोविंद जोशी दिग्दर्शित ‘रक्तमुखी’ या नाटकाचे ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि.०२/१२/२०१५ रोजी कुसुम सभाग्रहात सादरीकरण झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेड च्या सर्व अनुभवी कलावंतासाहित नवोदित कलावंतानीहि आपल्या सादर्रीकारनातून प्रक्षकांना एक नवीन अनुभूती दिली.
    सृष्टीच्या निर्मितीपासून आजपर्यंत अनेक दिग्गज वेज्ञानिकांनी मानवनिर्मीतीच्या स्त्रोताचा शोध घेत आज ‘हिग्जबोझॉन गॉड पार्टिकल’ पर्यंत प्रवास केला आणि आध्यात्मिक प्रवासात असलेल्या अनेक संत महात्म्यांनी निर्गुण निराकाराची अनुभूती घेत स्वतःच्या जन्म मृत्युपर्यंत जीवनाची उकल करण्याचा आणि जन्मपूर्व आणि म्रत्योत्तर वास्तवाचा आविष्कार अनुभवला. तरीही मानवनिर्मितीच्या स्रोतावर अधिष्ठान मिळवून जन्म मृत्युचे चक्रव्यूह भेदण्याचे यश आधापही मानवाच्यावाट्याला आले नाही. मानव हा पंचमहाभूतांपासून बनला असूनही प्रकृतीच्या आधीन अव्याहतपणे आहे हा सिंधांत दिग्दर्शक गोविंद जोशी यांनी लक्ष्यात घेऊन.
    हा मध्यबिंदू अधोरखित करणारी नाट्यकृती सादर करण्याचा एक अनोखा प्रयोग दिग्दर्शकाने केला आहे. यासाठी मानवांच्या जीवन प्रवासातील अनेक घटनांचा व त्यांच्या जीवनवृत्तींचा आलेख मांडताना ‘परिस्थिती ते मन’ , ‘मन ते स्मृती’ , ‘स्मृती ते अहंकार’ आणि ‘आत्मा ते प्रकृती’ या अधिष्ठानांचा विचार केला आहे. तिन्ही प्रवाश्यांच्या आसक्तीचे कारण दर्शविणारी त्यांची पूर्वपीठीका हि दृश्य ‘परिस्थिती ते मन’ या घटकात मोडतात. आसक्तीपूर्तीसाठी साधू व योगीराज यांच्याकडून ज्ञान प्राप्ती व अध्ययनासाठी केलेला प्रवास दर्शविणारे दृश्य हि ‘मन ते स्मृती’ या घटकात मोडतात. ‘स्मृती ते अहंकार’ यात गर्क असलेल्या संपत्ती, सौंदर्य, सत्ता या तीन मोहासक्त जीवन जगणाऱ्या माणसांचे दर्शन दाखवले आहे. यात तीनही प्रवाशांचा मृत्यू आहे. या तीनही मोहांवर विजय प्राप्त करत जगणाऱ्या मानवाचा म्हणजे योगीराजाचा प्रवास ‘आत्मा ते प्रकृती’ या घटकात मोडतो. या प्रवासात मानवाचा आणि प्रकृतीचे एक विशेष नाते अंकित होते. यासाठी योगीराज यांचा मोह आणि अहंकार तर रक्षीका म्हणजे प्रकृतीचे निर्गुण निरागस अभिव्यक्तीचा वापर केला आहे.
   या नाटकात राम चव्हाण यांनी विडीलांची भूमिका साकारली तर आई ची भूमिका डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी साकारली, प्रवाश्यांची भूमिका अभिजी घोदे, प्रशांत दिग्रसक, विवेक भोगले, प्रमोद यन्नावारयांनी साकारली तात्याची भूमिका डॉ. विलासराज भद्रे यांनी तर योगीची भूमिका गोविंद जोशी यांनी, साकारली दिपाली ओपळकर यांनी तरुणीची भूमिका साकारली तर साधूची भूमिका रोहित मेथेकर यांनी साकारली, नीता खोबे, स्वाती गोतावळे,धम्मापाली दुधमल, ज्योस्ना मुदीराज यांनी स्त्रीयांची भूमिका पार पाडली. या नाटकाचे नेपथ्य अभिनव जोशी, राधिका खोबे, विश्वजीत भोगले यांनी केले, संगीत सुभाष सारंगधर यांचे होते तर प्रकाश योजना अशोक माढेकर यांचे होते, रंगभूषा- पुरुषोत्तम हळदेकर, अंजली माढेकर, वेशभूषा- रश्मी वडवळकर यांचे होते. या नाटकाची निर्मिती होती संजीव कुलकर्णी यांची
राज्य नाट्य स्पर्धेत पुन्हा एकदा प्रक्षकांचे पाउले कुसुम सभाग्रहाकडे वळत आहेत.

No comments: