Saturday, 5 December 2015

जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्‍ये होणार रोजगार सभा


नांदेड,5- जिल्‍हयामधील दुष्‍काळसदृष्‍य परिस्थिती पाहता आगामी काळात जिल्‍ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमधील मजुरांच्‍या हाताला गावातच काम मिळावे, याकरीता महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्‍ट्र शासन अंतर्गत येत्‍या 8 आणि 9 डिसेंबर रोजी गावस्‍तरावर रोजगार सभा घेण्‍यात येणार आहेत, अशी माहिती जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी व जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांनी दिली.
     रोजगार मेळाव्‍यामध्‍ये महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयीची माहिती देऊन ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकांनी ग्रामस्‍थांकडून रोजगार मागणी पत्र भरुन घ्‍यावे.
     या रोजगार सभेमध्‍ये गावातील पाणीटंचाई व त्‍याबाबत करावयाची उपाययोजना यावर चर्चा करुन ग्रामस्‍थांना दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीमध्‍ये रोजगार उपलब्‍ध करुन द्यावा. तसेच ग्रामस्‍थांकडून कामाच्‍या मागणीपत्रासोबत आधार कार्ड क्रमांक, बॅक खाते क्रमांकही घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी व मुख्‍य कार्यकारी अधिकारी, अभिमन्‍यु काळे यांनी केले आहे. 

No comments: