Saturday, 5 December 2015

शालेय विद्यार्थ्‍यांनी मोठे स्‍वप्‍न गाठण्‍यासाठी अभ्‍यासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक - जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर




नांदेड-5, शालेय विद्यार्थ्‍यांनी मोठे स्‍वप्‍न गाठण्‍यासाठी अभ्‍यासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.     
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्‍तावाढ अभियानांतर्गत कंधार तालुक्‍यातील उमरज येथील जिल्‍हा परिषद शाळेस वर्षाताई भोसीकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला.  यावेळी संजय भोसीकर, हणमंत पेठकर, मुख्‍याध्‍यापक एन.जी. स्‍वामी, सह शिक्षक आर.के. वाघमारे, एस.डी. घोणसे, एन.एम. कावळे, एम.बी. राठोड, सौ. एस.यू. कंधारकर आदींची उपस्थित होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, मुलांना अभ्‍यासाची गोडी लागावी यासाठी शिक्षकांनी विविध खेळांच्‍या माध्‍यमाने मुलांना शिक्षण द्यावे, पाढे, वाचन, शुध्‍द लेखन, अंक गणिताच्‍या तयारीसाठी जादा तासिका घेऊन मार्गदर्शन करावे. दर पंधरा दिवसाला घेण्‍यात येणा-या परीक्षा नियमित घेऊन दर महिन्‍याच्‍या पालक मेळाव्‍यात मुलांच्‍या प्रगतीची माहिती द्यावी या उपक्रमातुन शाळेची गुणवत्‍ता वाढेल असेही त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी जिल्‍हा परिषद शाळेमध्‍ये वर्षाताई भोसीकर यांनी प्रत्‍येक वर्गात जाऊन विद्यार्थ्‍यांची प्रगती जाणून घेतली. 

No comments: