Wednesday, 2 December 2015

कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी आज परीक्षा


नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या कंत्राटी ग्रामसेवकासाठी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी नांदेड शहरात तीस परिक्षा केंद्रांवर परिक्षा घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी यू.ए.कोमवाड यांनी दिली.
      एकूण 45 कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी या परिक्षा घेण्‍यात येत असून यासाठी 12 हजार 175 अर्ज प्राप्‍त झाले असून यापैकी 8 हजार 500 पात्र उमेदवार परिक्षा देणार आहेत. सकाळी 10 ते 11.30 या वेळेत ही परिक्षा होणार आहे. नांदेड शहरातील 30 परिक्षा केंद्रांवरुन ही परिक्षा होणार असून यासाठी 800 अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. 

No comments: