Sunday, 6 December 2015

जिल्ह्यासह देशभरात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर कार्यक्रम

बिलोली : ( यादव लोकडे  )

येथे भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरीनिर्वान दिनानिमीत्त बिलोली तहसिल कार्यालयासमोर म.रा.मराठी पत्रकार संघ , बहुभाषिक पत्रकार संघ , प्रेसफोरम पत्रकार संघ , अखिल भारतीय पत्रकार संघ व विविध सामाजिक संघटनाच्या वतिने अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला .
प्रतिवर्षा प्रमाणे बिलोली येथे दि 6 डिसेंबर रोजी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनानिमीत्त अभिवादन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात बिलोली येथिल न पा नगरध्यक्ष सौ.मैमुना बेगम यांचे पती बाबूबेग ईनामदार , उपनगराध्यक्ष यशवंत गादगे , पोलिस निरीक्षक अंगद सुडके , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ नागेश लखमावार , माजी नगरध्यक्ष भिमराव जेठे , अमजद चाऊस , अनुप अंकुशकर , नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड , पत्रकार गोविंद मुंडकर , यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती अभिवादन सोहळ्यासाठी उपस्थित होते . या अभिवादन सोहळ्यानिमीत्त शहरातील आंबेडकर नगर मधील महाविद्यालयीन तरूणींनी त्रिशरण पंचशील वंदना सामुहिक वदवून घेतली .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.रा.मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष वल्लिओद्दीन फारूखी , प्रेसफोरम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.मोहसीन खान , बहुभाषिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष यादव लोकडे सगरोळीकर , राजु पाटील शिंदे , शेख इलियास , भिमराव बडूरकर , लक्ष्मण शेट्टीवार , बालाजी नरहरे , गौतम लंके , संजय जाधव आदीनी परिश्रम घेतले . दरम्यान आंबेडकर नगर येथिल समाजमंदिरातही नगरसेविका सौ. आमृपाली प्रकाश पोवाडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राजेंद्र कांबळे , रत्नाकर जाधव , संजय जाधव , मुन्ना पोवाडे यांची उपस्थिती होती.
**************************
**************************
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलकी येथे महामानवास विनम्र अभिवादन 

**************************
**************************
माैजे.डोंगरगांव ता.मुदखेड येथील बाैध्द धर्म विहार प्रगंणात परमपुज्य महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिवान दिना निमीत्य त्यांना विनम्  अभिवादन करण्यात आले. त्यावेळी गावातील सरपंच प्रतिनिधी श्रीनिवास महादवाड,बाबुगिरी महाराज,शिवाजी केदारे, संजय सावंत,साहेबराव सावंत,सदाशिव सावंत, चंद्रकांत व्यवहारे,इ.मान्यवर व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते..






No comments: