Saturday, 5 December 2015

नमस्कार लाईव्ह ०५-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

 नमस्कार लाईव्ह ०५-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- लष्कर-ए-तय्यबा दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्याच्या तयारीत
             लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि हाय प्रोफाईल व्यक्ती या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचेही समजत आहे. गुप्तचर खात्याने दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तय्यबाचे दुजान आणि कुशान हे दोन हस्तक पाकवाप्त काश्मीरमधून भारतात शिरले आहेत. दिल्लीच्या लोधी कॉलनी परिसरात १ डिसेंबर रोजी यासंबंधी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली होती. या एफआरआयमध्ये नमूद केल्याप्रमाणे लष्कर-ए-तय्यबा दिल्ली आणि अन्य भागात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी दोन दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्याकडून फियादीन किंवा बॉम्बहल्ला करण्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

२- इजिप्तने पाकिस्तानने निर्मिती केलेल्या जेएफ-१७ थंडर लढाऊ विमानाच्या खेरीदमध्ये दाखवला रस
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईत पूरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली
४- गुवाहटीमध्ये कमी तीव्रतेचे 2 स्फोट, चेंगराचेंगरीत २ ते ३ जण जखमी
             आसामच्या गुवाहाटी शहरातील फॅन्सी बाजारात दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या स्फोटाची तीव्रता कमी होती. गुवाहाटी शहराच्या मध्यभागी फॅन्सी बाजार आहे. हा परिसर अतिशय गजबजलेला असून व्यापारी भाग म्हणून ओळखला जातो. हिंदी भाषिकां प्रचंड लोकप्रिय असा भाग म्हणूनही या भागाची ओळख आहे. एका मंदिराच्या शेजारी असणाऱ्या कचऱ्यात स्फोटकं ठेवली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, स्फोट झालेल्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

५- रेल्वे आरक्षणावेळी लहान मुलांना फुल तिकीट
            लहान मुलांच्या तिकीटाच्या सुधारित दरानुसार 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांचं आरक्षण करताना त्यांच्याकडून पूर्ण तिकीटाची रक्कम घेण्यात येईल. मात्र अनारक्षित तिकीटांसाठी हा बदल लागू केला जाणार नाही. म्हणजेच अनारक्षित तिकीटांसाठी लहान मुलांचं हाफ तिकीटच काढण्यात येईल. जर 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना पूर्ण बर्थ हवा असेल तर पूर्ण तिकीट काढावं लागेल, मात्र बर्थ अथवा सीट नको असल्यास त्यांच्याकडून हाफ तिकीटच आकारण्यात येईल.

६- खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन
               या योजनेंतर्गत पोस्टात एक विशिष्ट रक्कम दरमहिन्याला जमा केली जाईल. या रकमेतून पेन्शनची सुविधा दिली जाणार आहे. योजनेंतर्गत पोस्टामध्ये खाते खोलले जाईल. डिसेंबर महिन्यात ज्या नोकरदारांचे खाते खोलले जाईल त्यांच्या खात्यात केंद्र सरकार पाच हजार रुपये जमा करणार आहे. मासिक, त्रैमासिक पद्धतीने तुम्ही खात्यात रक्कम जमा करु शकता. वयानुसार त्या व्यक्तीला पेन्शनची रक्कम दिली जाईल. कमीत कमी एक हजार आणि जास्तीत पाच हजारांपर्यंत पेन्शनची रक्कम मिळणार आहे. एक हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना पोस्टाकडून १.७ लाख आणि पाच हजार रुपये पेन्शनच्या खातेधारकांना मृत्यूनंतर ८.५ लाख रुपयांची रक्कम मिळेल. पेन्शन योजनेसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. 

७- दिवंगत डॉ. कलाम यांच्या नावे बीएसएनएलकडून थकित बील
            2724800 या टेलिफोन क्रमांकाचं दीर्घ काळापासून थकित असलेलं एक हजार 29 रुपयांचं बील भरण्याची नोटीस 18 नोव्हेंबर 2015 रोजी पाठवण्यात आली आहे. इतकंच नाही तर कलाम बिल भरण्यास असमर्थ ठरल्यास त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता स्थानबद्ध करण्याचे आदेशही तिरुअनंतपुरम प्रदेश कार्यालयातील रिकव्हरी ऑफिसरला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या नोटीसवर त्रिवेंद्रम विभागाच्या अकाऊण्ट ऑफिसरची स्वाक्षरीही आहे. 

८-पूरग्रस्त तामिळनाडूतील मृतांचा आकडा ३०० वर पोचला
९- उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये अंगावर वॉटर टँक कोसळून ३ लहान मुलांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- दादरचं नामकरण चैत्यभूमी करण्यात यावे या मागणीसाठी दादर स्टेशनवर आंदोलन
११- विधान परिषद निवडणूक : राणे रिंगणात उतरण्याची शक्यता, हायकमांडची घेतली भेट
१२- चेन्नईमध्ये अडकलेले बुलडाण्याचे विद्यार्थी सुखरुप परतले
 १३- दिल्लीतील जनता कराच्या रुपाने केंद्र सरकारला जितका पैसा देते, तितका केंद्र सरकार दिल्लीला देत नाही - केजरीवाल
 १४- पुणेः महापालिकेतर्फे देण्यात येणारे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार जाहीर
१५- नागपूरः समुद्रपूर न्यायालयाचा कनिष्ठ लिपिक कवडू नामदेवराव टापरे (५१) यांना १०० रुपयांची लाच घेताना अटक
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- अकोला किडनी रॅकेट प्रकरणातील आरोपी आनंद जाधव आणि देवेंद्र शिरसाट यांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
           कोल्हापूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार घडलाय. सिनिअर विद्यार्थ्यांनी दारु पिऊन मारहाण केल्याचा आरोप ज्युनिअर विद्यार्थ्यांनी केलाय. या घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले आहे. काल गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून 4 पैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकऱणी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून चौकशीचेही आदेश देण्यात आलेत. जखमी विद्यार्थी जयंत तोंडे हा या मारहाणीमध्ये आणि रॅगिंगमध्ये जखमी असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. आता चौकशीनंतर या विद्यार्थ्यांवर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. 

१६- आळंदीत घरात खेळताना बादलीतील पाण्यात पडून लहान मुलाचा मृत्यू, आळंदीजवळ मरकळ येथे दुपारी एकच्या सुमारास दुर्घटना
              कोल्हापूर : पाळणाघरात बालदीत पडून एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. रणजय सुर्वे असं या दु्र्दैवी बालकाचं नाव असून शिवाजी विद्यापीठातल्या डे केअर सेंटरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. शिवाजी विद्यापीठाचे लेखापाल उत्तम सुर्वे यांचा हा मुलगा होता. त्यांच्या पत्नी गृहिणीच असल्या तरी, दोन मुलं सांभाळणं कठीण जात असल्याने त्यांनी रणजयला पाळणाघरात ठेवलं. पाळणाघरात खेळता-खेळता रणजय एका बादलीत पडला. मात्र अर्धा तास उलटूनही त्याच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही अखेर पाळणाघरातील सेवेकरी गार्गी कुडाळकर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर रणजयला विद्यापीठातील रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर खासगी रुग्णालयातही नेलं मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

१७- साईप्रसाद या चिटफंडचे सर्वेसर्वा बाळासाहेब भापकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, सेबीच्या तक्रारीनंतर करण्यात आली अटक
१८- अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट म्हणून भाप्रसे डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्वीकारला पदभार
१९- चेन्नई येथील मुसळधार पावसामुळे 6 आणि 7 तारखेची संबलपुर- नांदेड-संबलपुर एक्सप्रेस रद्द
२०- आळंदीत घरात खेळताना बादलीतील पाण्यात पडून लहान मुलाचा मृत्यू, आळंदीजवळ मरकळ येथे दुपारी एकच्या सुमारास दुर्घटना
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- देगलूर येथील शाळेच्या नव्या इमारतीस मोठमोठ्या भेगा
~~~~~~~~~~~~~~~
२२- जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्‍ये होणार रोजगार सभा
~~~~~~~~~~~~~~~
२३- शालेय विद्यार्थ्‍यांनी मोठे स्‍वप्‍न गाठण्‍यासाठी अभ्‍यासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक - जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~
२४- आयुक्ता समोर नांदेड जिल्हयातील अनेक प्रकरणाची सुनावणी
~~~~~~~~~~~~~~~
२५- शिक्षण विभगाच्या भोंगळ कारभारामुळे बेटसांगवी येथील अनेक विदयार्थी उल्पसंख्याक शिष्यवृत्ती पासुन वंचित
~~~~~~~~~~~~~~~
२६- नांदेडचे तहसिलदार माधव किरवले यांना कर्मचारीच्या वतीने निरोपसंभारम संपन्न
~~~~~~~~~~~~~~~
२७- लोकस्वराज्य आदोलनाच्या वतीने हिवाळी अधिवेशानावर भव्य मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.
हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
[विठ्ठल वाघमारे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: