Sunday, 6 December 2015

नमस्कार लाईव्ह ०६-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०६-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- अब्जावधींचा खजिना असलेलं 307 वर्षे जुनं जहाज सापडलं
              कोलंबियामध्ये खजिन्याने भरलेलं स्पेनचं ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. अब्जावधी डॉलरचं हे असण्याची शक्यता आहे.कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवरुन खजिन्याने भरलेलं जहाज मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “सेन जोस हे एक जुनं जहाज सापडलं आहे. या जहाजाबाबतची अधिक माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल.”, असे कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी माहिती दिली. 1708 साली ‘स्पॅनिश उत्तराधिकार युद्धा’दरम्यान हे जहाज ब्रिटनच्या जहाजांनी बुडवलं होतं. असं म्हटलं जातं की, हे जहाज सोनं आणि चांदीच्या नाण्यांनी भरलं आहे. 


२- लंडन मेट्रोमध्ये चाकू हल्ला, तीन जण जखमी, दहशतवादी हल्ल्याचा संशय
३- नेपाळ : बीरगंजमध्ये तीन महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या आहेत, येथील मधेशी आंदोलनामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
४- असहिष्णूतेच्या चर्चेला राजकीय अंग असू शकते. पण सर्वोच्च न्यायालय असेपर्यंत कोणीही घाबरण्याचे कारण नाही - टीएस ठाकूर, सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
५- बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेला २३ वर्ष झाली म्हणून एमआयएमचे हैदराबाद बंदचे आवाहन
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य]
६- भुजबळ राज ठाकरेंच्या घरी भेटीला, अडीच तास बैठक, कारण गुलदस्त्यात !, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
७- डॉ. आंबेडकरांना अभिवादनासाठी चैत्यभूमीवर भीमसागर;  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉ. आंबेडकरांचं पुण्यस्मरण
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
८- अकोला : राष्ट्रीय महामार्ग 6 वर मूर्तिजापुर तालुक्यातील कुरुम गावाजवळ दोन ट्रकचा अपघात, एका ट्रकचालकाचा मृत्यू
९- नांदेड : खवा खाल्ल्याने मुदखेड शहरात 20 जणांना विषबाधा, 8 बालकांना नांदेडला हलवले
१०- दुष्काळाचा बळी, लग्न खर्चाच्या चिंतेनं तरुणीची आत्महत्या
                  लक्ष्मी धोंडबा खोरणे हिचे वडील शेतकरी होते. त्यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. लक्ष्मी पेक्षा 3 मोठ्या बहिणी तिघींचे लग्न करून लक्ष्मीची आई अभयीबाई थकली. घरी दोन एकर शेती असून, लक्ष्मीचा भाऊ समाधान वसमत तालुक्यात एका शेतावर सालगडी म्हणून कामाला गेला आहे. लहान भाऊ लक्ष्मी सोबतच शेतात मजुरी साठी जातो. दुष्काळामुळे दोन एकर शेतातून यंदा लागवडीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. पहिलेच तीन बहिणीचे लग्न करून अडचणीत सापडलेली आई या स्थितीत आई आपला विवाह कसा करेल, याची चिंता लक्ष्मीला भेडसावत होती. 


११- गुरगाव पोलिसांनी छेडछाड करणा-यांविरोधात राबवली ऑपरेशन रोमिओ मोहिम. तीन तासात ७५ जणांना अटक
१२- हिसार जिल्ह्यात हिसार-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर गारही गावाजवळ ट्रकची कारला धडक, ६ ठार, ४ जखमी
१३- राजस्थानच्या प्रतापगडमध्ये भीषण अपघात, ट्रकची जीपला धडक, १८ ठार २५ जखमी. जखमींना उदयपूरच्या रुग्णालयात हलवले
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१४- रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे रेल्वेस्थानकांचे रंगरंगोटी, साफसफाई व दुरुस्तीची कामे लगीनघाईने सुरु, कामाचा दर्जाकडे दुर्लक्ष रंगचोपडून दोष झाकाण्याचाच प्रयत्न
१५- १८ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात जमाव व शास्त्रबंदी आदेश लागू
१६- महापालिका देणार दीड हजार उमेदवारांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, अर्ज करण्याचे आवाहन
१७- दि. ८ रोजी शालेय पोषण आहार कामगारांचा विधानभवनावर मोर्चा
१८- बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी मेहुण्यांची आत्महत्या; नापिकी व दुष्काळाला कंटाळून उचलले पावून
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
डॉ. बालाजी मोरालवार, निलेश जैन, सुमेध चव्हाण, सौरव मिद्या, प्राची, सागर वाकचौरे, योगेश भालेराव, कौस्तुभ गांधी, दिपिशा अमयुत्कार, भगवान खैरे, संतोष जोशी, राजेंद्र कदम, आनंद हंबर्डे, विनायक मटके, बाळू गुडमुडके, राहुल लामतुरे, नवनाथ तोरणे, शुभम गारोळे, रमेश मोलके, माधव खातगावे, सचिन बिरकुर, मनीष गुप्ता, चंदन मुधोळ, राजेश देशमुख
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा कि  कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर रस्ता कसा आहे हे बघू नका, त्या रस्त्यावर चालत राहा
[सुरेश रणवीर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: