Saturday, 5 December 2015

लोकस्वराज्य आदोलनाच्या वतीने हिवाळी अधिवेशानावर भव्य मोर्चा



नांदेड (गंगाधर गच्चे)
                  येथून लोकस्वराज्य आंदोलन या सामजिक संघटनेच्या वतीने नांदेड ते नागपूर महापदयात्रा काढून एसी मधील आरक्षण वर्ग वारीस अ,ब,क,ड या मागणीसाठी हजारो कार्यकत्यासह मोर्चा काढुन  मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देणार येणार आहे.

नांदेड येथील लोकस्वराज्य आंदोलन ही सामाजिक संघटना असून गोरगरिबांच्या समाजिक हितासाठी असून या संघटनेने एसी प्रवर्गाातील अ,ब,क,ड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जागे करून मातंग समाजावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी नांदेड येथून दि 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळया पासून लाखो कार्यकत्र्यासह पदयात्रा निघणार आहे. जिल्हयातील व जिल्हा बाहेरील लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकत्यांनी या पद यात्रेत सामील व्हावे व मातंग समाजाच्या हितासाठी राज्य शासनाला हिवाळी अधिवेशानात निवेदन देवून आरक्षणात अ,ब,क,ड वर्गवारी करण्यासाठी भाग पाडावे यासाठी हजारोच्या संख्ये सामिल व्हावे ही पदयात्रा नांदेड हदगाव,यवतमाळ,वर्धा या मार्गावरून दि. 17 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशानावर भव्य मोर्चा धडकणार आहे.
तरी लोकस्वराज्य आदोलन संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने सामील व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे व नांदेड दक्षिण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ जोगदंड पिंपळगांवकर  यांनी केले आहे. 

No comments: