५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि. ०५/१२/२०१५ रोजी शेवटचे नाटक सादर झाले. नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित ‘नरकचतुर्दशी’ या नाटकाचा प्रयोग तन्मय गुप, नांदेड तर्फे सादर करण्यात आला.
अत्याचारित, बलात्कारी स्त्रियांच्या समस्येवरील प्रश्नाला भगवान श्रीकृष्णानी दिलेले उत्तर म्हणजे फक्त नरकासुराचा वधच नव्हे तर...त्या सोळा सहस्त्र स्त्रिया ज्यांना समाजाने नाकारले आहे, त्यांचा स्वीकार करावा हा भगवंतानी दाखवलेला मार्ग हे उत्तर लेखकाने आपल्या संहितेतून अधोरेखित केलेच आहे. पण हे सांगत असताना लेखकाने निवडलेली गोव्याची पार्श्वभूमी आणि नरकचतुर्दशी उत्सव या अनुषंगाने ग्लोबलायजेशन, वाढत्या जागतीकरनाच्या आक्रमणाने लयास जाणारी संस्कृती, संस्कार....विकृत होणारे सन...उत्सव या बरोबरच बलात्कारी स्त्रियांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा समजतील वेग वेगळे घटक समूहांचा, वेक्तींचा दृष्टीकोन फारच मार्मिक पणे मांडला आहे. लेखक हा प्रश्न फ.टी.आय.आय. च्या मुलांच्या माध्यमातून वैक्तिक मानसिक पातळीवर तर खेळवतोच पण तोच लेखक मॅनेजर डिकोस्टाच्या ( नाथ चितळे ) माध्यमातून जागतिकीकरनाच्या, भोगवादाच्या, चंगळवादाच्या वाढत्या अक्रमनावरही बोचरी टिका करतो .लेखकाची संहिता कोणताही प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमीचा आव न आणता साध्या सरळ सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जेंव्हा अवि ( सचिन गायकवाड ), रॉनी ( सचिन जोशी ), विकी (प्रणव चौसाळकर ), समीर ( अमोल काळे ) यांना असे कळते आपल्या हातून बलात्कार झाला आहे तेंव्हा..निर्भयावर तावातावाने क्रिया, प्रतिक्रिया देणारी हि नव विचारवादी पिढी कशी वागते किंवा कशी व्यक्त होते...हेदाखवत असताना पात्रांच्या संवाद फेकीतील बदलाने त्यांच्यातील संधीसाधू विकृतीचे रंग गडद करण्याचा किंवा त्यांच्या चर्चेला त्यांच्या ग्रुपमधील चर्चा न ठेवता कुठल्यातरी चौकातील रिकामटेकड्या समाज समूहाच्या चर्चेचे कुजबुजुचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नाटकाच्या अंतिम चरणी... असह्य अत्याचारी स्त्री जेंव्हा कृष्णाचा ( भरत जेठवानी ) धावा करते व निराश होते, तेंव्हा प्रेक्षागृहातून तिच्यावर पडणारे निळे प्रकाश किरण व गोड बासरीचे सूर हे श्रीकृष्णाच्या असण्याचे, आगमनाचे प्रतिक दाखवण्यात आले
या नाटकात कु. श्वेतांबरी कनकदंडे, कु. आदिती डोंगरे, कु. माणिक जोशी, कु. शुभांगी वाणी, सुमित नाईक, श्री. त्र्यंबक महाजन, श्री. विजय डोंगरे, सुकृत भोसकर, सुनील जाधव, सुमेध महाजन, सतीश राऊतखेडकर, गजस्वीनी देलमाडे, रसिका जोशी, शुभम कांबळे, कु. नेहा अलूरकर, कु. मनीषा चौधरी, सौ. निलीमा चितळे यांनी आप आपल्या पत्रास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला तर या नाटकाचे नेपथ्य-दिनकर दलाल, नुपूर चितळे,विजय आडे, प्रकाश योजना- अविनाश बोबडे, नितीश देशपांडे, नेहा अलूरकर, संगीत-सौ. अंजली चितळे, संगीतकार-स्वरूप देशपांडे, तर रंगभूषा- कु. नेहा चितळ यांनी सांभाळली.
५५ वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर सुरळीत रित्या पार पडली आणि प्रेक्षकांनीही या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. स्थानिक रंगकर्मी व हौशी कलावंतांवर प्रेम करणाऱ्या नांदेड करांमुळे हि स्पर्धा वेवस्थित रित्या पार पाडू शकलो. आसे मत नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी व्येक्त केले.
No comments:
Post a Comment