Thursday, 3 December 2015

महापरीनीर्वान दिना निमीत्त मुंबई करिता ५ डिसेंबर रोजी एक विशेष गाडी



आदिलाबाद, नांदेड येथून महापरीनीर्वान दिना निमीत्त मुंबई करिता  ५ डिसेंबर रोजी एक  विशेष गाडी चालविण्याचे ठरवले आहे. पुढील प्रमाणे--
गाडी संख्या ०७०५८ आदिलाबाद- नांदेड -दादर
हि गाडी आदिलाबाद येथून ५ डिसेंबर रोजी  सकाळी १०-००  वाजता सुटेल आणि नांदेड येथे दिनांक ५ डिसेंबर रोजी  दुपारी १४:०० वाजता पाहाेचेल़ तर १४.२० वाजता सुटुन दादर येथे दुसर्या दिवशी सकाळी ४:३० वाजता पाेहाेचेल़़
परतीच्या प्रवासात ही गाडी संख्या  ०७०५७ दादर येथुन दिनांक ६ डीसेंबर राेजी रात्री २१:४५ वाजता सुटुन नांदेड येथे ७-१२-२०१५ ला सकाळी १०:०० वाजता पाेहाेचेल आणि आदिलाबाद येथे दुपारी १४-३० पाेहाेचेल़ 
या गाडीला १२ डब्बे असतील ज्यात -१० - जनरल, २ - लगेज तथा एस. एल. आर. असतील.

दक्षिण मध्य रेल्वे
नांदेड विभाग, 
जनसंपर्क कार्यालय, नांदेड 

No comments: