शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना 6 लाख 36 हजार रुपयांचे अनुदान वाटप
नांदेड 4, लोकसहभागातून स्वच्छतेची कामे केल्यास गावे निर्मल होतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील उमरज इथं शुक्रवार दिनांक 4 डिसेंबर रोजी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. रावण महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल गुनाळे, मिनी बिडीओ अरुण घोडसे, हनमंतराव पेटकर, चेअरमन मोतीराम तोरणे, सुंदरसिंह चौहान, राजु गंदलवाड आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, शौचालय असणे आता प्रतिष्ठेचे लक्षण झाले असून आरोग्य अबाधित राहण्यासाठी गाव हागणदारीमुक्त होणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग मिळाला तरच गावे निर्मल होतील, असे मत वर्षाताई भोसीकर यांनी व्यक्त केले. यावेळी शौचालय बांधकाम केलेल्या पात्र 53 लाभार्थ्यांना 12 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर 6 लाख 36 हजार रुपयांचे अनुदानाचे धनादेश वाटप वाटप करण्यात आले. शौचालय वापर असलेल्या व नसलेल्या कुटुंबाच्या घरावर जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्याहस्ते स्टीकर लावण्यात आले.
प्रारंभी ग्राम पंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शॉल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीराम तोरणे यांनी केले, सूत्रसंचालन शांतीलाल राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार सुंदरसिंह चौहान यांनी मानले. या कार्यक्रमाला पदमिन गंदलवाड, काशिम पठाण, महाजन कांबळे, नारायण गिते, परमेश्वर तोरणे, नारायण तोरणे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीक व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.



No comments:
Post a Comment