Friday, 4 December 2015

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुखेड तालुकाध्यक्ष पदी शेख रियाज, सचिव के.एन.कांबळे यांची निवड



मुखेड :-
          महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुखेड  तालुकाध्यक्ष पदी युवा पत्रकार शेख रियाज चांदपाशा तर सचिव पदी जेष्ठ पत्रकार के.एन.कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 4 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस तथा संपादक रुपेश पाडमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुखेड पत्रकार संघाची बिनविरोध कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मुखेड तालुका अध्यक्ष पदी रियाज शेख, सचिव के.एन.कांबळे, कार्याध्यक्ष नवनाथ भद्रे, उपाध्यक्ष जयभिम सोनकांबळे, कोषाध्यक्ष अँड. मिलिंद कांबळे, सल्लागार बबलु मुल्ला, सहसचिव संदीप पिल्लेवाड, सदस्य महेताब शेख, सुर्यकांत भोईवाडे, कैलास मादसवाड, संजय पिल्लेवाड, अकबर मणियार आदींची निवड करण्यात आली.
     यावेळी संपादक रुपेश पाडमुख यांनी सांगीतले की, तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांना सोबत घेवुन लोकांच्या अडीअडचणी सोडवावे. पत्रकारांमध्ये भेदभाव न करता सामजस्याने विविध उपक्रम राबवुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची वेगळी ओळख निर्माण करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांनी सांगीतले की, पत्रकारांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन समाजामध्ये जनजागृती करावी. अन्यायाविरोधात न डगमगता लेखनी द्वारे सामान्य माणसांना न्याय द्यावा असे सांगीतले. यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते.

No comments: