Thursday, 3 September 2015

Namaskar Live 03-09-2015 Eveng Audio News



नमस्कार लाईव्ह ०३-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत, अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा किनवट येथे तीव्र निषेध

२- मानवाधीकारच्या शिक्षक भरती पाठपुराव्याला यश, डी.एड, बी.एड धारकांच्या मागण्या व सततच्या प्रयत्नांना अखेर यश

३- दक्षता संनियंत्रण समितीची ८ सप्टेंबर रोजी बैठक

४- गंजगाव येथे रात्रंदिवस जेसीबीने वाळूउपसा सुरूच

५- मुक्रमाबाद शहर व आजूबाजूच्या गावामध्ये चोर, दरोडेखोर आल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, मुक्रमाबाद पोलीस स्टेशन तर्फे आवाहन

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा - राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस

2-कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे अतिरिक्त ठरवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ आक्रमक, शिक्षकदिनी करणार जीआरची होळी

3-नागपूर: स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी भगवा फडकावणाऱ्यांना सैनिकांच्या वेदना कळलेल्या नाहीत, म्हणून वन रँक वन पेन्शनला विलंब - राज बब्बर, नेते, काँग्रेस

4-शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आक्रमक व्हा, शरद पवार यांची पक्षाच्या नेत्यांना सूचना

5-परभणी - शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ढालेगावात मुख्यमंत्री पोहोचताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा



~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३३ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

चालून पाय थकायला नको, म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस

(धनंजय देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: